'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 1 July 2017

तंत्रज्ञान आणि सामाजिक प्रश्नांची सांगड घालताना ...

यतीन दिवाकर (निर्माण २) भारतीय प्रौद्योगिकी संस्था, मुंबई (आयआयटी बॉम्बे) येथे तंत्रज्ञान व विकास उपाय कोष (Technology and Development Solutions Cell, TDSC) मध्ये रुजू झाला आहे. तिथे तो नक्की काय काम करतोय हे जाणून घेऊयात यतीनच्याच शब्दात -

 “तुम्ही ऐकलंच असेल की २०१५ पर्यंत मी आकाश बडवे आणि आकाश पत्की सारखाच छत्तिसगडमध्ये पंतप्रधान ग्रामीण विकास अध्येता (PMRDF) म्हणून काम करत होतो. तिथून मी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मधल्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रात (STRC) कामाला लागल्याची बातमी सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी आपण सिमोल्लंघन मध्येच वाचली असेल. तिथे काही माझे मन लागले नाही, तरी मी महिन्यातच तिथून बाहेर पडलो. बाहेर पडताना आता स्वत:च काही सुरू करावे असं मनात होतं आणि रायपुरला गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जाऊन तसे प्रयत्न सुरू केले. त्या काळात जाणवलं की कित्येक गैर-सरकारी संस्थांना (NGOs) छोट्या-छोट्या तांत्रिक मदतीची गरज असते आणि मा‍झ्या सारख्या CTARA आणि PMRDF ची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला हे करणे सहज शक्य आहे.

तर रायपुरमध्ये हे करणं चालू करतच होतो तेव्हाच आयआयटी मधून प्रा. मिलिंद सोहोनी यांनी विचारले की असलंच काम TDSC मध्ये करणार का? एकदा आयआयटीमध्येराहलेल्या व्यक्तीला परत तिथे जायची संधी मिळाली तर ती सोडणारी एखादीच अ‍वलिया असते. मी त्यातील नाही. परत, काम एवढं भारी आहे ना! तर आता कामाबद्दल. मी TDSC चा प्रकल्प व्यवस्थापक आहे.

TDSC म्हणजे काय? CTARA मध्ये M.Tech. करणार्‍या विद्यार्थ्यांना development sector मध्ये कामाचा अनुभव आणि स्वत:ची consultancy सुरू करायच्या आधी तयारीसाठी २०१३-१४ मध्ये TDSC सुरू केले. (गंमत म्हणजे २०१६ जून मध्ये मी तिथे कामाला लागायच्या आधी अडीच वर्षात एकही CTARA च्या विद्यार्थ्याने इथे पूर्ण वेळ काम नाही केलं, त्याची कारणं वेगळी आहेत, कधी भेटलो तर बोलूयात.) 
विद्यार्थ्यांच्या thesis/ project मधून तयार झालेला protocol वापरून सरकारी विभाग, NGOs, CSRs, trusts, साठी काम करून fees मिळवता येते हे दाखवून देण्याचं काम इथे होतंय. काही परत-परत लागणार्‍या सुविधा देऊन सलग १-२ वर्षं regular income मिळवता येतो हे पण आम्ही दाखवून दिलयं. विद्यार्थी ते development professional या स्थित्यंतराला आम्ही मदत करतोय.

आम्ही जवळच्या पालघर व ठाणे जिल्ह्यांना कामासाठी प्राधान्य देतो. इथे आम्ही ग्रामीण पेयजल पुरवठा योजनांची तपासणी, जलयुक्त शिवारमधील कामांची पहाणी, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती विकास कार्यक्रमात होणारी रस्ते व बांधकामाची कामे, कचरा व्यवस्थापन व नळ-जल पुरवठा योजनांचे नियोजन असली कामे सरकारी विभागांसाठी करत आहोत. सोबतच काही सामाजिक संस्थांसाठी पाणलोट व्यवस्थापन, ग्रामीण नियोजन, सिंचन सुविधा, इ. वर काम करतोय. आरोहण (जव्हार, मोखाडा) आणि युवा मित्र (सिन्नर) सोबत गेले दोन वर्ष सतत काम करतोय.

महिन्यातील १०-१२ दिवस field-work आणि बाकी दिवस research, reporting असं काम असतं. समोरच्याची गरज, मिळणारा मोबदला, असलेला वेळ, आमचे ज्ञान अश्या सगळ्याची सांगड घालत आम्ही नव-नवीन पद्धतीने काम करतो. ठक्कर बाप्पामध्ये तर आम्ही पाच-सात हजारात एका रस्त्याची तपासणी करतोय! त्यासाठी आम्ही आमच्याच नव्या टेस्ट बनवल्या आहेत. PMGSY मध्ये जे करतात, त्याचे सोपं रूप बनवलंय. सहा महिने तर ते बनवायला लागले! आता आमचे सगळे protocols आम्ही उन्नत महाराष्ट्र अभियानांतर्गत इतर महाविद्यालयांशी वाटून त्यांना त्यांच्या जिल्ह्यात काम करायला उद्युक्त करत आहोत. या पावसाळ्यात पालघर जिल्ह्याच्या पाणी-पुरवठा विभागाला नळ-जल योजनांचे नियोजन प्रभावी व शाश्वत पद्धतींनी करण्याचे प्रशिक्षण देणार आहोत.

या सर्वात माझे काम म्हणजे सध्या सोबत असणार्‍या ८-१० staff interns च्या कामात मदत करणे, प्रत्येक project च्या प्रत्येक रिपोर्ट वाचून चुका सुधारणे, नवीन protocol ची चाचणी करताना सोबत जाणे, मॅनेजरची सर्व कामे करणे, जिथे कमी तिथे आम्ही प्रमाणे इतर कामांत मदत करणे, आदी.

TDSC बद्दल, माझ्या कामाबद्दल, असं काम तुमच्या कॉलेज मध्ये कसं करता येईल याबद्दल बोलायला 9823578400 वर व्हॉट्सअ‍ॅप्प करा, yatindestel@gmail.com ला मेल लिहा. सोबतच www.ctara.iitb.ac.in/tdsc ला भेट द्या.

यतीन दिवाकर, निर्माण २

No comments:

Post a comment