'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth
Thursday, 21 November 2013
या अंकात
खासगी वैद्यकीय व्यवसायाची
सद्यस्थिती काय आहे? त्यामागचं अर्थकारण काय? या आणि अशा प्रश्नांवर प्रकाश
टाकणाऱ्या डॉ. सोपान कदम यांच्या ऑक्टोबर सीमोल्लंघन मधील लेखाचा उत्तरार्ध...
ताज्या घडामोडी
प्रेरणास्रोत
नवी क्षितिजे
शोधक पाऊले
ü ‘Reliving Gandhi’ - आजकाल पॉप्युलर असलेल्या गांधीजींची चेष्टा
करण्याच्या शिरस्त्याला बाजूला ठेवून गांधीजींबद्दल वाचन व चिंतन करताना श्रेणिकला
जाणवलेले मुद्दे, आणि त्याचे झालेले शिक्षण याबद्दल त्याच्याच शब्दात...
ü ‘तारांगण’ – महाराष्ट्रात आणि
देशात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करून गेलेल्या, स्वतःच्या कर्तुत्वाने
स्वयंप्रकाशित, झालेल्या व्यक्तींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक.
परिचय करून देतोय निर्माण ५ चा निखिल मुळ्ये
ü फर्क पडता है – विष्णू नागर (हिंदी भाषेतील प्रसिद्ध कवी व
विडंबनकार विष्णू नागर यांची एक सुरेख कविता)
‘नोबल’ प्रोफेशनचा ‘कट’ (उत्तरार्ध)
आपण जेव्हा एका
डॉक्टरकडून दुसऱ्या स्पेशालिस्टकडे, लॅबवाल्याकडे व फार्मसीमध्ये जातो, डॉक्टरांनी
सांगितलेल्या साऱ्या तपासण्या करून घेतो, सारी औषधे विकत घेतो, तेंव्हा ‘आपल्याला
लुटत तर नाही आहेत ना?’ असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. नुकतेच
निर्माण ५.२ब (वैद्यकीय) शिबिरात एक वादळी सत्र झालं डॉ. सोपान कदम यांचं. याच
अनुषंगाने सोपानने सीमोल्लंघनच्या ऑक्टोबर आवृत्तीत एक लेख लिहिला. हॉस्पीटल कटचे पैसे कसे वसुल करतात ते आपण त्या
पहिल्या लेखात पहिले. वाचूया त्या लेखाचा उत्तरार्ध...
हॉस्पीटल कटचे
पैसे कसे वसुल करतात ते आपण सीमोल्लंघनच्या ऑक्टोबर अंकात पहिले.
त्याच प्रमाणे जशी स्पर्धी वाढली तसे हॉस्पीटलने जास्त पैसे कमवण्यासाठी नवीन
मार्ग शोधले जसे की ‘आमचेच हॉस्पीटल ,आमचीच लॅब, आमचेच मेडीकल’... मेडीकल व लॅब
मधुन मिळणारा नफा बघुन ही पध्दत सुरु केली गेली. रुग्णाला दावाखान्याच्याच मेडीकल
मधून औषधे घेणे बधंनकारक केले जाते व तसेच दावाखान्याच्याच लॅब मधुन तपासण्या
कराव्या लागतात. एखाद्या रूग्णाने जर बाहेरच्या मेडीकल मधून औषधे घेण्याचा किंवा
तपासण्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला रागवले जाते व सांगितले जाते की आपला
रुग्ण घरी घेउन जा. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना घाबरवून देण्यासाठी
हॉस्पीटलमध्ये फलक लावलेले असतात की आपण
जर औषधे बाहेरुन आणत असाल तर आपण आपल्या जबाबदारीवर आणावीत.
मेडीकल मधुन हॉस्पीटलला खुप फायदा होतो .काही औषध कंपन्या एकुण विक्रीच्या ५०%
कमिशन देतात. हॉस्पीटलला गिफ्ट देतात, जसे की, फोर व्हीलर, फर्नीचर ,टिव्ही, कुलर,
वॉटर फिल्टर, ईत्यादी. त्याचप्रमाणे जर हॉस्पीटल जी.पी. (जनरल प्रॅक्टिशनर) ना
पार्टी देत असेल तर त्याचा सर्व खर्च ह्या औषध कंपन्या करतात. या पार्टीमधे मग
जी.पी ना दारु ,नाच ,गाणे ,बायका पुरवणे ईत्यादी भानगडी होतात. लॅब मधुनही एकूण तपासण्याच्या
रकमेतून ६०% ते ६५ % नफा मिळतो.
त्याच प्रमाणे काही डॉक्टर्सकडे वॉर्डबॉय ट्रेन होतात. त्यांना हे डॉक्टर १५
ते २० हजारात डिग्री विकत घेउन देतात आणि छोट्या- मोठ्या खेड्यामधे प्रॅक्टिस टाकून
देतात, कॅम्प घेउन सेटल करुन देतात. दवाखान्याचा सर्व खर्च मोठ्या हॉस्पीटलवाले
डॉक्टर्स करतात व त्या वॉर्डबॉयला सेकंड हॅण्ड फोर व्हिलर घेउन देतात .मग हेच
डॉक्टर ह्या हॉस्पीटलला रुग्ण पाठवतात व रात्री जर रुग्ण त्यांच्याकडे आला तर
त्याला स्वतः आपल्या गाडीने आपल्या डॉकटरंच्या हॉस्पीटल मधे घेऊन जातात.
काही
खेळातील नावांसारखे हॉस्पीटचे प्रकार असतात. उदाहरणार्थ,
# खो-खो हॉस्पीटल – ह्या
हॉस्पीटलमधे नवीन रुग्ण आल्याशिवाय जुन्या
रुग्णाला डिस्चार्ज देत नाहीत. नेहमी हॉस्पीटल भरलेले पाहिजे व बेड चार्जेस मिळत
राहिले पाहिजेत .असे सहसा – आय.सी.यू., बालरोग तज्ञ ,न्युरो हॉस्पिटल्स मधे घडते.
# कबड्डी हॉस्पीटल – यामधे
रुगणाला वारंवार फ़ॉलोअप साठी बोलावणे व हॉस्पीटलमधे भरती करुन घेणे असा प्रकार
चालतो. सहसा न्युरो, नेफ्रो,आर्थो, आय.सी.यु हॉस्पिटल्समधे असे घडते.
# आट्या पाट्या हॉस्पीटल –
हा प्रकार सहसा जी हॉस्पिटल्स तीन ते चार लोक़ांनी मिळून सुरू केलेली असतात (ग्रुप हॉस्पीटल) तिथे पाहायला मिळतो.
सहसा हे सर्व डॉक्टर एकाच विषायाचे तज्ञ असतात पण प्रत्येक जण वेगवेगळा राउंड
घेतात (पाट्या टाकतात) नवीन तपासण्या सांगतात व पैसे वसुल करतात.
या धंदयात फक्त डॉक्टरच पैसे कमवतात असे नाही. आणखीनही बरेच लोक पैसे कमवतात.
माझ्या ओळखीचा एक लॅब टेक्नीशियन होता त्याने एका मोठ्या खेड्यात लॅब सुरु केली
होती. मी २-३ वर्षानंतर सहज त्या गावातून जाताना त्याची व माझी भेट झाली, त्याने
मला त्याचे मोठे घर दाखवले व नवीन चारचाकी गाडी घेतली आहे व बँकेत काही रककम जमा
आहे असे तो मला म्हणाला. मी एकदम आश्चर्यचकित झालो कारण चार वर्षापूर्वी याच
मुलाकडे लॅब टाकण्यासाठी पैसे नव्हते, मी त्याला विचारले हे कसे? तो म्हणाला ही
सर्व डेंग्यूची कमाई आहे. मी विचारले कसे काय? त्याने जे उत्तर दिले ते ऐकून मी
परेशान झालो, तो म्हणाला की मी येथील ५ ते ६ जी.पी. शी टायअप केले आहे. ते
माझ्याकडे जो रुग्ण [c.b.c] सी.बी.सी.
पाठवतात मी त्या रुग्णाचा [platelet count] नॉर्मल जरी असेल
तरी कमी दाखवतो. मग जी.पी. त्या रुग्णाला दोन ते तीन दिवस आपल्या दवाखान्यात भरती
करुन घेतात व मग परत तपासणी करण्यासाठी सांगतात. दुस-या वेळस तपासणी न करताच
नॉर्मल रिपोर्ट देतो, जी. पी. त्या रुग्णाकडून बिल घेउन त्याला डिसचार्ज करतात. मग
त्या बिलामधुन सुद्धा मला काही पैसे मिळतात.
आता मी आपल्याला कॉर्पोरेट हॉस्पीटल बददल माहिती
देणार आहे. ह्या हॉस्पीटलचे मालक सहसा एका तज्ञ विभागासाठी दोन तज्ञ डॉक्टर्स
नोकरीला ठेवतात. या तज्ञ डॉकटरना फिक्स पगार असतो. वरून त्यांच्याकडून येणाऱ्या
रुग्णांच्या एकूण बिलामधुनही त्यांना काही टक्के (कमिशन) देतात. जर त्यांनी काही
प्रोसीजर केली तर त्याचे वेगळे पैसे मिळतात आणि त्यांचे प्रोमोशन होते, पगारात वाढ
होते, हॉस्पीटलमधे मान वाढतो. त्यामुळे नेहमीच या दोन तज्ञ डॉक्टरांमध्ये स्पर्धा
असते. हे डॉक्टर त्यांचा व्यक्तिगत पी.आर.ओ. कामला ठेवतात. जो तज्ञ डॉक्टर जास्त
नफा देणार नाही त्याला कधीही हॉस्पीटलमधून कमी केले जाऊ शकते. या सर्व कारणांमुळे
या तज्ञ डॉक्टरांचे लक्ष हे नवीन रुग्ण ओढून आणणे व जास्तीत जास्त प्रोसीजर करुन व
रुग्णाला जास्त बिल लावून हॉस्पीटलला नफा मिळवून देणे यावर असते.
मी याचा विचार केला की असे का होत असावे? मी काही
तज्ञ डॉक्टरांसोबत या विषयी चर्ची केली, काही अनुभव घेतले, त्यावरुन काही गोष्टी
माझ्या लक्ष्यात आल्या. त्या अश्या -
जर एखद्या तज्ञ डॉक्टरला स्वतःचे हॉस्पीटल सुरु
करयाचे असेल तर त्याला खूप खर्च येतो.
# कोणत्याही डॉकटरला जर हॉस्पीटल चांगले चालवायचे असेल तर ते मोक्याच्या ठिकाणी
असावे लागते. जागा स्वतःची की भाड्याची हाही प्रश्न महत्वाचा ठरतो. जागा भाड्याने
घेऊन हॉस्पीटल बांधायचे असेल तरी खर्चे १० लाख ते ५० लाख असा येतो. जागा विकत घेऊन
बाधंकामासाठी खूपच पैसे लागतात. हॉस्पीटल मधील वस्तू घेण्यासाठी वेगळे पैसे
लागतात, फर्नीचर खर्च, हॉस्पीटल उदघाटन खर्च, (हॉस्पीटलचे उदघाटन हे हॉस्पीटल लोकांना माहिती होवे म्हणून मोठे करावे लागते. त्यामधे सुधा २ ते
३ लाख रुपये खर्चे होतो) असे ईतर खर्चही चुकत नाहीतच.
# हॉस्पीटल सुरु केल्यावर कमीतकमी १० जणांचा स्टाफ तरी कामाला ठेवावा लागतो व
सुरुवातीला हॉस्पीटलमध्ये रुग्ण येवो न येवो स्टाफला पगार द्यावाच लागतो. (क़ॉल
सेंटर्स, मॉल्सची संख्या वाढल्यामुळे स्टाफ मिळणे अवघड झाले आहे)
-
डॉक्टर कोणत्या विषयात तज्ञ आहे यावरही नफा किती लवकर चालू होणार हे अवलंबून
असते.
# बँक एकूण रकमेच्या फक्त ६० ते ७० टकके पैसे देते. बाकीचे पैसे डॉक्टरांना जमा
करावे लागतात. बँकेचे लोन जर घ्यायचे असेल तर घराच्या मालमत्तेची
कागदपत्रे बॅकेकडे तारण म्हणून ठेवावी लागतात. बँकेचा ह्प्ता ५० हजार / महिना पर्य्ंत येतो.
या सर्व गोष्टींमुळे डॉक्टरही या चक्रात गुंतुन जातात.
हे सर्व बंद कसे करावे हे मला समजले नाही. आणि समजले तरी मी त्यावर काही उपाय
करू शकेन की नाही यात मला शंका वाटत होती म्हणून मी मधला पर्याय धरला तो असा की आपणच
ह्या प्रकारातून बाहेर पडावे. जर ह्या क्षेत्रातील प्रत्येकाने असा प्रयत्न केला
तर मला वाटते ही समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही. आमच्या मधील काही जुन्या
डॉक्टर्सनी कट देणे व घेणे प्रकारापासुन स्वतःला दुर ठेवण्याची सुरुवात केली आहे. आपण
अशी करुया की नवीन डॉक्टर्सही या प्रकारापासून स्वतःला दूर ठेवतील.
सीमोल्लंघकांचा ऑक्टोबर मेळावा !
निर्माणची शिक्षण
प्रक्रिया पूर्ण करून सामाजिक प्रश्नावर काम करणाऱ्या शिबिरार्थींच्या पुढील
क्षमता विकासासाठी आणि त्यांच्या कामाला वेग येण्यासाठी आयोजित केली जाणारी
प्रशिक्षण कार्यशाळा (ऑक्टोबर वर्कशॉप) दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ११ ते १६
ऑक्टोबर दरम्यान सर्च, शोधग्राम मध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. सामाजिक समस्यांचे आव्हान घेऊन
आपल्या व्यक्तिगत जीवनात सीमोल्लंघन करणाऱ्या युवा सीमोल्लंघकांचाच जणू हा मेळावा..
यावर्षीच्या
कार्यशाळेत डॉ. आनंद करंदीकर, शेखर साठे, कुमार केतकर, प्रदीप लोखंडे, मकरंद करकरे, सुनिल चव्हाण या सामाजिक, राजकीय आणि व्यवसाय
क्षेत्रातील वरिष्ठ कार्यकर्त्यांनी निर्माणच्या युवांना मार्गदर्शन केले.
विकासाच्या विविध कसोट्या, फ्रेमवर्क्स काय व आपापले काम त्याच्याशी कसे संलग्न होऊ शकते यावर डॉ. आनंद
करंदीकर, अमर्त्य सेन – जगदीश भगवती या प्रसिद्ध
वादाबद्दल शेखर साठे व कुमार केतकर यांनी आपले विचार मांडले. रुरल रिलेशन्स व
ग्यान की लायब्ररीज या आपल्या इनोव्हेटिव्ह प्रयोगाची माहिती उद्योजक प्रदीप
लोखंडे यांनी दिली. सुनिल चव्हाण काकांनी आर्थिक व्यवस्थापनाबद्दल तर मकरंद
करकारेंनी ‘7 Habits of Highly Effective People’ या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित सेशन घेतले.
विचार, भावना व कृती यांची
पुरेशी रसद घेऊन आणि नवी क्षितिजे पार करण्यासाठीचा उत्साह घेऊन या युवांचा दसरा
साजरा झाला....
तारुण्यभान औरंगाबादमध्ये . .
कळीचं फुल
व्हावं इतक्या सहजपणे येत खरतर तरुणपण! पण प्रसारमाध्यमे आणि इंटरनेटच्या
विळख्यामुळे हा प्रवास दिवसेंदिवस अधिक खडतर अन काटेरी होत चालला आहे हे आपण
सर्वजण अस्वस्थपणे पाहतो आहोत. या विषयावर नुसतीच चर्चा करण्याऐवजी एक कृतीशील
पाऊल उचलावं म्हणून सुरु झालेला आमचा "स्त्री जागरण मंच" गेल्या सहा सात वर्षांपासून किशोरवयीन
मुलामुलींसाठी काम करत आहे. वस्तीवरील मुलं, तसेच पालिकेच्या शाळांपासून उच्चभ्रू विद्यालयापर्यंत
समाजाच्या विविध स्तरातील मुलामुलींसाठी कार्यशाळा घेऊन या वयोगटाच्या मनापर्यंत
पोचण्याचा, आणि त्यांच्या मनातली काजळी थोडीतरी पुसून
त्यांनी स्वच्छ नजरेने पुढील आयुष्याचं आशादायक चित्र रेखाटाव यासाठी प्रयत्न करत
आहे.
त्यातूनच महाविद्यालयीन वयोगटासाठी कार्यशाळा घेण्याची
कल्पना पुढे आली. आणि त्यासाठी एकच नाव डोळ्यापुढे आले ते म्हणजे "डॉ. राणी
बंग ". त्यांचे या विषयातले ज्ञान आणि अनुभव बघता त्यांच्याकडून प्रशिक्षण
घेण्याची कल्पना सर्वानुमते संमत झाली. आणि मग प्रत्यक्ष कार्यशाळा आणि त्याचबरोबर
live training असा हा शुभयोग धडवून
आणण्याचा आम्ही निर्धार केला. सलग तीन दिवसांच्या कार्यशाळेसाठी कॉलेजच्या मुलांना
गोळा करणे हे एक आव्हान होते. यासाठी आमच्या मदतीला उभा राहिला त्रिशूल कुलकर्णी.
एम आय टी या इंजिनीअरिंग कॉलेजचा प्राध्यापक आणि निर्माणचा सदस्य. यासाठी त्याचे
कॉलेज सहप्रायोजक झाले आणि
विद्यार्थ्यांची टीम स्वयंसेवक !
दि. २३,२४ व २५ ऑक्टोबर २०१३ या काळात ही कार्यशाळा अत्यंत यशस्वीपणे
पार पडली. ३६४ जणांची उपस्थिती होती. आपल्या आत्यंतिक जिव्हाळ्याच्या विषयावर
इतक्या संवेदनशीलतेने आणि कमालीच्या सहजतेने संवाद साधता येतो ही गोष्ट मुलांना
अद्भुत वाटत होती. त्यामुळे त्यांचा उत्साही प्रतिसाद कॉलेजच्या प्रिन्सिपल आणि
अन्य प्राध्यापकानाही आश्चर्यचकित करून गेला.
तरुणाईला
विचारांची एक नवी दिशा देणाऱ्या "तारुण्यभान" या कार्यशाळेचे संयोजक
होण्याचे भाग्य आम्हाला लाभल्याने उमलत्या वयाशी मैत्री करण्याच्या आमच्या
प्रयत्नात एक मोठी चढण पार केल्यासारखे वाटत आहे. तरुणाईला सहजपणे आपलसं
करण्याची कला, अवघड विषय
हळुवारपणे समजावण्याची हातोटी, आणि तब्येतीच्या त्रासावर मात
करून passion ने काम करण्याची वृत्ती या सर्व गोष्टी
राणीताईच्या सहवासात आम्ही अनुभवल्या. त्यांच्या बरोबर आलेल्या सुनंदाताई, राजेंद्रभाऊ आणि ज्ञानेश्वरभाऊ यांनीही प्रचंड energy ने साथ दिली. आणि एकूणच आमच्या औ'बाद शहरातील
मुलांसाठी एक अतिशय उपयुक्त असा उपक्रम घेतल्याचे समाधान ह्या कार्यशाळेने स्त्री
जागरण मंचाला दिले.
धुळे निर्माण टीमची (धुव्वादार) मिटिंग
धुळ्यात
संदीप देवरे, ज्ञानेश मगर आणि
त्यांचे मित्र ‘संवाद लर्निंग सेंटर’ चालवतात. या सेंटरमध्ये १० ऑक्टोबर २०१३
ला नाशिक, धुळे आणि
जळगाव मधील निर्माण शिबिरार्थीं व त्यांचे मित्र अशी १८ जणांची मिटिंग झाली.
याप्रसंगी
धुळ्यातील अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सुरेश थोरात याचं सुंदर सेशन झालं. १९८८
पासून अंनिसचं काम, जादूटोणा विरोधी
विधेयकाचा संपूर्ण इतिहास, त्या त्या वेळच्या सामाजिक,
राजकीय घटना यावर ते बोलले. या विधेयकातील विविध बाबी, विधेयकाला विरोध होण्याची कारणं इ. गोष्टी त्यांनी सांगितल्या. येत्या
अधिवेशनात या कायद्याचे भवितव्य ठरेल. जादूटोणा विरोधी विधेयक येत्या अधिवेशनात
मंजूर व्हावे यासाठी आपणही काही प्रयत्न करू असं वाटून - मुख्यमंत्र्यांना
इ मेल पाठवणे, सह्या गोळा करून त्या पाठविणे, शाळा - कॉलेज मधील विद्यार्थ्यांमध्ये या विधेयाकाविषयी माहिती देऊन पोस्ट
कार्ड लिहायला सांगणे असा कृती आराखडा आखला गेला.
त्यानंतर
सर्वांनी शेअरिंग केले. ज्यात, मी सध्या करत असलेल्या कामाचे स्वरूप व त्यातील अडचणी, मला माझ्या कामात काय मदत हवी आहे, जी या ग्रुपमधून
मिळू शकते, माझ्यात काय स्किल्स आहेत ज्यांची ग्रुपमधील
इतरांना मदत होईल यावर सगळे बोलले. या मिटिंगचे मुख्य फलित म्हणजे - धुळे, नाशिक, जळगाव भागातील आम्हा सर्व निर्माणींची भेट झाली, एकमेकांच्या
कामाबद्दल, आणि कामात येणाऱ्या अडचणींबद्दल माहिती मिळाली,
या पुढे करावयाच्या Group Activities ठरवता
आल्या.
पुढची
मिटिंग १८-१९ जानेवारीला जळगावला होईल. एकूणच ही मिटिंग सर्वांसाठीच आनंददायी व
उत्साहवर्धक ठरली!
लडाख मधील मुलांना जोडतोय ज्ञानसेतू, निर्माणचा अश्विन पावडे सहभागी
भारातातील दुर्गम व मागासलेल्या
राज्यांतील मुलांच्या साक्षामिकरणासाठी ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा ज्ञानसेतू उपक्रम
गेल्या काही महिन्यांपासून राबविला जात असून अरुणाचल प्रदेश, आसाम, जम्मू काश्मीर व
छत्तीसगढ ह्या राज्यांमध्ये विज्ञान शिकविण्याच्या माध्यमातून तेथील लोकांशी संवाद
होणे, वैचारिक देवाणघेवाण होणे
हे देखील ह्या उपक्रमाचे उद्देश्य आहे. कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या batches ठराविक काळानंतर ह्या
राज्यांमध्ये जाउन हे शिक्षणाचे कार्य करतात.
ज्ञानसेतूच्या कार्यपद्धतीनुसार, दुर्गम भागात एखादी
कार्यशाळा घेण्याआधी जाणाऱ्या कार्यकर्त्यांचे अत्यंत काटेकोर ट्रेनिंग होते.
वैज्ञानिक संकल्पनांसह तो भाग, तेथील संस्कृती, सध्याची शैक्षणिक परिस्थिती, लोकांचा दृष्टीकोन ह्या सगळ्याबद्दल प्रशिक्षण दिले जाते.
नुकतेच कार्यकर्त्यांची एक फळी जम्मू
काश्मीर मधील लडाख जिल्ह्यात १० दिवसांचा शैक्षणिक कार्यक्रम राबवून परतली. त्यात
निर्माण ४ च्या अश्विन पावडेचा देखील सहभाग होता. १० दिवसांमध्ये ह्या चमूने
लेहच्या आजूबाजूच्या ९ शासकीय शाळांमध्ये विज्ञानातील काही संकल्पना, नियम सोप्प्या रोजच्या
आयुष्यातील उदाहरणांच्या माध्यमातून , खेळाच्या आणि प्रयोगांच्या माध्यमातून स्पष्ट केल्या. तसेच तेथील स्थानिक
पातळीवर येणाऱ्या शिक्षणातील अडचणी, तेथील शाळांमधील कार्यपद्धती, नियोजन ह्याबद्दल शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांनी देखील ह्या उपक्रमाबद्दल
आत्मीयता व confidence दर्शवला.
आपला वेळ काढून अशा दुर्गम भागात
शिक्षणाचे कार्य पोहोचविण्यासाठी गेलेल्या अश्विनचे अभिनंदन. ह्या मोहिमेबद्दल अधिक माहिती -http://www.youtube.com/watch?v=EuNBGkzQdtk
येथे बघता येईल.
ज्ञानसेतूसाठी कार्य करू इच्छीणाऱ्या सर्व युवांनी खालील
संकेतस्थळाला भेट द्यावी -
प्रीती बंगाळचे दक्षिण भारत व उत्तराखंड येथील जंगलात संशोधन सुरु
प्रीती
बंगाळ (निर्माण ४) हिने तिचे पदव्युत्तर शिक्षण M.Sc. in Biodiversity, पुणे विद्यापीठ येथून पूर्ण केले.
शिक्षण घेत असताना प्रीती पक्ष्यांमधील विविधतेवर अभ्यास करत होती. याच क्षेत्रात
पुढे अभ्यास करण्यात प्रीतीला रस होता. अशातच शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रीतीला
बंगलोर येथील Indian Institute of Sciences या संस्थेसोबत संशोधन करण्याची
संधी चालून आली. मुळातच निसर्गाची आवड आणि या क्षेत्रात अभ्यास करण्याची इच्छा
असल्याने प्रीतीने ही संधी लगेचच स्वीकारली.
या अभ्यासात
प्रीती आणि तिचे सहकारी मुख्यतः जंगलांमध्ये प्राणी आणि पक्ष्यांद्वारे होणाऱ्या
बीजप्रसाराच्या विविध पद्धतींचा अभ्यास करत आहेत. या अभ्यासासाठी दक्षिण भारत आणि
उत्तराखंड येथील पानझडीच्या जंगलांची निवड करण्यात आली आहे. या अभ्यासात झाडांची
वैशिष्ट्ये, नेमके कोणकोणते
प्राणी-पक्षी बीजप्रसारण करतात, बीजप्रसारण हे कोणकोणत्या
माध्यमांद्वारे होते(वारा,पाणी,प्राणी-पक्षी),
जंगलांचे भवितव्य कसे असेल आणि निसर्गातील या सर्व घटकांचा
परस्परांसोबत कसा संबंध आहे यावर भर दिला जाणार आहे.
नुकताच
प्रीतीने दक्षिण भारतातील अभ्यास पूर्ण केला आहे आणि यापुढील दोन ते तीन महिने
प्रीती व तिचे सहकारी उत्तराखंडमधील जंगलांमध्ये अभ्यास करणार आहेत. वीज,पाणी अशा कोणत्याही सुविधा नसलेल्या
भागात राहून प्रीती हे काम करत आहे. प्रीतीला पुढील प्रवासासाठी निर्माण
परिवारातर्फे खूप शुभेच्छा!!
ऋतगंधा देशमुख सर्च मध्ये संगणक विभागात रुजू
निर्माण ४
ची ऋतगंधा देशमुख १८ ऑक्टोबर पासून सर्च मध्ये ‘संगणक’ विभागात ‘Associate
Software Engineer’ म्हणून
रुजू झाली.
ऋतगंधा
मुळची औरंगाबादची राहणारी. ऋतगंधाने MCA (Masters in Computer Application) हा अभ्यासक्रम २०१२ साली
पूर्ण केला. सर्चमध्ये येण्याआधी एक वर्ष ती औरंगाबादमधील देवगिरी कॉलेजमध्ये Peripheral Interface आणि
Database Management हे विषय शिकवायची.
ऋतगंधावर
पुढील एक वर्षात - सर्चच्या गरजेप्रमाणे
नवीन सोफ्टवेअर बनवणे, सध्या वापरत
असलेले सोफ्टवेअर्स सुरळीत चालू राहतील याची काळजी घेणे, सर्चची
वेबसाईट सांभाळणे व अपडेट करत राहणे, तसेच संगणक विभागातील
इतर दैनंदिन कामे पाहणे, अशा कामांची जवाबदारी राहील. या
कामामध्ये श्री महेश देशमुख सर तिला मार्गदर्शन करतील.
शाळेचे वर्ग – चौकोनी असावे की गोल?
औपचारिक
शिक्षण आणि शिक्षण पूरक उपक्रम यात विद्यार्थ्यांचा पूर्ण सहभाग आणि कुतूहल असावे
यासाठी वर्गाखोलीचा आकार कसा असावा? एका वर्गासाठी किती
प्रमाणात बंद, अर्ध बंद आणि मोकळी जागा असावी? दोन वर्गांमध्ये अंतर कसे असावे? वर्ग खोल्या आणि
त्यांच्या स्वतंत्र मोकळ्या जागा यांची रचना कशी असावी?
या
प्रश्नांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करते आहे कल्याणी वानखेडे (निर्माण ५). तिच्या Architecture च्या अभ्यासक्रमांतर्गत
तिच्या thesis चा
विषय 'Residential school based on
NAI TALIM system' हा होता. शाळेची वास्तू आणि इतर
पर्यावरणाचा शिक्षण प्रक्रियेवर होणाऱ्या परिणाम जाणून घेणे, विद्यार्थ्यांमधील संवाद व जिज्ञासा वाढविण्यात शाळेतील बांधकाम आणि विविध
जागांचा कसा उपयोग होऊ शकतो याचा अभ्यास करणे हा या विषयाचा एक भाग होता.
त्यासाठी
तिने Building as a learning aid, शिक्षण प्रवाहाच्या उगमापाशी, तोतोचान अशी पुस्तके
वाचून शिक्षण प्रक्रिया समजावून घ्यायचा प्रयत्न केला. शांतीनिकेतन, नई तालीम विषयक लेख आणि सोनदरा गुरुकुल बीड, आनंद
निकेतन सेवाग्राम, गुरुकुल बंगळूरू या शाळांची अभ्यास भेट
यातून काही निष्कर्ष काढायला मदत झाली. औपचारिक शिक्षण आणि इतर उपक्रम, त्यासाठी गरजेच्या शाळेतल्या सोई आणि जागा यांची आकडेवारी सादर करून,
नई तालीम पद्धतीप्रमाणे जास्तीत जास्त संवादाला पूरक, औपचारिक शिक्षण व विविध प्रयोगशील उपक्रमांना एकत्र आणणारा शाळेचा परिसर डिज़ाइन
करण्याचा हा प्रयत्न होता.
या
अभ्यासादरम्यान मला लक्षात आले की,
* अष्टकोनी अथवा गोल बसण्याची व्यवस्था सर्वात उपयुक्त
आहे. त्यात खोलीचा आकार चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी असू शकेल.
* एका वर्गात : बंद जागा ५० % , अर्ध मोकळी जागा ३० %
आणि मोकळी जागा २० % असणे फायद्याचे
* दोन वर्गांमध्ये अंतर असावे, वर्ग खोल्या आणि त्यांच्या स्वतंत्र
मोकळ्या जागा असाव्यात.
वरील मुद्दे अधिक स्पष्ट करण्यास
सोबत जोडलेली आकृती मदत करेल.
लिहिते व्हा . .
"RELIVING GANDHI"
In last few years I came across many people and peer
group who criticized Gandhiji for his AHINSHA, the method of struggle, to fight
against the mighty British, for his political moves, which he took during the
critical stages of national movement. Many also criticized and blamed him for
partition. Some also joked on his 'Pancha and Dhoti' and some on his Salt
Satyagraha. I too was convinced and influenced to some extent by this baseless,
un-researched and prejudiced comments and analysis regarding Gandhi..
But later I came across few events. Barak Obama, the
first African American president of the United States, has been an avid admirer
of Mahatma Gandhi. Only recently he told a group of students he would like to
have dinner with Mahatma Gandhi. Gandhi's contribution and influence in the
rise of Obama is being acknowledged too. "I surely believe without
(Mahatma) Gandhi - without Gandhi in India - there would be no Barack Obama as
president' of the United States," said Congressman John Lewis,
Obama also hired a teacher for his daughters to explain and teach them
about Gandhian principle and national movement. South African former prez
Nelson Mandela and Mayanmar's opposition party leader Aung Sang Su Ki
claiming Gandhi their ideal and Gandhian strategy as their political and social
weapon. This all events forced me to review my thoughts, analysis and to study
this man in depth. In this short course of my study, I came across many books
and people like 'Freedom At Midnight', India After Gandhi', My Experiments With
Truth' etc...and some great people who spoke about Gandhi like Albert
Einsteine, Martin Luther King jr. and many others...
As I moved on and tried to analyse the facts, a very new,
the hidden, the unknown, unspoken, misunderstood Gandhi came in front of me. I
will try to throw light on some of his views and try to erase few prejudices
which we have in our mind about him. To judge the stature of this man we need
to compare him with someone. So let’s compare this man with ourselves at every
stage as we go through this article...
After studying Gandhi in some depth I was shocked to hear
people criticizing him for his Satyagraha and blaming that it was a cowardice
way to fight. Some also said that he alone wanted to take the credits of this
independence struggle. But it’s my duty to put up the facts and try to do away
with this baseless arguments...When whole of the nation was awake at the
midnight of 15th Aug 1947, this old man was not present to celebrate and
rejoice the victory and taste its fruits but was far away in the villages of
Bengal (Naukhali) calming down the flames of communal riots which was ripping
this nation into two parts. This fact rose his stature infinite times in my
heart. Who would have not liked to take the credits of this victory after being
the cornerstone of such an unprecedented struggle in the history of the world
but he did not. For him the unity of nation, the communal harmony was much more
important...
Why AHINSA...???as many ask...To understand this concept,
it’s important to know 1) The background of British and their nature of rule
over India 2) Gandhiji's background and 3) the nature of Indian Masses.
British were the most developed nation both economically,
militarily and politically as well. They had a democratic structure placed in
their country and respected human and fundamental rights of the people. The
British rule over India was semi democratic and semi autocratic.
Gandhi had completed his higher education from England
therefore had knowledge about British laws and Fundamental rights. He also had
the successful experience of African struggle against British where he used his
technique of satygraha very successfully.
The Indian masses were poor and not strong enough technically
to fight the British. Any violent effort to emancipate this country would have
been struck down very easily by them through arms and they would have got the
legitimate reasons to do so i.e. "violence" It was therefore very
important to built a mass movement which could bring all the sections of people
into this struggle and this could be achieved only through AHINSA.
He believed in the logic that large masses could be drawn
into movements by expecting /sacrificing small amount of contribution rather
than to expect small no of masses to contribute large things, even 'life'.
Common people would have hesitated to join the violent movement and would not
have been possible to give it the structure of mass movement. He also believed
that to crush large masses was very difficult then to chop down the violent
groups.
SATYAGRAHA -A COWARDIC WAY TO FIGHT...SATYAGRAHA means
''I defy your law as it is not just and am ready to bear its consequences, but
i will stand by the truth.'' How many times we speak truth, and after
doing so, how much courage do we have to bear its consequences, without
reacting to it violently...? To judge the amount of courage needed to do
so..."try it once...!" The SATYAGRAHA's was based on the concept
that, man should be changed from within, by inflicting upon him the sense of
guilt about his act, by satyagrha. It also shows to the offender that your act,
against which the satyagraha is launched, is even worse than the violence which
you are using to curb this satyagraha and we are ready to bear it, but not your
law. It would led to permanent change in the attitude of man in contrast to
violence which led to temporary change due to fear and has the strong tendency
that the offender will bounce back with strong arms to curb the movement more
inhumanly and with legitimate reasons...this is what happened with the
'revolutionary nationalist'.
More important is, lakhs of people adopted this technique
on giving the call for satyagraha. There was really something special about
this man...just give a thought...
Many crack jokes on his half-nakedness...which he
continued even when he went to meet Queen of England...I found a very amazing
reason behind this behaviour and understood his internal strength and
commitment to his words...The story goes...Once a group of students went to
meet Gandhiji. They had a long discussion with him. One of them asked Gandhiji-
'Bapu you ask every one of us to were khadi, but the problem is its too costly
and we cannot afford it so what we should do...?' Bapu waited for a moment and
replied...'If its too costly then wear less cloths...' and from that day he
gave up his regular clothing and started to wear 'Pancha and Dhoti’. He
emphasized on "KHADI "and "CHARKHA" because it provided
employment to the Indian labour and protect the indigenous small scale industry
from the western industry and its manufactured cloths which British were
dumping in India and destroying the poor...Once the occasion came that Queen Of
England invited Gandhiji to meet her...Many suggested Gandhiji that, at least
for this time you wear a suit as you are going to meet the Queen of
England.. Bapu straight away neglected and refused this advise and
replied ''let the Queen of England also come to know what conditions
'They' and 'Their Govt ' have inflicted upon Indians...''It reflects the moral
strength and commitment of this man which makes me bow down to him...
While criticizing Gandhi people should also analyze that
'why people believed in him and gathered in lakhs even on his single call...? a
big question which hovered me... Whenever Gandhi gave a call to nationwide
movement people fell in line with him. Even in 1939 many leaders fell in line
with Gandhiji...they rejected the decision to start the satyagraha without
Gandhiji because they knew that national movement could be built with masses
and masses would join only if Gandhi gives a call. I found the explanation
for this in a conversation between Ram Manohar Lohiya and Gandhiji...R.M.Lohiya
once asked Gandhiji that ''you are not good orator like us. Your english is not
good, you are so monotonous, your speech is even not audible to many still
people gather on your single call. Why this is so...?'' Gandhi replied -"I
too don’t know the exact reason but it may be due to one thing which I feel-I
never ask people to do things which I haven’t done myself before."The
message which Gandhiji tries to give through this is "Be the Change You
Want To See In The World" and the world will follow you...
Thus a new Gandhi emerged in front of me on this small
research of mine...we have forgotten this man's contribution and principle's.
Today we blindly without studying and analysing facts criticize this great man
of such a stature...Albert Einstein has rightly said..."Future
generation would not belive that such a man of blood and flesh ever existed on
this earth..." Have we really reached this stage...??? I think and I
hope we haven’t and will never reach that stage. Though Gandhiji is not present
today but His thought is being propagated everywhere in the world through
people like Nelson Mandela, Aung Sang Su Ki, Dalai Lama, Irom Sharmila (on
satyagrha since 13 years), Anna Hazare etc... "If humanity is to
progress, Gandhi is inescapable. He lived, thought, and acted, inspired by the
vision of humanity evolving toward a world of peace and harmony. We may ignore
him at our own risk" -Martin Luther King jr. This is my small
effort to erase some of the prejudices we have regarding this 'old fakir'
Shrenik Lodha, lodhashrenik99@gmail.com
(श्रेणिक पुण्याच्या बि.
जे. मेडीकल कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि निर्माण ५ चा शिबिरार्थी)
Subscribe to:
Posts (Atom)