सर्वात बुद्धीचा प्राणी!
खोदून काढली खनिजे
उकरून खोलवर खड्डे
शोषून घेतले पाणी
पाडून खोलवर भोके
बांधून नद्यांवर धरणे
आटवले प्रवाह अवघे
हटवले किनारे सागर
बांधले जुगारी अड्डे
देऊन ध्रुवाला चटके
ते बर्फ कवच वितळवले
फाडून हवेची वस्त्रे
पृथ्वीस भिकारी केले
अन म्हणतो आम्ही त्याला
सर्वात बुद्धीचा प्राणी
आईस करी हा नग्न
करी विनाश तो आपलाही
अनिल
अवचट