'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 10 July 2013

तिनका तिनका जर्रा जर्रा

सूड आणि त्याच्या बदल्यात सूड या चक्रावर दोन उतारे शक्य आहेत. एक म्हणजे कोर्टात जाणे. देणीघेणी, त्यांची मोजमापे, त्यांच्या तुलना, त्यातला न्याय, हे सारे कोर्टाचे काम. ते नेहेमीच जमते असे नाही, पण ते जमावे अशी अपेक्षा तरी असते.
दुसरा उतारा जास्त मूलभूत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वर्णवादी शासनाने नेल्सन मंडेलाला बऱ्याच छळानंतर बराच काळ कैदेत ठेवले. अखेर जेव्हा त्याला सोडायचे ठरले तेव्हा तो स्वतःला म्हणाला, “ज्यांनी ज्यांनी मला इजा पोचवली आहे, त्यांना त्यांना मी माफ करायला हवे, आणि तेही ह्या तुरुंगाबाहेर पडायच्या आत. जर मी तसे केले नाही, तर मी कधीच त्यांच्यापासून मुक्त होणार नाही.का? कारण मी नेहेमीच सूडाच्या साखळ्यांनी त्यांना जखडलेला राहीन. ते आणि मी वस्तू आणि तिची सावली यांसारखे नेहेमीच एकमेकांशी जोडलेले राहू.
थोडक्यात म्हणजे, सूडभावनेवर उतारा न्याय हा नाही, क्षमा हा आहे.


Margaret Atwoodच्या Payback:(Debt, the Shadow Side of Wealth) या पुस्तकातून
                    तुमचा, नंदा

4 comments:

 1. सूडभावनेवर उतारा न्याय हा नाही, क्षमा हा आहे
  हे वाक्य पटत नाही. न्याय हा अंतिम उतारा नाही हे खरे, पण क्षमा हा देखील अंतिम उतारा नाही.
  क्षमा ही न्यायापेक्षा जास्त चांगली. अंतिम उतारा आपण शोधूयात.

  ReplyDelete
 2. न्यायापेक्षा क्षमा हा नक्कीच चांगला उतारा आहे...
  खरी कसोटी या पुढे सुरु होते... नेमक माफ कस करायचं? आणि कोण कोणाला माफ करत असतो?
  नंदा काका या आठवणीसाठी खूप खूप धन्यवाद!!

  ReplyDelete
 3. मला हे विधान बरोबर वाटतं !
  माझ्यावर अन्याय झालाय ह्या भावनेचा विसर पडल्यानंतरच शांत समाधानाने जगणं शक्य होतं.
  न्याय मिळविण्याची प्रक्रिया (म्हणजे माझ्यावर अन्याय झालाय हे सिद्ध करण्याची प्रक्रिया) त्या त्रासदायक प्रसंगांची पुन्हा पुन्हा आठवण करून देते. अधिक त्रास देत राहते. त्रास देणाऱ्यांला आणि स्वतःला क्षमा करणं हा त्रासातून मुक्त होण्याचा सोपा आणि परिणामकारक मार्ग ठरतो.
  (आर.ई.बी.टी. हे तंत्र आणि अल्बर्ट एलीस यांचं काम/जगणं ह्याबाबत अधिक प्रकाश टाकतं)

  अर्थात हे मत सर्व बाबतीत लागू पडत का, ते तपासलं पाहिजे. उदा. निर्भयासारख्या (दिल्ली मधील अत्याचाराच्या घटनेत जीव गमवावा लागलेली मुलगी)मुलीने क्षमाशीलता दाखवून शांत बसावं का ?

  नंदा काका,
  जे तात्विक पातळीवर पटतं ते व्यावहारिक जगण्यात स्वीकारताना आपण (मी)कमी का पडतो ?

  कल्याण

  ReplyDelete
 4. कमजोर व्यक्तीची क्षमा…. म्हणजेच अजून त्रास होण्यापेक्षा क्षमा करून टाकलेली बरी या भावनेतून आलेली क्षमा आणि दुसर्याची दया आल्यामुळे केलेली क्षमा यातील फरक कसा ओळखायचा? आणि या दोनही भावनांपेक्षा तिसरी कुठली भावना क्षमा करण्यामागे असते काय? उदाहरणार्थ Neutral क्षमा?

  ReplyDelete