'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 24 January 2014

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो - नामदेव ढसाळ



प्रसिद्ध दलित कवी व ‘दलित पँथर’चे नेते नामदेव ढसाळ यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचीच एक कविता...


रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो
तूमची आय-बहीण
आजही विटंबली जाते
हाटाहाटातून
मवाल्यासारखे माजलेले
उन्मत्त नीरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात
माणसं
चौकाचौकातून
कोरभर भाकरी पसाभर पाणी
यांचा अट्टाहास केलाच तर
आजही फीरवला जातो नांगर
घरादारावरून
चिंदकातले हात सळसळलेच तर
छाटले जातात आजही नगरानगरातून
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,
किती दिवस सोसायची ही
घोर नाकेबंदी
मरेपर्यंत राहयचं का असंच युद्धकैदी?
ती पाहा रे ती पाहा
मातीची अस्मिता आभाळभर झालीय
माझ्या यातनेनं आता
झिंदाबादची गर्जना केलीय
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,
आता या शहराशहराला
आग लावत चला

Monday, 13 January 2014

पुस्तक परिचय: द स्पिरीट लेव्हल - नंदा खरे

आपण ज्या काळात जगत आहोत त्यात ‘स्पर्धा व विषमता ही आर्थिक प्रगतीसाठी प्रोत्साहवर्धक असते’ असे बरेचदा मानले जाते. हे गृहीतक खरे आहे का? नंदा खरे यांनी ‘स्पिरीट लेव्हल’ या पुस्तकाचा परिचय नुकताच निर्माण ५.३ अ शिबिरात करून दिला. विषमता व तिच्यासोबत आढळणारे दुष्परिणाम यांचा अनेक देशांचा अभ्यास या पुस्तकात मांडला असून ‘समाज कसा हवा’ याविषयी काही दिशा दर्शन त्यातून मिळावे. तो वाचा.

























बीजस्वायत्ततेकडून गुलामगिरीकडे

बियाण्यांवर सत्ता कोणाची असावी? हा प्रश्न शेतकरी तसेच अन्न खाणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा. डॉ. तारक काटे यांचा लेख (आजचा सुधारक) व त्यावर झालेला चर्चा संवाद.

बीजस्वायत्ततेकडून गुलामगिरीकडे – डॉ. तारक काटे
बीजस्वायत्ततेकडून गुलामगिरीकडे ? – सुभाष आठले
पत्रसंवाद – राजीव जोशी
पत्रसंवाद – डॉ. तारक काटे