'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 10 December 2013

पोलादी सत्य: (सरदार पटेल ते नरेंद्र मोदी)

गुजरातमध्ये नर्मदा धरणासमोर सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मी. उंचीचा (साधारणपणे ६० मजली इमारतीएवढा) पुतळा उभारला जात आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणून ओळखला जाणार असलेला हा पुतळा उंचीने ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या दुप्पट आहे. हा पुतळा व सोबतचा प्रकल्प यासाठी अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. निमित्त या पुतळ्याचे, आणि सरदार पटेल यांच्यावरून देशात जोरदार राजकारण सुरू झाले आहे. भाजप व कॉंग्रेस यांच्यात आपणच सरदार पटेलांचे वारस आहोत हे पटवून देण्याची चढाओढ सुरू झाली आहे.

या मुद्द्याला पकडून निखिल वागळे यांनी सुप्रसिद्ध इतिहासकार डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचे शब्दांकन साप्ताहिक साधनाच्या ७ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले. हा अंक पाहण्यासाठी:


No comments:

Post a comment