गडचिरोली-पावसाळा-मलेरियाची साथ हे दरवर्षीचं समीकरण. हे समीकरण सोडवण्याची
जबाबदारी सर्चचे मोबाईल मेडिकल युनिट सांभाळणाऱ्या भूषण देववर आली. ते सुटले का? ते सोडवण्याची काय
प्रक्रिया होती? त्यादरम्यान भूषणचे काय शिक्षण झाले? वाचूया त्याच्याच शब्दांत...
मलेरिया हा गडचिरोली जिल्ह्यासाठी एक मोठा 'थंडी वाजून ताप आणणारा' प्रश्न आहे. २०११-१२
च्या सरकारी आकडेवारीनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या महाराष्ट्राच्या
लोकसंख्येच्या १% पेक्षाही कमी आहे. मात्र महाराष्ट्रातील मलेरियाच्या एकूण
रूग्णांपैकी जवळपास १४% रूग्ण गडचिरोली जिल्ह्याचे आहेत. मलेरियाचे प्रामुख्याने Plasmodium-vivax (PV) व Plasmodium-falsiparum (PF) हे दोन प्रकार
भारतात आढळून येतात. यापैकी PF मलेरियाचा उपचार जर झाला नाही तर तो जीवघेणा ठरतो.
PF मालेरियाचेच रुपांतर cerebral (मेंदू) मलेरिया मध्ये होते, व ह्याच PF मलेरियाचे रूग्ण गडचिरोलीत
प्रामुख्याने दिसून येतात (75%). मुंबईत हेच प्रमाण ८% आहे. गडचिरोलीचा मलेरिया chloroquine resistant आहे. (chloroquine हे औषध सामान्यतः
मलेरियाच्या उपचारासाठी सर्वत्र वापरले जाते.)
साधारण पावसाळ्या नंतर
मलेरियाचे प्रमाण वाढते. मलेरियाशी दोन हाथ करण्यासाठी मी व सर्चच्या मोबाईल
मेडीकल युनिटची (MMU) आमची सर्व टीम सज्ज होतो. ४५ आदिवासी दुर्गम गावांचा मलेरिया नियंत्रण
करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता.
सप्टेंबर महिना आला. आता शत्रू बळकट होत चालला
होता. ह्या महिन्यात मलेरियाच्या रुग्णांची संख्या एकदम २२ वरून ११९ वर गेली व
ऑक्टोबर मध्ये ही संख्या ११४ वर राहिली. आता आम्ही थोडे अधिक सतर्क झालो. आमचे
प्रयत्न सुरूच होते जास्तीत जास्त रुग्णांना उपचार करण्याचे.
नोहेंबर महिना सुरु झाला.
पहिल्याच दिवशी कोंदावाही ह्या गावात गेलो तिथे तर ५०० लोकसंख्येत तब्बल ७१
मलेरियाचे रूग्ण आढळून आले. आता परिस्थिती फारच गंभीर होत चालली होती. सर्चच्या
रुग्णालयात सुद्धा रूग्णांची संख्या वाढत होती व मेंदूच्या मलरियाचे रूग्णसुद्धा
आता आढळून येऊ लागले.

नोहेंबर महिन्यात सगळ्यात जास्त
४१० रूग्ण आढळून आले. ह्या सगळ्याचा उपचार करण्याचा दिव्य अनुभव आम्ही घेतला. आता
मालेरियाचे प्रमाण भरपूर कमी आहे. मलेरियाचे प्रमाण जास्त का अढळले? तर ह्यावर्षी
पाऊस हा उशिरा अनियमित आला व त्यामुळे मच्छरवाढीला अनुकूल असे वातावरण होते.
ह्या मलेरिया नियंत्रण
कार्यक्रमात माझे खूप मोठे पब्लिक हेल्थचे शिक्षण झाले. मोठ्या प्रमाणावर एखाद्या
रोगाचे नियंत्रण कसे करावे हे शिकायला मिळाले. टीमवर्क किती महत्वाचे आहे हे
सुद्धा लक्षात आलं. निर्माणच्या ५.२ शिबिरात जे मलेरिया, डायरिया इ. आजारांचे
प्रमाण नियंत्रित करण्यासाठी जे ग्रुप Presentation केले ते काम प्रत्यक्ष करण्याची संधी ह्यातून माला मिळाली. शिबिरादरम्यान किंवा
शिकत असताना रोगचिकित्सा व त्याच्या नियंत्रणाबद्दल लिहिणे, वाचणे व त्याविषयी
बोलणे मजेशीर व कधी-कधी भीतीदायक असते. परंतु प्रत्यक्षात तो एक संघर्ष असतो.
परंतु तो वेगळाच आनंद व समाधान आपल्याला देवून जातो.
No comments:
Post a Comment