इलेक्ट्रॉनिक्स या विषयात इंजिनिअरिंग ची पदवी घेतल्या नंतर
जयवंत पाटील याने ई-बिझनेस या विषयातून MBA चे शिक्षण घेतले. त्याला पुण्यातल्या कंपनी मध्ये उत्तम पगाराची नोकरी देखील होती. पण सिमेंट काँक्रीटच्या च्या
जंगलात न अडकता त्याला निसर्गाच्या जवळ जाणार काम करायच होतं, म्हणून त्याने सेंद्रीय शेती
करायचा मार्ग निवडला. आपली सगळी कमाई पणाला लावून त्याने नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वाडेगव्हाण
या गावी ३ एकर शेती विकत घेतली. तिथल्या डोंगराळ जमिनी मध्ये मुळा, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर, ब्रोकोली सारख्या भाज्यांचं
उत्पादन घेऊन दाखवलं. लहानपणी मामाच्या गावी असलेली शेती एवढाच त्याचा शेतीशी संबंध होता, पण मनात असलेली शेती विषयीची
ओढ आणि शेतीच्या प्रश्नावर काम करण्याची इच्छा यामुळे तो शेतीकडे ओढला गेला.

जागतिकीकरणाच्या राड्यात आपल्या शेतजमिनी विकून शहराकडे स्थलांतर
करणाऱ्या अनेक युवकांसमोर जयवंतने वेगळे उदाहरण निर्माण केले आहे. याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने त्याच्या कामाचा गौरव करणारा
धडा इयत्ता ११ वी च्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला आहे.
यासाठी जयवंत चे अभिनंदन आणि त्याला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !!
स्त्रोत: जयवंत पाटील (निर्माण ३),
No comments:
Post a Comment