'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 14 January 2019

होमो डेअस, फ्री वॉइस, झिरो टू वन प्रकाशित


 विदर्भातील मागासलेल्या जिल्हामध्ये तरुणाईच्या खिशाला परवडतील आणि मनाला भावतील अशी पुस्तके आपल्या ‘मायमराठी’ या उपक्रमामार्फत उपलब्ध करून द्यायचा चंग बांधणारा आपला मित्र शरद अष्टेकर (निर्माण ४) याने पुस्तक विक्रीसोबत स्वतःची  प्रकाशन संस्था - मधुश्री पब्लिकेशन - पण सुरु केली आहे.
युवल नोह हरारीचं 'सेपियन्स' पुस्तक वाचून शरदला 'अशी पुस्तकं मराठीत का नाहीत?' या प्रश्नाने भेडसावलं. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना जगातील दर्जेदार पुस्तके वाचता आली पाहिजेत, हे स्वप्न घेऊन त्याने मधुश्री प्रकाशन संस्था सुरु केली आणि खुद्द प्रकाशक बनला.
शरदने ‘आय अँम अ ट्रोल’ आणि ‘शॅडो आर्मीज’ या पुस्तकांनी सुरु केलेल्या प्रकाशकाच्या प्रवासात थोड्याच कालावधीत पीटर थीलचं 'झिरो टू वन', मार्क मेन्सन याचं 'द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक' ही पुस्तके मराठीत प्रकाशित केली. या सोबतच युवल नोह हरारीचं 'होमो डेअस' आणि रविश कुमारचं 'फ्री वॉइस' ही सुप्रसिद्ध पुस्तके अनुवादित करून शरदने मराठीत प्रकाशित केली. आणि येत्या काळात बरीच जगप्रसिद्ध पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
दर्जेदार पुस्तके मराठी भाषेत आणण्याच्या शरदच्या या ध्यासाला खूप साऱ्या शुभेच्छा!

शरद अष्टेकरनिर्माण ४
  

मधुश्री प्रकाशनाने अनुवादित केलेल्या पुस्तकाचा लोकमत ऑक्सिजनमध्ये प्रकाशित झालेला पुस्तक परिचय
'द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक - http://www.lokmat.com/oxygen/subtle-art-not-giving-fck-counter-intuitive-approach-living-good-life/

No comments:

Post a Comment