'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 10 January 2013

डॉ. विक्रम सहाने ‘सर्च’ मध्ये रुजू


गडचिरोलीतील आदिवासी भागातील गट्टा व धानोरा येथील सरकारी रुग्णालयांत एक वर्ष वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेतून सेवा दिल्यानंतर निर्माण ४ चा डॉ. विक्रम सहाने पुढील प्रवासासाठी ‘सर्च’ या संस्थेत रुजू झाला आहे. सर्चमध्ये होणाऱ्या असंसर्गजन्य रोग, बाळांच्या न्युमोनियाचे गावातल्या गावात उपचार, मृत्यूची कारणे इ. संशोधनात विक्रमचा सक्रीय सहभाग असेल.

‘सर्च’ बद्दल अधिक माहितीसाठी:
http://searchgadchiroli.org/

No comments:

Post a Comment