'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday 10 January 2013

कुपोषणाच्या साखळीतील कमजोर कडी कोणती?


            गडचिरोली जिल्ह्यातील तुडमेळ या आदिवासी गावात सर्चच्या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून रुग्ण तपासणी करत असताना ३ महिन्याचे एक बाळ कुपोषित असल्याचे (वजन: २.४१० किग्रॅ) डॉ. सुजय काकरमठच्या लक्षात आले. भाताच्या कापणीचे काम सुरू असल्यामुळे ५० किमी दूर जिल्हा रुग्णालयात बाळाला भरती करण्यास पालकांनी नकार दिला. जिल्हा रुग्णालयातील Nutritional Rehabilitation Center (NRC) मध्ये कुपोषित बाळाला पोषणतत्वे देऊन त्याचे वजन वाढवण्याची सोय आहे. तिथे भरती केल्यास खर्च तर येणार नाहीच उलट तेवढ्या काळात आईची बुडणारी रोजी सरकारतर्फे दिली जाईल याची शाश्वती देऊन सुजयने पालकांचे समुपदेशन केले. पालक तयार झाल्यानंतर सुजयने बाळ व आईला गडचिरोलीत NRC मध्ये पोहोचवले. डॉ. मनोज तालापल्लीवार या तरुण व उत्साही सरकारी डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली बाळाला पोषणतत्वे दिली गेली. १३ दिवसांत बाळाचे वजन वाढून २.९३० किग्रॅ झाले. मात्र पुढच्याच महिन्यात तुडमेळ गावाला सुजयने दिलेल्या भेटीदरम्यान NRC मधून सुट्टी होताच अवघ्या १५ दिवसांत बाळाचे वजन तब्बल ४०० ग्रॅ. कमी झाले आहे असे लक्षात आले. दुर्गम गावात आरोग्यसुविधा पोहोचवण्यासाठी फिरते वैद्यकीय पथक पोहोचणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांना गावातले कुपोषित बाळ निदर्शनास येणे, बाळाला जिल्हा रुग्णालयात वेळेत पोहोचवणे, जिल्हा रुग्णालयात उत्तम सुविधा, आकर्षक सरकारी योजना व उत्साही डॉक्टर यांची उपलब्धता इतके सारे होऊनही कुपोषित बाळाची स्थिती ‘जैसे थे’ का? कुपोषणाच्या किंवा एकूणच आदिवासींच्या अनारोग्याच्या साखळीतील कमजोर कडी कोणती असे प्रश्न या बाळाच्या निमित्ताने निर्माण झाले आहेत.

No comments:

Post a Comment