'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 13 February 2013

तिनका तिनका जर्रा जर्रा


प्रत्येक नवे तंत्रज्ञान माणसाच्या विस्तारासारखे असते. त्या तंत्रज्ञानाचा वापर सवयीचा झाला की ते तंत्रज्ञान माणसाला, त्याच्या शरीरक्रियांना, त्याच्या विस्ताराला बदलू लगते. हे सतत होत राहते.
मग माणूस ते तंत्रज्ञान बदलू लागतो. मधमाश्या जशा वनस्पतींच्या प्रजनन-इन्द्रियान्चे काम करतात, तसा माणूस तंत्रज्ञान बदलत यंत्रांचे प्रजनन-इंद्रिय बनतो. तो यंत्रांची प्रजा (संख्या) वाढवू लागतो. त्यांच्यात बदल करून त्यांना उत्क्रांत करू लागतो.
यंत्रेही त्यांच्या बाजूने माणसांच्या इच्छा-अपेक्षा पूर्ण करून देतात. माणसांना श्रीमंत करतात.
Marshall McLuhan हा गेल्या शतकातला सर्वांत प्रसिद्ध माध्यमशास्त्राचा तत्वज्ञ. त्याच्या Understanding Media या पुस्तकातील The Gadget Lover या निबंधातला हा उतारा.
आता तुम्हाला एक काम सुचवतो; तुम्ही मोबाईल फोन तंत्रज्ञानाबाबत वरच्या उताऱ्यातले म्हणणे तपासून दाखवायचे!

No comments:

Post a Comment