'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 13 February 2013

समीक्षा फराकातेचे ‘चैतन्य’सोबत काम सुरू


नमस्कार. मी निर्माण ४ची समीक्षा. पुणे विद्यापीठात एम.ए. करते. मी ‘चैतन्य’ नावाच्या संस्थेसोबत काम करायचे ठरवले आहे (ज्याबद्दल अमृतने मला सुचविले होते). मी त्यांच्या ‘बटवा’ या पत्रिकेचे या महिन्यासाठी संपादन केले आणि त्यांच्या कामात inputs देण्याच्या दृष्टीने दोन विषयावर वाचते आहे: गरिबी कशी मोजली जाते, त्यासंबंधीचे विविध दृष्टीकोन आणि दिल्ली रेप केसमुळे उठलेल्या वादळानंतर ‘बलात्कार’ या घटनेकडे कसे बघितले जाते. मला ‘चैतन्य’सोबत (किंवा सध्या कोणाही सोबत) अशांच पातळ्यांवर काम करता येईल. या निमित्ताने मायक्रोफायनान्स म्हणजे काय असते हे कळाले. सुधा कोठारींची त्यांच्या कामातील कार्यक्षमता हा अर्थात एक शिकविणारा अनुभव आहे.
‘चैतन्य’बद्दल अधिक माहितीसाठी: https://sites.google.com/a/chaitanyaindia.org/website/

No comments:

Post a Comment