'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 28 April 2015

डिग्रीपेक्षा आनंददायी शिक्षण

कुष्ठरोगावर वेळीच उपचार न झाल्यास हाताची बोटे वाकडी होतात, किंवा पावलातील ताकद जाऊन चालताना अडचण येऊ लागते तसेच काही अपघातामुळे भाजल्यानंतर अनेकांचे सांधे वाकडे होतात. या प्रकारच्या अपंगत्वावर शस्त्रक्रिया करण्याकरता गेली चौदा वर्षे इंग्लंडवरून डॉ. अश्विन पावडे यांची टीम आनंदवनात येत आहे. या टीममध्ये hand surgeons, plastic surgeons, anesthetists, nurses शस्त्रक्रिया करण्यासाठी येतात. या शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाचे हात/पाय प्लास्टर मध्ये बांधले जातात. एक-दीड महिन्यानंतर या रुग्णांच्या हालचाली पूर्ववत येण्याकरिता, स्नायूंची ताकद वाढवण्याकरिता फिजिओथेरपीची आवश्यकता असते. याकरता डॉ. पावडे यांच्या टीमसोबतच केट आणि मेरील या फिजिओथेरपिस्ट गेली १२ वर्षे दर वर्षी एक आठवड्याकरिता येत होत्या. यात रुग्णांना व्यायाम शिकवणे, शस्त्रक्रिया झालेल्या हाताला हलकी हलकी कामे करायला शिकवणे आणि ताकद येईपर्यंत आधारासाठी splint (हाताला/बोटांना आधार देणाऱ्या वेगवेगळ्या पट्ट्या) देणे या गोष्टी केल्या जातात. शिक्षणाने फिजिओथेरपीस्ट असणारी गौरी चौधरी (निर्माण ४) २०११ पासून गेली पाच वर्षे या कामात सहभागी होत आहे. यादरम्यान, महाविद्यालयीन शिक्षण घेताना कधीही न पाहिलेल्या आजारांचे रुग्ण तिला पाहता आले. केट आणि मेरीलकडून अनेक नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. परंतु, २०१२ साली घडलेल्या दिल्ली बलात्कार प्रकरणामुळे त्यांचे या कामाकरता भारतात येणे बंद झाले. डॉ. पावडे आणि टीम यांनी स्थानिक फिजिओथेरपिस्टनी या कामाची जबाबदारी घ्यावी असे सुचवल्यामुळे फिजिओथेरपीची जबाबदारी गौरी, डॉ. अर्चना रानडे (Neuro physiotherapist) आणि डॉ. सोना कोळके (Orthopedic physiotherapist) या चमूकडे आली.  
Splints बनवायला महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान शिकवले जात नाही. परंतु Youtube वरील व्हीडीओच्या मदतीने यावर्षी ही टीम splints बनवायला शिकली.  या सर्व अनुभवात गौरीला परदेशातील काम करण्याची पद्धत फारच वेगळी वाटली. शस्त्रक्रिया करताना surgeons सोबत फिजिओथेरपिस्ट/ऑक्युपेशनल थेरपिस्ट यांचा शस्त्रक्रियेत सहभाग असणे, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला कोणत्या हालचाली करता येणे अपेक्षित आहे व त्यासाठी कोणत्या स्नायूवर कशा प्रकारे शस्त्रक्रिया करावी लागेल यावर surgeon आणि फिजिओथेरपिस्ट/ऑक्युपेशनल थेरपिस्ट मिळून निर्णय घेतात. आपल्याकडे हा प्रकार फारसा आढळत नाही. प्रत्यक्ष काम करता करता शिकण्याचा अनुभव हा महाविद्यालयीन डिग्रीपेक्षा नक्कीच खूप आनंददायी ठरल्याचे गौरी सांगते.
स्त्रोत : गौरी चौधरी, gauriec@gmail.com

No comments:

Post a Comment