'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 28 April 2015

शिक्षण Live

              पूर्ण वेळ सर्चमध्ये काम करण्याखेरीज २०१४-१५ मध्ये ५८ निर्माणी सर्चच्या विविध कार्यक्रमांत स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले. यात शस्त्रक्रिया शिबीरे (२०), आमची निरोगी आश्रमशाळा (११), तंबाखूमुक्ती अभियान (९), निर्माण शिबिरांचे समन्वयन (६), दवाखाना (५), दारूबंदी सर्वे (४), लकव्याच्या रुग्णांचे अपंगत्व मोजण्यासाठी सर्वे (१), सौर उर्जा प्रणाली (१) आणि दंतवैद्यकीय शिबीर (१) इ. कार्यक्रमांचा समावेश होता. यात विशेष गोष्ट म्हणजे अवैद्यकीय स्वयंसेवकांची मोठी संख्या ! या मित्रमैत्रीणींमुळे सर्चच्या कामांत हातभार लागतो व त्यांचेही नयी तालीम पद्धतीने शिक्षण होते. सर्च ही निर्माणसाठी हक्काची संस्था असल्याने येणाऱ्या वर्षात अधिक स्वयंसेवकांसाठी अशा संधी निर्माण करण्याचा प्रयत्न निर्माणची टीम करेल.
              सालाबाद प्रमाणे यावर्षीही ९ ते १२ मार्च दरम्यान शोधग्राम मध्ये मेजर सर्जरी कॅम्प उत्तम रीतीने पार पडला. शिबिरादरम्यान एकूण ९६ रुग्णांच्या शस्त्रक्रिया गेल्या. निर्माणच्या १० डॉक्टरांच्या चमूने शिबिरादरम्यान विविध कामात हातभार लावला. यातील काहींच्या बोलक्या प्रतिक्रिया

शस्त्रक्रिया शिबिरादरम्यान शिकायला मिळालेल्या गोष्टी -
  • जिथे पूर्ण वेळ सर्जन्स उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी शिबिराच्या माध्यमातून पेशंट्स जमा करून शस्त्रक्रिया करता येतात आणि त्याही माफक दारात! ही गोष्ट या शिबिर या माध्यमाचे महत्व समजावून गेली. 
  • शस्त्रक्रिया म्हणाल्यावर रूग्ण (आणि नातेवाईक) धास्तावलेले असतात. सोबतच आजार आणि उपचाराबाबत असणाऱ्या गैर-समजुती असतातच. म्हणूनच शिबिराच्या आदल्या दिवशी सर्व रुग्ण व नातेवाईकांना शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर काय करायला हवे व काय नको हे समजावून सांगितले जाते. यातून फक्त शस्त्रक्रियेचीच नाही तर रुग्णाच्या पूर्ण एकूण स्वास्थ्याच्या जवाबदारीची जाणीव आम्हाला झाली.
  • सहकार्याची भावना व पडेल तेव्हा काम करायची तयारी; हे माझे, हे तुझे काम असे न करता, डॉक्टर्स, सिस्टर्स आणि इतर सहकाऱ्यांसोबत समोर येईल ते काम करण्यामुळे कामाला येणारी गती, उत्साह आणि आनंद आला.
  • वस्तूंचा योग्य व माफक वापर, तसेच वापरत असलेल्या वस्तूप्रती व रुग्णांप्रती जपलेली आपलेपणाची, जवाबदारीची भावना, डॉक्टर्स, सिस्टर्स, कर्मचारी, रूग्ण सर्वांना एकच जेवण देताना दिसून आलेला समत्वभाव सर्चच्या टीमकडून शिकता आला.
  • कॉलेजमध्ये आत्तापर्यंत न पाहिलेले रूग्ण, शस्त्रक्रिया पाहायला मिळाल्या. ऑपरेशन थिएटर मध्ये वावरताना तिथले रितीरिवाज, नियम समजावून घेण्यास मदत झाली. यातून वाचनाचे विषयही सापडले.
  • मॉनिटरिंग दरम्यान रुग्णांच्या फाईल्समध्ये नोंदी करताना सुसूत्रता राखण्याची गरज, रुग्णांची बोलताना घ्यावयाची काळजी, कशी घ्यावी हे समजले.
  • काम करताना होणाऱ्या चुका, आणि त्या टाळण्यासाठी घ्यायची काळजी समजली.
  •  डॉक्टर व रुग्णातील संबंधातला मोकळेपणा, सहकार्य, प्रेम आणि एकूण शिबिराची कौटुंबिक आखणी आणि आदरातिथ्य हा एक अभूतपूर्व अनुभव होता.

सुरज म्हस्के, suraj.mhaske038@gmail.com

         
           शस्त्रक्रिया शिबिरामध्ये माझं शस्त्रक्रिया व वैद्यकशास्त्राबद्दल, माणसाच्या कार्यक्षमतेबद्दल, नियोजनाबद्दल आणि माझ्या स्वतःबद्दल अस विविध अंगांनी लर्निंग झालं.
            शस्त्रक्रिया (पाहताना) ती खूप अवघड पद्धत वाटली, परंतु त्यामधली एकामागून एक होणारी प्रत्येक छोटी गोष्ट सोपी व सहज होती. प्रत्येकाला विशिष्ट काम आणि त्याची नेमकी पद्धत समजावून सांगितली तेव्हा ते काम आपल्यालाही Possible आहे हे ध्यानात आलं.
            सर्जन व त्यांची टीम आणि सर्चची पूर्ण टीम सकाळपासून एक जेवणाचा ब्रेक सोडला तर सतत काम करत होते आणि मला येवढ्या कार्यक्षमतेची व उर्जेची गरज आहे आणि ते होऊ शकते हे लर्निंग झालं. शिबिरादरम्यान होणारं एवढं काम नियोजनामुळेच शक्य झालं. योग्य नियोजन असल्यास मर्यादित वेळात आणि मर्यादित लोकांमध्येही काम यशस्वीरित्या पार पडू शकते हे समजलं.
            कॉलेजच ‘गॅदरिंग’ चालू असताना मी या कामासाठी आलो. त्यामुळे मला माझा आनंद कशात आहे हे ओळखता आलं. आणि सर्च मध्ये होळी खेळताना देखील फारच मजा आली.
-    रोहित गणोरकर, rohitganorkar@gmail.com

            गेल्या ४ महिन्यात मी दोन (सर्जरी) camps attend केले. यातला पहिला कॅम्प म्हणजे माझ्यासाठी खुला झालेला अगणित नवीन अनुभवांचा खजिनाच होता. मग ते शोधग्रामच निसर्गरम्य वातावरण असो, तिथल्या दवाखान्यातला Self-Dependence असो, स्वतःची ताट-वाटी धुण्याच स्वावलंबन असो वा सायंकाळच्या सर्वधर्मसमभाव प्रार्थनेची शांतता असो..
            आणि दुसरा कॅम्प मात्र या (पहिल्या शिबिराच्यावेळी झालेल्या) सर्व लर्निंगच प्रत्यक्ष application करण्याची संधीच होती. कॅम्पच्या आदल्या दिवशी, वैभवदादा, मृणालवाहिनी, रुग्णांना orientation देतात आणि त्यांना सूचना समजल्या की नाही हे पेशंटच्या ‘हो’ या उत्तरातून समजून घेतात. यातून समजलं की एक डॉक्टर म्हणून पेशंट्सना प्रेमाने, शांततेने हाताळले पहिजे.
            मेडिकल कॉलेजमध्ये सेकण्ड इयरपर्यंत फार संबंध न आलेल्या सध्या सोप्या बेसिक गोष्टी शिकायला मिळाल्या, उदा. ब्लड प्रेशर, पल्स मोजणे, Pre-Post operation preparations, intracath, रुग्णांची विचारपूस करणे. शिवाय योगेश दादासोबत घालवलेल्या वेळातून हे कळलं की आपल्या सभोवताली घडणाऱ्या गोष्टीतून आपल्या ज्ञानात भर कशी घालून घ्यायची, आणि माझ्यात pharmacology बद्दल निर्माण झालेल्या इंटरेस्टचे श्रेयही योगेश्दादाचच.
            आणि सर्जरी साठी आलेले सर्व सर्जन्स.. इतके प्रेमळ सर्वजण, सर्जरी करताना त्यांनी सांगितलेले बारकावे, प्रत्येक नवीन केसची दिलेली सविस्तर माहिती, आणि एवढ्या धावपळीत शांत चित्ताने काम करण्याची त्यांची वृत्ती, रात्री रंगणाऱ्या गप्पांच्या मैफिलीत ‘आपल्यातला संवेदनशील डॉक्टर जागा कसा ठेवायचा’ या विषयावरची झालेली चर्चा सर्वकाही खरंच टिपून ठेवण्यासारख होतं.

-    आशंका मामिडवार, ashanka.mamidwar@gmail.com

No comments:

Post a Comment