There he was, a
man in a village in the tribal hinterlands of Maharashtra, so far away from the
cities, geographically and economically. For me, his 'google.com' shirt
symbolizes the unrealized possibility of development due to neglect by society.
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth
Showing posts with label निर्माणीच्या नजरेतून. Show all posts
Showing posts with label निर्माणीच्या नजरेतून. Show all posts
Wednesday, 4 April 2018
Saturday, 4 March 2017
निर्माणीच्या नजरेतून
Village Ambulance
दुसेगुडा या गावी सर्वे करण्यासाठी गेले
असताना, आजारी आजीबाईला तिच्या घरचे दुसऱ्या गावी ३ कमी दूर उपचारासाठी घेऊन जात होते. आजीबाईला धड चालताही येत
नव्हते. मग नेणार कसे?
हृतगंधा देशमुख, निर्माण ४
Thursday, 27 October 2016
निर्माणीच्या नजरेतून
फक्त पाच शब्दांचं वाक्य, पण काय काय अर्थ काढता येतील?
जमिनीची मालकी आणि
सत्ता यांचा संबंध? - “जमिनदारांचीच सामाजिक आणि राजकीय सत्ता असते.”
की भविष्यात येणाऱ्या
‘अन्न सुरक्षितता’ या प्रश्नाशी मार्मिक तोंडओळख? - “वाढत्या लोकसंख्येसोबत प्रत्येकाला
स्वतःचं अन्न पिकवता आलं पाहिजे. म्हणून ज्याच्याकडे शेती आहे तोच तगू शकेल.”
की शेतीतील
निराश-हताश वातावरणाला ऊर्जा देण्याचा प्रयत्न? - “शेतीला कंटाळलेल्या बळीराजा,
शेतजमीन विकून तू असहाय्य होशील”
तुम्हाला अजून काही
वेगळा अर्थबोध होतोय?
सौजन्य: अमोल शैलेश (निर्माण ६)
Wednesday, 31 August 2016
Monday, 27 June 2016
Saturday, 30 April 2016
अशी होळी सुरेख बाई
‘होळी’ चा सण
साजरा करायला नागपूर गटाची काही मित्रमंडळी ‘रवाळा’ या
गावी गेली. रवाळ्याला वसंतभाऊ व करूणाताई फुटाणे आणि कुटुंबिय नेैसर्गिक शेतीचे
प्रयोग करत आहेत. चार दिवसांच्या अभ्यास सहलीत या मित्रमंडळींनी होलिकादहन, धुळवड
या गोष्टी भलेही केल्या नसतील, पण त्यांनी निसर्गातील ज्या रंगांचा अस्वाद घेतला; गौरी, करुणाताई
आणि घरातील सर्वांमधील जे प्रेमाचे, मायेचे रंग अनुभवले; वसंतभाऊ, तन्मय
यांच्या प्रेरणादायी विचारांचे रंग अनुभवले; शेतात
काम करून शेतकरी आणि शेतमजूर यांना कराव्या लागणा-या ढोरमेहनतीचेही रंग अनुभवले; त्यांची
काही क्षणचित्रे ...
तुरीच्या दाण्यांपासून १, २ नाही
तर चक्क ८०० किलो तुरीची डाळ तयार केली!
|
२०-२२
प्रजातींनी नटलेली आमराई मोठ्या उत्साहाने फिरून दाखवताना वसंतभाऊ
|
निर्माणीच्या नजरेतून . . .
दुष्काळ मोहिमेच्या
कामानिमित्त औरंगाबादला गेला असताना अमोलला(निर्माण ६)
तिथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या होस्टेलच्या विद्यार्थ्यांनी
होस्टेल मधली झाडं वाचवण्यासाठी केलेला भन्नाट जुगाड पाहायला मिळाला. सोबतच तिथली निर्माणची टीम आणि त्यांचे मित्र होस्टेलच्या परिसरात श्रमदानही
करताना दिसले. त्यांच्या या कामाची झलक या फोटोतून पाहायला मिळते . . .
फोटो सौजन्य: अमोल शैलेश,
Sunday, 28 February 2016
Thursday, 2 July 2015
निर्माणीच्या नजरेतून
तेंदू इकोनॉमी थोडक्यात . . .
७० पानांचा १ पुडा, १०० पुड्यांचा
१ खोका, १ खोक्याची
मजुरी रु.२८०/- आणि ग्रामसभेला
रॉयल्टी रु. १३०/- , १ गावाचे
सरासरी १,६०० खोके, म्हणजे एका
गावाची एकूण उलाढाल तब्बल रु. ६.५ लाख!
Subscribe to:
Posts (Atom)






