'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 13 June 2013

चारुता गोखलेचे नवजात शिशू आरोग्य या विषयातील केंद्र सरकारच्या एका उपक्रमात संशोधक म्हणून काम सुरु

चारुता गोखलेने (निर्माण १) पुण्यात Public Health मध्ये masters केल्यानंतर दीड वर्ष गडचिरोलीत मलेरियावर काम केले. गेल्या सहा महिन्यांपासून ती पुण्यात पीएचडीची तयारी करत आहे. पीएचडी चे काम सुरु होईपर्यंत तिने नुकताच National Health System Resource Center (NHSRC) – Delhi, आणि State Health System Resource Centre (SHSRC)- Pune यांनी संयुक्तपणे सुरु केलेल्या एका उपक्रमात Research manager म्हणून काम सुरु केले आहे. महाराष्ट्रात २०१० पासून नवजात बालक मृत्यूदर कमी करण्याच्या दिशेने एक पाउल म्हणून जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये special newborn care units ची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अशी एकूण ३४ केंद्र असून या उपक्रमाअंतर्गत १४ केंद्रांचे मूल्यमापन केले जाईल. या संशोधनाची कार्यपध्दती (research protocol) तयार करणे, सर्वेक्षणाची साधने तयार करणे, सहभागी व्यक्तींचे प्रशिक्षण करणे, यातून बाहेर आलेल्या माहितीचे विश्लेषण करणे व अखेरीस यावर आधारित अहवाल तयार करणे अशाप्रकारचे चारुताचे काम असेल. एकूण ३ महिने चालणाऱ्या या उपक्रमात पुण्यातील काही संशोधक आणि (NHSRC)- दिल्ली येथील डॉ. आनंद बंग यांच्या मार्गदर्शनाखाली चारुता काम करत आहे. मूल्यमापनाचा हा उपक्रम भारत सरकारला संपूर्ण देशात राबवायचा असून महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये पथदर्शी उपक्रम म्हणून हा अभ्यास केला जाईल. व त्यातून पुढे आलेल्या निष्कर्षांच्या आधारे अंतिमत: तो देशभरात राबवला जाईल.

No comments:

Post a Comment