'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 1 August 2013

गृत्समद

‘नयी तालीम’ पद्धतीत एखादे काम करण्याला जेवढे करण्याला महत्त्व, तेवढेच आपल्या करण्याचा परिणाम तपासण्याला आणि तेवढेच ते काम अधिक चांगले कसे करता येईल याचा अभ्यास करून ते पुन्हा करण्याला. अशा प्रकारच्या कृतीशील संशोधनाचे एक प्राचीन भारतीय प्रतीक म्हणजे गृत्समद ऋषी ! आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे राहणाऱ्या गृत्समद ऋषींनी कापसाच्या लागवडीचा जगातला पहिला प्रयोग केला. गृत्समद ऋषींबद्दल आणि त्यांच्या प्रयोगांबद्दल हा विनोबांचा लेख !

तुम्हाला 'गृत्समद' हा लेख आवडला का?

3 comments:

 1. प्रिय ,नायना
  लेख फार छान आहे , यात वैज्ञानिक व अध्यात्मिक ऋषी यांचा परिचय झाला , मी मागील सप्ताहात वर्धा निर्माणी ग्रुप सोबत गोपुरी येथे गेलो होता तेथे करुना फुटणे ताईनि गृत्स्मत ऋषीन बद्दल माहिती दिली होती व तुमच्या बद्दलच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या , हा लेख वाचल्या नंतर मला निर्माण शिबिरात एके संध्याकाळी पिंपळ मध्ये प्रार्थना आटोपल्यावर सर्च मध्ये काम करीत असलेल्या एक निर्मानीच्या(नाव आठवत नाही ) पालकांशी तुम्ही बोलत होतात,त्यांनी तुम्हला म्हटल होत कि तुमचे विज्ञानिक(scientist ) आणि आध्यात्मिक असे दोन्ही रूप मला पाहायला मिळाले ,तेव्हा तुम्ही सांगितलेले गांधीजीनी म्हटलेले " वैज्ञानिक ऋषी हवेत ".या संदर्भातील वाक्य आठवले .

  आपला निर्माणी
  भूषण देव .

  ReplyDelete
 2. पाढे, कापसाची शेती आणि चंद्र्प्रकाशाचा गर्भावर होणारा परिणाम अशा तीन गोष्टींचा विचार करणारी व्यक्ती एक असू शकते. पण का सुचावं एखाद्या मनाला हे सारं ? केवळ व्यावहारिक गरजांपोटी किंवा कुतूहलापोटी हे घडू शकतं ?

  ...हा श्लोक ह्यानेच "पाहिलेला", असं लिहिलंय विनोबांनी. वाचलेला, सांगितलेला किंवा लिहिलेला असं नाही. असं का ? श्लोक पाहणं म्हणजे काय ?

  कल्याण

  ReplyDelete
 3. nainache mi abhar manto....ani asech vacahn aplya kadun vachayla milo hi ichha....

  chandra prkashacha/grahnacha parinaam garbha varti hoto...he khup divsapasun samajyat bolale jate...te khare ahe ka ? ya bddal kahi vachayla milel ka?

  ReplyDelete