'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday 1 August 2013

The march of protest

गेल्या महिन्यात एका आठवड्याच्या कालावधीत ३ खंडांमध्ये पसरलेल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. ब्राझीलमध्ये बसभाड्यात झालेल्या वाढीविरुद्ध, तुर्कीमध्ये बांधकाम प्रकल्पाविरुद्ध, बल्गेरियात सरकारी पक्षपाताविरुद्ध, इंडोनेशियात इंधन दरवाढीविरुद्ध जोरदार आंदोलने होत आहेत. इजिप्तमध्येही वेगळी परिस्थिती नाही. दिल्लीच्या तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराविरूद्ध आणि भ्रष्टाचाराविरुद्ध भारतभर झालेल्या आंदोलनांना आपण साक्षी आहोत. एकामागून एक, सोशल मेडीयाच्या मदतीने थक्क करायला लावणाऱ्या वेगाने पसरलेली, मध्यमवर्गीय सर्वसामान्यांनी केलेली ही आंदोलने. यांची शक्तीस्थाने व मर्यादांचा आढावा या लेखात घेतला आहे. लोकशाही आणि हुकूमशाही असणाऱ्या देशांत यांचा काय परिणाम झाला? येत्या वर्षभरात या आंदोलनांचे स्वरूप काय असेल? Bird’s eye view दाखवणारा ‘The Economistमधील हा लेख जरूर वाचा...

http://www.economist.com/news/leaders/21580143-wave-anger-sweeping-cities-world-politicians-beware-march-protest

तुम्हाला 'The march of protest' हा लेख आवडला का?

No comments:

Post a Comment