'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth
Thursday, 27 October 2016
गडचिरोली जिल्ह्याला मिळाली मानसोपचारतज्ज्ञ
निर्माण ४ ची आरती गोरवाडकर सप्टेंबर २०१६ पासून सर्च मधील
मां दंतेश्वरी रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून रुजू झाली आहे. तिच्या रूपाने
सर्चला व परिणामी गडचिरोली जिल्ह्याला पूर्णवेळ मानसोपचारतज्ज्ञ मिळाली आहे. गेली
२ वर्षे तिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) भावनगर, गुजरात
येथून psychiatry या विषयात PG
residensy पूर्ण केली.
आपल्या कामाबद्दल सांगताना आरती म्हणाली, “१०
लक्ष लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मानसिक आजाराचे प्रमाण खूप आहे. मी
सध्या सर्चच्या दवाखान्यात depression,
anxiety, व्यसनाशी आणि इतर
कारणांमुळे होणारे मानसिक आजारांचे उपचार करीत आहे. यासोबतच गडचिरोली जिल्हा दारू
व तंबाखू मुक्ती कार्यक्रमाअंतर्गत (मुक्तीपथ) सर्चला व्यसनमुक्ती केंद्र सुरु
करीत आहोत. हे काम खूप उत्साहवर्धक आणि तेवढेच आव्हानात्मक देखील आहे. लहान
मुलांचे मानसिक आरोग्य आणि त्यांच्या गरजा हा माझा आवडीचा विषय आहे. येणाऱ्या
काळात त्यावर अधिक काम करण्याचा माझा मानस आहे.”
आरती गोरवाडकर (निर्माण ४)
मुक्कामपोस्ट मन्नेराजाराम
निर्माण ५ चा डॉक्टर दिग्विजय बंडगर एप्रिल २०१६ पासून गडचिरोली
जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात
वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहे. सोलापूर GMC मधून MBBS चे शिक्षण पूर्ण
केल्यानंतर त्याने MOship करायचा निर्णय घेतला आणि गडचिरोली जिल्ह्यात काम करायचे
ठरवले. तिथे काम करताना त्याला आलेला अनुभव त्याच्याच शब्दात...
मी
कुणी लेखक नाही, लेख लिहिण्यासाठी आवश्यक शब्दसंग्रह
माझ्याकडे नाही पण अनेक अनुभव असे आले की ते सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे वाटले
म्हणून लिहित आहे. या लेखातून “बघा मी किती काम करतो!”
हे सांगायचा माझा उद्देश नाही. परिस्थितीची जाणीव करून देणे हाच मी
याचा उद्देश ठेवला आहे.
गेले सात महिने मी महाराष्ट्राच्या
अतिदुर्गम भागात एका प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करत आहे. मन्नेराजाराम गावी
असलेल्या या PHC मध्ये पवन मिल्खे (निर्माण ३) याने
देखील काम केले आहे. त्या गावाला जाणारा १८ किमी चा रस्ता खूपच खराब असल्याने तो
पार करून मोठ्या इस्पितळात गंभीर रुग्णाला पाठवायला देखील एक-दीड तास लागतो. या
रस्त्यामुळे गेल्या ६ महिन्यात दगावलेल्या रुग्णांची संख्या १० इतकी आहे. त्यात
दोन सर्पदंश झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. रस्ता खराब असल्याने व कमाई कमी होत
असल्याने तिथे गेली ६ महिने बस सेवा देखील बंद होती. गावकऱ्यांनी प्रयत्न करून
गेल्या महिन्यात ती सुरु करून घेतली. (बघू किती दिवस चालते!)
नैसर्गिक सौंदर्याचं मात्र या भागाला
वरदान लाभलं आहे. अनेक नदी नाले, झाडे, खूप जास्त पाऊस आणि खूप जास्त धुकं! पण कनेक्टीव्हिटीचा खूपच त्रास आहे.
फोनला रेंज नाही, लाईट कधी कधी असते. सरकारी आणि सामाजिक
क्षेत्रातल्या लोकांचं प्रचंड दुर्लक्ष! ६ किमी वर छत्तीसगडचा बस्तरचा भाग! त्या
भागातूनही पेशंट इकडे येतात. त्यांना येताना इंद्रावती नावाची नदी लागते.
उन्हाळ्यात पाणी नसेल चालत व पाणी असेल तर डोंग्यानं (छोटी नाव) ते येतात. छत्तीसगडच्या या भागातील एका महिलेची
गोष्ट सांगतो.
एक छत्तीसगडची महिला, नऊ महिने गरोदर, कळा चालू झाल्याने प्रसूतीसाठी
आमच्याकडे यायला निघाली. ती १० किमी अंतरावर असलेल्या नदीपलीकडच्या भागातील होती.
बैलगाडीने ती नदी पर्यंत पोहोचली पण नदीत रेती असल्याने बैलगाडी पुढे जात नव्हती.
तर तिची मैत्रीण तिचा नवरा पायीच नदी पार करू लागले. उन्हाळा असल्याने रेती खूप
गरम होती आणि पायदेखील नदीत खचत होते. नदीच्या मध्यावर आल्यावर तिच्या कळा वाढल्या
आणि उभ्या उभ्याच तिची प्रसूती झाली. त्या गरम वाळूवर तिचं नवजात अर्भक पडलं.
त्याची पाठ पोळली, रेती चिकटली. त्यांनी केस बांधून, साडीच सुत काढून नाळ बांधली व दगडाने ठेचून ती तोडली. नाळ व वार (placenta)
पडू न देता तिला घेऊन माझ्याकडे पोहोचले.
रक्तस्त्राव
झाल्याने बाळ माझ्याकडे येण्याआधीच मरण पावलं होत आणि वारचा काही भाग आतमध्ये
राहिल्याने बाईचा देखील खूप रक्तस्राव झाला होता (PPH). त्या
बाईला मग RL (सलाईन) लावून शुद्धीवर आणलं. (जवळपास ६ बॉटल RL
लावलं) रक्ताची उपलब्धता नव्हती. लोकबिरादरीतही रक्ताची सोय नव्हती.
तिला ३ तास अंतरावर असलेल्या अहेरीच्या रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय झाला. PPH
व्यवस्थापन केलं. (oxytocin, methorgin, ballon
catheterization etc). आणि मृतबाळ तिथेच दफन करून ते PHC च्या गाडीने अहेरीच्या रुग्णालयात गेले. कनेक्टीव्हिटी नसल्याने तिचा followup
नाही घेता आला.
प्रगत
महाराष्ट्रात आणि महासत्ता होण्याची स्वप्न बघणाऱ्या भारतात ही अशी दयनीय अवस्था.
त्या दिवशी सगळ्यांचाच खूप राग आला. पण काय करणार?
एक
दिवशी OPD
मध्ये बसलो असताना एक बाई कानाला लेपड लावून, हाताला
intercath लावून व हातात अहेरीच्या रुग्णालयाच कार्ड घेऊन
आली. ती तीच छत्तीसगडची बाई होती. ती गोळ्या इंजेक्शन घ्यायला आली होती. ती
वाचल्याचा मला इतका आनंद झाला, मी OPD मध्ये
आनंदाने उडीच मारली. सिस्टर, पेशंट माझ्याकडे बघत राहिले!
त्या
दिवशी मी होतो म्हणून किमान त्या बाईचे तरी प्राण वाचू शकले. पण हे असं किती दिवस
सुरु राहणार? आरोग्याचा मुलभूत हक्क यांना कधी मिळणार?
या लोकांना चांगली आरोग्यसेवा पुरवण्यासोबतच शासनाने यांच्यापर्यंत
पोहोचायला हवे यासाठी तालुका व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांपुढे ही परिस्थिती मांडत
राहणे व त्यांना प्रश्न विचारात राहायला पाहिजे, याची मात्र
मला प्रकर्षाने जाणीव झाली.
दिग्विजय
बंडगर (निर्माण ५)
निर्माणीच्या नजरेतून
फक्त पाच शब्दांचं वाक्य, पण काय काय अर्थ काढता येतील?
जमिनीची मालकी आणि
सत्ता यांचा संबंध? - “जमिनदारांचीच सामाजिक आणि राजकीय सत्ता असते.”
की भविष्यात येणाऱ्या
‘अन्न सुरक्षितता’ या प्रश्नाशी मार्मिक तोंडओळख? - “वाढत्या लोकसंख्येसोबत प्रत्येकाला
स्वतःचं अन्न पिकवता आलं पाहिजे. म्हणून ज्याच्याकडे शेती आहे तोच तगू शकेल.”
की शेतीतील
निराश-हताश वातावरणाला ऊर्जा देण्याचा प्रयत्न? - “शेतीला कंटाळलेल्या बळीराजा,
शेतजमीन विकून तू असहाय्य होशील”
तुम्हाला अजून काही
वेगळा अर्थबोध होतोय?
सौजन्य: अमोल शैलेश (निर्माण ६)
When in drought, save the livestock
‘पशुधन’ हा
शेतकऱ्यांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात विशेषतः
मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळ प्रवण भागांत शेतीच्या प्रत्यक्ष कामांत तसेच
शेतीच्या उत्पन्नासोबत जोडधंदा म्हणून हे पशुधन मोठे महत्वाचे आहे. परंतू
दुष्काळात जिथे माणसांनाच पुरेसे पाणी मिळत नाही तिथे मुक्या जनावरांची परिस्थिती
अधिकच बिकट! गेल्या दोन वर्षातील दुष्काळात हेच चित्र पाहायला मिळाले.
ही परिस्थिती कशी बदलता येईल? दुष्काळात जनावरांना पुरेसा चारा आणि पाणी कसे उपलब्ध करून
देता येईल? त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीची जपणूक कशी करता
येईल? अशा प्रश्नांचा आढावा घेणारा सजलचा लेख ‘India
Water Portal’ च्या वेबसाइट वर सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध झाला.
इच्छुक वाचकांसाठी ‘When
in drought, save the livestock’ या त्याच्या लेखाची लिंक –
सजल कुलकर्णी (निर्माण २),
Book Review - India after Gandhi - Ramchandra Guha
I was reading the news of Kashmir issues.
It touched my heart and soon remembered the sentence, “His passing away meant
the end of a negotiated settlement of the Kashmir issue.” This was published by
Pakistani newspaper on Nehru’s death. I had read it in Guha’s ‘India after
Gandhi’. It took a flashback of the consequences mentioned in the book. And so,
I started writing a review on the book…
“Abdullah proceeded to Muzaffarabad, a
town he had not seen since Kashmir was divided in 1947. He had no idea of how
the Kashmiris this side of the ceasefire line would react to his proposals.
Before he could find out, news reach him that, back in Delhi, Nehru had died.
Abdullah at once ‘broke into tears and sobbed.’ In a muffled voice told the
reporters gathered around him, ‘he is dead, I can’t meet him.’ When asked for
more reactions he retired to a room, to be alone in his grief.” This paragraph
states, Sheikh Abdullah had predicted that the issue of Kashmir is difficult to
solve after the death of Nehruji. One more sentence in the book states similar
thoughts. “For whoever succeeded Nehru would not have the stature, courage and
political support necessary to go against the highly emotional tide of public
opinion in India favoring a status quo in Kashmir.” And really now Kashmir
issue has become the most unanswered issue for both the countries, for people
of both the countries and mainly for the people of Kashmir who are suffering
from both sides since last 68 years.
This book is the reconstruction of the past
six decades of the Indian history. It lists events, struggles, glories,
conflicts, miseries, solutions and disputes of the India, along with roles and
action of few important personalities in India.
Two most beautiful parts described in the
book are Nehruji’s era as a Prime Minister and 1951’s general elections.
Description of general elections states how difficult it is to conduct any
administrative event in the country like India (World’s Largest Democracy).
This book covers variety of topics of an
Indian history after independence. Integration of Princely states, Mahatma
Gandhi’s fast at Kolkata during partition, meetings for The Constitution and
Ambedkar’s views, all general elections, Kashmir disputes, Khalisthan disputes,
river disputes, war with China, all three wars with Pakistan, Liberation of
Bangladesh, JP’s movement, Indira Gandhi’s emergency, LTTE issues, operation
Blue Star, State wise conflicts, demolition of Babri Masjid, serial bomb blasts
at Mumbai and many important events are covered in the book.
After reading the book one can figure out
the chain of events interlinked with each other. It also indicates that how and
who triggered some destructive events in India. Book also contains few old
pictures which speak a lot.
All
these qualities make the book one of the best non-fictions in its time.
Pratik
Umbarkar (Nirman 6)
Wednesday, 31 August 2016
नमस्कार मित्रमैत्रिणींनो...
मनापासून धन्यवाद !
निर्माणची ७वी बॅच जानेवारी २०१५ मध्ये सुरू होत आहे. ७व्या बॅचच्या प्रसिद्धीसाठी सर्व निर्माणी, 'झुंज दुष्काळाशी' या मोहीमेत व
सर्चमधील विविध कामात सहभागी स्वयंसेवक मित्र, निर्माण समुदाय, पत्रकार मित्र, प्राध्यापक
मित्र यांनी निर्माणच्या अर्जाला व अस्वस्थ युवांना एकमेकांपर्यंत पोहोचवले; आपापल्या
गावांतील कॉलेजेस मध्ये पोस्टर्स लावले, फेसबुक व्हाट्सअॅपवर
आव्हाने-पोस्टर्स-व्हिडीओ शेअर केले, वर्तमानपत्रांतून
निर्माणचे आव्हान तरूणांपर्यंत पोहोचवले. ३० ऑगस्टअखेर निर्माण प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांतील ३०४ जणांनी व महाराष्ट्राबाहेरून
६ जणांनी अर्ज भरला आहे. अजूनही
अर्ज येतच आहेत.
सप्टेंबरमध्ये
मुलाखती सुरू होणार आहेत. १५ ऑक्टोबरला निर्माण ७ साठी निवड झालेल्या युवांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. तत्पूर्वी महाराष्ट्रातील विविध जिल्हयांत या मुलाखती होणार आहेत. यादरम्यान शक्य तेंव्हा मुलाखती घ्यायला आणि मुलाखत घेणाऱ्या टीमला भेटायला नक्की या. प्रसिद्धीसाठी तुम्ही केलेल्या सहकार्यासाठी कृतज्ञता व
मुलाखतींदरम्यान तुम्हाला भेटण्याची उत्सुकता आहेच.
निर्माण – दस साल बाद...
समाजातील विविध समस्यांना आव्हान म्हणून स्वीकारू इच्छिणा-या युवांना संघटीत करणे,
त्यांना आवश्यक मार्गदर्शन,
कौशल्ये व पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण ही प्रक्रिया सुरू झाली.
बघताबघता निर्माणला १० वर्षेही पूर्ण झाली.
या १० वर्षांत ३६ शिबिरांमध्ये ७१० निर्माणींनी सहभाग घेतला. यात ४० % मुली होत्या. यापैकी सर्वाधिक शिबिरार्थी (२८९)
वैद्यकीय पार्श्वभूमीचे असून त्यांच्यासाठी सुयोग्य अशी वेगळी शिक्षणप्रक्रियाही सतत विकसित होत आहे. ७१० पैकी केवळ ९ निर्माणी मुस्लीम असून मुस्लीम युवांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज यानिमित्ताने जाणवली. ४६० निर्माणींनी कॉलेजचे शिक्षण पूर्ण
केले असून आजच्या दिवशी त्यापैकी १२२ जण पूर्ण वेळ सामाजिक समस्यांवर काम करत आहेत, तर इतर जण आपापल्या परीने आपला वेळ, कौशल्ये, आर्थिक मदत देतच आहेत. विशेष गोष्ट म्हणजे निर्माणच्या
कुटुंबातील १०० युवांनी निर्माणी मित्र/मैत्रिणीलाच
जोडीदार म्हणून निवडले आहे ! याचदरम्यान
आपल्याला ८८ रिसोर्स पर्सन्सनी निर्माण व निर्माणींच्या वैचारिक वाढीत हातभार
लावला आहे.
या काळात निर्माण शिबिरांशिवाय कुमार
निर्माण, कृती शिक्षण कार्यक्रम ('झुंज दुष्काळाशी' या मोहीमेत व
सर्चमधील विविध कामात कृतीतून शिक्षणाची संधी), IITB सोबत कार्यशाळा
असे विविध कार्यक्रम विकसित होत आहेत.
तसेच या काळात
निर्माणची वेबसाईट, मुखपत्र
सीमोल्लंघन, फेसबुक पेज, विकी पेज, युट्युब चॅनेल ही माध्यमे
प्रस्थापित झाली असून प्रिंट मेडिया मध्येही निर्माणबद्दल आकर्षण राहिले आहे.
दशकपूर्तीचे
औचित्य साधत या १० वर्षांचा आढावा व पुढील ५ वर्षांची वाटचाल याविषयी चिंतन करण्यासाठी
'बायफ' पुणे येथे १०-११ ऑगस्ट रोजी बैठक पार पडली.
बैठकीला निर्माण व कुमार निर्माण टीमशिवाय नायना,
आनंद करंदीकर,
विवेक सावंत,
MKCLKF चे उदय पंचपोर व नरेंद्र खोत उपस्थित होते.
निर्माण टीमचा विस्तार
अमोल शैलेश व रखमा हेमा श्रीकांत (दोघेही निर्माण ६)
नव्याने,
तर अमृत बंग पुन्हा रुजू झाल्यामुळे निर्माण टीमला बळकटी आली आहे.
अमोल गेले ६ महिने 'झुंज दुष्काळाशी'चा समन्वयक म्हणून कार्यरत होता.
आताही त्याची मुख्य जबाबदारी कृतीशिक्षण कार्यक्रम असणार आहे.
रखमा प्रामुख्याने निर्माण प्रसिद्धी
व निवड प्रक्रियेशी
संबंधित जबाबदा-या सांभाळेल.
अमृतने गेल्या वर्षभरात University
of Pennsylvania येथे MS (Non-Profit Leadership) हे पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्याच्या कौशल्यांचा निर्माणला नक्कीच फायदा होईल.
२०१५-१६ च्या दुष्काळाने माझा निर्णय बदलला - प्रतीक उंबरकर
प्रतीक उंबरकर
(निर्माण
६) पाचवा 'कर
के देखो' फेलो बनला आहे. या फेलोशिप अंतर्गत पुढचे वर्ष तो 'समाज
प्रगती सहयोग' या संस्थेसोबत मनरेगा व पाणलोट क्षेत्र विकासाचे काम करणार आहे. 'समाज प्रगती सहयोग' पर्यंतचा त्याचा प्रवास त्याच्याच शब्दांत...
"निर्माणच्या
शिबिरांदाराम्यान मी 'शेतमालाची प्रक्रीया'
आणि
'कमी खर्चाची शेती'
या
विषयांवर काम करण्याचे ठरवले होते. त्यानुसार
BAIF बरोबर काम करायचे असे नियोजन
केले होते. या कामांची पद्धत
शिकून घ्यायची आणि नंतर स्वतःच्या गावात काम करायचे असे ठरवले होते.
पण
२०१५-१६ च्या दुष्काळाने माझ्या
निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले. आजच्या
परीस्थितीत पाण्याची समस्याच मोठी वाटायला लागली आहे.
माझ्या
गावात ८० ते ९० फुटांवर विहिरीला पाणी आहे. तरीही
शेतकऱ्याची मोटर हिवाळ्यात दोन ते तीन तासांमध्ये पाणी सोडणे बंद करते.
ज्या
शेतकऱ्याचे बोअर वेल आधी स्प्रिंकलरचे १५ नोझल पाणी सोडायची त्यांची आता ८ नोझलच
पाणी फेकते. गावात नळाला पिण्याचे
पाणी ज्या बोअर वेल पासून यायचे ती बोअर वेल सुद्धा उन्हाळ्यात दूषित पाणी सोडायला
लागली आहे. या उन्हाळ्यात गावात
टँकरने पाणी यायला सुरुवात झाली. दोन
दिवस मी स्वतः टँकरवर बसून लोकांना पाणी वाटायचं काम केलं. पाणी
वाटताना लोकांची भांडणे बघितली. शेजारी
एकमेकांसोबत चांगली राहणारी मंडळीसुद्धा पाण्यासाठी भांडत होती.
'ग्रॅज्यूएशन
झालं आता पुढे काय करणार?' असा
प्रश्न विचारणाऱ्या वरिष्ठ मंडळीला मी उत्तर द्यायचो 'गावात
शेती कारणार'. या उत्तरावर लोकं
म्हणतात 'पुढे शेतात पाणीच नाही तर
कशी करणार शेती? नोकरी कर,
गावात
थांबून काहीच फायदा नाही.' या
लोकांच्या उत्तराने गावातील तरुण वर्ग शेतीला घाबरतोय.
या
उन्हाळ्यात पाहलेली परिस्थिती मला पाणी प्रश्नाकडे आकर्षित करून गेली.
अजय
होले आणि प्रताप मारोडे यांच्या सोबत चर्चा केली तेव्हा त्यांनी मला 'समाज
प्रगती सहयोग (SPS)' सोबत
काम करायला सुचवलं.”
प्रतीकला
त्याच्या कामासाठी आणि शिक्षणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रतीक उंबरकर (निर्माण
६),
झुंज दुष्काळाशी: दृष्टीआडचा दुष्काळ
रोजगार हमी योजना गावा-गावात पोहचवणे, पाणलोटाची
कामे करणे, गावाचा-शेतीचा अभ्यास सर्वे करणे अशा वेगवेगळ्या कृतींचा समावेश
असलेली निर्माणची ‘झुंज दुष्काळाशी’ ही मोहीम जून महिन्याअखेरीस नुकतीच पार पडली. महाराष्ट्रातील
वेगवेगळ्या भागांतून ७५ युवांनी यावर्षी मोहिमेत सहभाग नोंदवला. ‘झुंज
दुष्काळाशी’ या मोहिमेत गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात
अनुभवलेला दुष्काळ, युवांना आलेले अनुभव आणि झालेले शिक्षण शेअर करण्यासाठी; त्यांनी
केलेल्या छोट्या छोट्या कृतींचा दुष्काळाच्या व्यापक सामाजिक-आर्थिक-राजकीय चित्राशी
संबंध समजून घेण्यासाठी आणि युवांना न दिसलेला दुष्काळ जाणून घेण्यासाठी औरंगाबाद
येथे ‘झुंज दुष्काळाशी’ चे सांगता शिबीर ३० जून ते ३ जुलै दरम्यान आयोजित करण्यात
आले होते.
शिबिरात युवांनी कृती कार्यक्रमांदरम्यान त्यांना आलेले
अनुभव, पडलेले प्रश्न, झालेले शिक्षण सर्वांसोबत शेअर
केल्यामुळे गटाचे सामूहिक शिक्षण झाले. याशिवाय या शिबिरात विविध
मान्यवरांची सत्रे झाली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ऊस, बाटलीबंद
पाणी, बिअर-मद्य कारखाने, आयपीएल या मुद्द्यांवर अश्विनीताईंनी
भूमिका मांडली. या सत्रादरम्यान अश्विनी ताईंसोबत प्रश्नोत्तरी चांगलीच
रंगली. ‘शहर आणि दुष्काळ’ यांचं नातं सांगताना विजय दिवाण यांनी
मोठी धरणे, कुंभमेळा, औद्यागिकीकरणामुळे होणारा पाणी स्त्रोतांचा ऱ्हास समजावून
सांगितला. औरंगाबाद महानगरपालिकेने केलेल्या पाण्याच्या
खासगीकरणाविरूद्ध यशस्वी लढ्याची गोष्ट त्यांनी शब्दांतून उभी केली. महाराष्ट्रातील
पाणी, सिंचन आणि धरणांचा गाढा अभ्यास असलेले प्रदीप पुरंदरे यांनी
सरकारची असून नसलेली जलनीती, ‘कायदा आहे नियम नाही’, ‘समिती
आहे मिटिंग नाही’, ‘खातं आहे अधिकारी आणि ऑफिस नाही’ हा असा जलव्यवस्थापनातला
सरकारी पातळीवरचा सावळा गोंधळ खूप सोप्या पण तितक्याच अभ्यासपूर्ण शब्दांत त्यांनी
युवांसमोर मांडला. दुष्काळ या समस्येसोबत तिच्या उपायांविषयीही चर्चा झाली. विजयअण्णा
बोराडे यांनी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाची, तर उमा
असोलेकर यांनी भूजल व्यवस्थापनाची पद्धत, त्यामागील शास्त्र व विचार समजावून
दिला.
दुष्काळाखेरीज युवांसाठी उपयुक्त अशी सत्रेही झाली. प्रफुल्ल
शशिकांतने ‘Happiness and Meaning’ असे interactiveसत्र घेतले. युवांचे झालेले शिक्षण ऐकण्यासाठी आणि स्वतःचे अनुभव शेअर
करण्यासाठी शिबिरात नायनाही उपस्थित राहिले होते. वर्ध्याला
शाळेत असताना रसोईच्या कामाने भविष्यात मजूरांची किमान मजूरी वाढण्यात कसा हातभार
लावला, ७२च्या मराठवाड्याच्या दुष्काळात स्वयंसेवक म्हणून गेल्यावर
सार्वजनिक आरोग्याचे काय दर्शन झालं हे नायनांनी सर्वासोबत शेअर केले.
हे
शिबीर आयोजित करण्यासाठी निर्माणचा त्रिशूल कुलकर्णी व मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद
येथील त्याचे सहकारी यांनी मनापासून सहकार्य केले. शिबिराचा
शेवट पुढील वर्षाचा कार्यक्रम कसा असावा, यावर युवांच्या सूचना आणि कल्पना
जाणून घेत झाला.
शिबिरात ग्रामीण भागातील युवांची त्यांच्या गावाबद्दल, तिथल्या
प्रश्नांबद्दल तळमळ आणखी वाढलेली दिसत होती; दुष्काळाची
भीषणता वाढवण्यात शहरांच्या असलेल्या भूमिकेविषयी जाणीव झाल्यावर शहरी युवा पाणी
प्रश्नाबद्दल जबाबदार दिसत होते. ग्रामीण-शहरी युवांचे एकत्र येणे; पाण्यासारख्या
विषयावर चर्चा, अनुभव शेअर करणे; पाणीतज्ञांचे मार्गदर्शन असे
अनुभवांनी आणि शिक्षणाने समृद्ध शिबीर औरंगाबादला पार पडले. आणि
मोहिमेची ‘सांगता’ करणाऱ्या या शिबिराने खूप साऱ्या नवीन प्रश्नांना, विचारांना
आणि कृतीकल्पनांना प्रत्येकाच्या मनात ‘सुरूवात’ करून दिली !
पाणी मागतात च्यायला
या शिबीरातील मार्गदर्शक प्रदीप पुरंदरे यांनी त्यांच्या सत्रानंतर त्यांची पुढील कविता वाचून दाखवली.
लोकं उद्धट व्हायला लागली
आहेत
पाणी मागतात – पिण्याकरता, शेतीकरता
ठोकून काढलं पायजे साल्यांना
पाणी मागतात – पिण्याकरता, शेतीकरता
ठोकून काढलं पायजे साल्यांना
साहेबांनी
म्हटलं- अहो, जलनीती घ्या
कायदे करू, नियम करू
येगळं प्राधिकरनच देतो की
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात …च्यायला
कायदे करू, नियम करू
येगळं प्राधिकरनच देतो की
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात …च्यायला
सायबांनी
असंबी म्हटलं
नदीजोड व्हायला पायजेल आहे
कोर्टाचा आदेशच आहे तसा
पश्चिमेच्या नद्या फिरवू की पुर्वेला
ह्ये अशी वळवायची नदी अन ह्यो उचलायची
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात …च्यायला
नदीजोड व्हायला पायजेल आहे
कोर्टाचा आदेशच आहे तसा
पश्चिमेच्या नद्या फिरवू की पुर्वेला
ह्ये अशी वळवायची नदी अन ह्यो उचलायची
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात …च्यायला
कान
इकडं करा तुमाला म्हणून सांगतो
साहेब म्हनाले- इन्टरनल शिक्युरिटिला लै धोका आहे
आता टॅंकरवर काम भागणार नाही, राजेहो
साहेब तर म्हनतात- आता टॅंकच बोलवा
टॅंक. टॅक. रणगाडा ! धडाधडा….
पाणी मागतात … च्यायला
साहेब म्हनाले- इन्टरनल शिक्युरिटिला लै धोका आहे
आता टॅंकरवर काम भागणार नाही, राजेहो
साहेब तर म्हनतात- आता टॅंकच बोलवा
टॅंक. टॅक. रणगाडा ! धडाधडा….
पाणी मागतात … च्यायला
साहेब
जाऊन आले परवा चायनाला
केवढी प्रगती केली राव त्यांनी – थ्री गारजेस
सायबाला विचारलं एवढं सगळं जमवलं कसं त्यांनी?
साहेब म्हनले – पयले तियानमेन केलं. तियानमेन! ते मेन!!
आपण काहीच करत नाही. कशी होणार प्रगती?
पाणी मागतात … च्यायला
केवढी प्रगती केली राव त्यांनी – थ्री गारजेस
सायबाला विचारलं एवढं सगळं जमवलं कसं त्यांनी?
साहेब म्हनले – पयले तियानमेन केलं. तियानमेन! ते मेन!!
आपण काहीच करत नाही. कशी होणार प्रगती?
पाणी मागतात … च्यायला
Subscribe to:
Posts (Atom)