'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday 30 April 2016

सावधान ! लकवा वाढत आहे !

         भारतात लकवा आणि हृदयरोग हे मृत्यूंचे सर्वांत मोठे कारण असल्याचे Registrar General of India यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. शहरी आणि श्रीमंत लोकांचे हे रोग ग्रामीण भागातही वाढत असल्याचे सर्चने नुकत्याच केलेल्या अभ्यासात समोर आले आहे. ३९ गावांतल्या ४५ हजार लोकसंख्येचा अभ्यास केल्यानंतर दर एक लाख लोकसंख्येमागे ३८८ लोकांना कलवा असल्याचे या अभ्यासातून दिसते. ग्रामीण भागात अशा प्रकारचा अभ्यास २० वर्षांनंतर पहिल्यांदाच झाला आहे. २० वर्षांपूर्वी जो अभ्यास झाला होता त्यात लकव्याचे प्रमाण  दर एक लाख लोकसंख्येमागे १६५ असे होते.

            डॉ. योगेश कालकोंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेले आणि विक्रम सहाने (निर्माण ४) याची महत्त्वाची भूमिका असणारे हे संशोधन Neuroepidemiology या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. आरोग्यदूतांनी प्रश्नावलीच्या सहाय्याने लकव्याचे संशयित रूग्ण ओळखल्यानंतर त्यांना भेटी देऊन लकव्याचे निदान करणे अशी महत्त्वाची जबाबदारी विक्रमने सांभाळली.

           योगेश दादा, विक्रम आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!
या अभ्यासाबद्दल विस्ताराने वाचण्यासाठी विक्रमशी संपर्क साधा - विक्रम सहाने

No comments:

Post a Comment