'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday, 31 August 2014
या अंकात...
निर्माण ६ ची बॅच जानेवारी २०१५ मध्ये सुरू होत आहे...
माळीण शोकांकिका आणि भविष्यासाठी धडे
३० जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस कधी थांबतोय याची वाट पाहत बसलेले आंबेगाव तालुक्यातील माळीण गाव एकाएकी डोंगरावरून आलेल्या चिखलाच्या प्रचंड लोंढ्यात गाडले गेले. ४४ घरांत असणाऱ्या दीडशेहून अधिक जणांना जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही.. येथे अनेक समाजसेवी संस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. सदानंद कुरुकवाड (निर्माण ५) यानेही या कामात सहभाग घेतला. या मदत कार्यादरम्यान त्याला आलेले अनुभव त्याच्याच शब्दात
मुक्त व्यापार आणि भारतीय शेती
अव्दैत दंडवतेला सामाजिक कृतज्ञता निधीचे मानधन सुरू
सजल कुलकर्णीचे पुढचे संशोधन जर्नल ऑफ बायोसायन्स डिस्कवरी मध्ये प्रसिद्ध !
सोनाळे गावच्या स्वच्छतेच्या प्रवासात सुरुवातीपासूनच वाटसरू व्हा...
मेळघाटातील मुलांच्या शिकवणीची केमिस्ट्री...
१८ वा हिंद पाक दोस्ती मेळा जल्लोषात साजरा
हरळी, सोलापुर येथील ज्ञान प्रबोधिनीच्या प्रकल्पावर ५ निर्माणींचे काम....
आणि व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न सुरु. . .
Professional शिक्षण घेऊन सामाजिक योगदान देण्याचा मार्ग !
माविम फ़ेलोशिपसाठी ऋचा व सागर गडचिरोलीत दाखल!
चिन्मय वराडकरचे जालन्यातील पाणीप्रश्नावर काम सुरु
इंजिनिअर्ससाठी खुला होतोय Appropriate Technology मार्ग
पुस्तक परिचय – Social intelligence – by Daniel Goleman
निर्माणीच्या नजरेतून – जुगाडमेंट
Saturday, 30 August 2014
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
माळीण शोकांकिका आणि भविष्यासाठी धडे



मुक्त व्यापार आणि भारतीय शेती
अव्दैत दंडवतेला सामाजिक कृतज्ञता निधीचे मानधन सुरू
सजल कुलकर्णीचे पुढचे संशोधन जर्नल ऑफ बायोसायन्स डिस्कवरी मध्ये प्रसिद्ध !
http://biosciencediscovery.com/Vol%205%20No.%202%20July%202014/Sajal180-186.pdf
सोनाळे गावच्या स्वच्छतेच्या प्रवासात सुरुवातीपासूनच वाटसरू व्हा...
मेळघाटातील मुलांच्या शिकवणीची केमिस्ट्री...
१८ वा हिंद पाक दोस्ती मेळा जल्लोषात साजरा
१४ ऑगस्टला सकाळी कार्यक्रमाची सुरुवात नाटशाला येथे परीसंवादाने झाली. परिसंवादाचा विषय ‘Challenge of Terrorism, In south Asia and India-Pakistan relationship’ असा होता. परिसंवादात पाकिस्तानातील दोन वक्त्यांचा समावेश होता. PIPFPD चे सचिव सतनाम सिंघ माणिकानी सांगितले कि सार्क देशात करोडो लोक शिक्षण व आरोग्याच्या सुविधांपासून वंचित आहेत. दक्षिण आशियात भारत, पाक व अफगाणिस्तान ने एकत्र यायला हवे. या देशातील राजकारणी, लेखक, पत्रकार व कलाकार यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. आपल्या आपल्या सरकारवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकला पाहिजे. भारत-पाक काश्मीर प्रश्नाच्या पुढे नाही गेले तर शांती प्रस्थापित होण्याचे स्वप्न अपूर्णच राहील.
१५ ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिवस वाघा बोर्डर वर साजरा करण्यात आला. उन्हाच्या झळा खात आम्ही सगळे वाघा सीमेजवळील मैदानावर पोहचलो ६००० च्या आसपास लोक दाटीवाटीने बसले होते. त्याहून अधिक लोक मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच अडकले होती. साधारण ४-३० ला कार्यक्रमास सुरवात झाली. सुरुवातीला घोषणा झाल्यानंतर जवानांचे काही प्रात्यक्षिक व कॉलेजच्या विध्यार्थ्यांचे देशभक्तीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम झाला. ‘बिग पैगाम सरहद के नाम’ हा कार्यक्रम एका व्यावसायिक रेडिओला द्यावा हे जरा बुद्धीला पटलं नाही. आरजे निलेश मिश्राने म्हटलेले दिल तो बच्चा है जी, बॉडीगार्ड चित्रपटातील अजून एक गाणे, त्यानंतर सगळ्यांना दिल तो चाहता है वर थिरकायला सांगणे हे सगळ लज्जास्पद होतं. प्रेक्षक चिडले आहेत व ते आपली टर उडवत आहे हे आयोजकांच्या लक्षात येऊ नये ही अधिक लज्जास्पद गोष्ट.