'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 27 June 2016

सीमोल्लंघन : मे - जून २०१६

                                                                                                                सौजन्य: अमृता ढगे 

I need some water to sprout

I need some water to sprout

In this dreary deadly summer,
I am alive because my hopes are
the hot heat waves are burning my leaves and flowers
but I am alive because I hope in future, there will be showers
A day will come when I will be the witness of baby sparrow's first chirp
by getting my sweet fruits, the little squirrel will burp
I will decorate myself with the long and beautiful tender vines
and will look gorgeous after having bird nest of serene design
The twigs of mine will make the shelter to the poor
travelers will take afternoon nap in my shadow for hours
despite all the adversities against my survival I believe in my dream
because my dreams are my life and my life is my dream
                                                                                - Sagar Kabra
मे २०१६ च्या दिवशी बिलासपूर (छत्तीसगढ) जवळ सागर-नेहा-पंकज या आपल्या मित्र मैत्रिणींचा दुर्दैवी अपघात झाला. या अपघाताने सागरला आपल्यातून नेले. नेहा व पंकज जखमी झाले. या कठीण प्रसंगानंतर दोघेही शारीरिक व मानसिकदृष्ट्या सावरण्याचा धैर्याने प्रयत्न करत आहेत.
            मूळ मानवतचा (जि. परभणी) सागर यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS झाला. कॉलेजमध्ये शिकत असताना अभ्यासासोबत आपण समाजासाठी काय करू शकतो या शोधात त्याने मेळघाटच्या आदिवासी पाड्यांतील बालमृत्यू कमी करण्यासाठी धडक मोहीम गाठली. पुढे सलग सहा वर्षे त्याने धडक मोहिमांचे काम नेटाने केले. याचदरम्यान निर्माणच्या तिस-या बॅचमध्ये सागर आला. सागर-धीरज-पवन हे कॉलेजमधील घनिष्ठ मित्र निर्माणच्या शिबिरांतही उठून दिसत. ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोचवण्याबद्दल त्यांची कळकळ, धडाडी यामुळे शिबिरात सकारात्मक वातावरण अगदी कायम राहात असे.
            डॉक्टर झाल्यावर सागरने छत्तीसगडमधल्या गाणियारी येथील 'जन स्वास्थ्य सहयोग' या आदिवासी, दुर्गम भागातल्या दवाखान्यात आरोग्यसेवा देणं सुरू केलं. यादरम्यान अधिक चांगली आरोग्यसेवा देण्याची क्षमता मिळवण्यासाठी त्यानं उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. आपलं संपूर्ण आयुष्य ग्रामीण रूग्णसेवेसाठी द्यायचे सागरने ठरवले होते. ग्रामीण भागात जायला आधीच कमी डॉक्टर तयार होतात. ग्रामीण भागात लोक आपल्या भागात कोणत्या स्पेशलायझेशनचे डॉक्टर आहेत हे पाहून आजारी पडत नाहीत. जास्तीत जास्त लोकांना सेवा द्यायची तर शरीराच्या एखाद्या अवयवावर स्पेशलायझेशन करून नाही चालणार. त्यामुळे सागरने 'जन स्वास्थ्य सहयोग' येथेच स्पेशलायझेशन इन जनरलायझेशन म्हणजे फॅमिली मेडिसीन या वलयांकित नसलेल्या शाखेत प्रवेश घेतला.
            रूग्णांबद्दल अतिशय संवेदनशील असणारा सागर रूग्ण तपासणी करताना त्यांचे बोलणे समवेदनेने ऐकून घेई. हसतमुख, रूग्णाचे ऐकणारा आणि सक्षम डॉक्टर – अतिशय दुर्मिळ आणि रूग्णांना दिलासा देणारे combination! आरोग्यसेवेसंबंधी लोकांवर होणारा अन्याय त्याला अस्वस्थ करीत असे. सर्वांना आरोग्यसेवा मिळावी असे त्याचे स्वप्न होते. आपले अनुभव, अस्वस्थता, स्वप्ने त्याने अतिशय सुंदर शब्दांत मांडले आहेत. ते नक्की वाचा -
            निर्माणच्या अनेक तरूण डॉक्टरांनी ग्रामीण भागात एक वर्ष आरोग्यसेवा देण्याचा निर्णय मागच्या महिन्यात घेतला. सीमोल्लंघनमध्ये ही बातमी वाचून सागरने १ मे ला त्यातल्या काही जणांना फोन केला. सागरला आधी कधीही न भेटलेल्या अमित ढगेला सागरचे कौतुकाचे शब्द ऐकून भरून आले. सागरने अमितच्या निर्णयाचे कौतुक केले, त्याच्यासोबत ग्रामीण भागात आरोग्यसेवा देताना आलेले अनुभव शेअर केले. Medico Friends Circle च्या धर्तीवर आपणही सामाजिकदृष्ट्या सक्रीय डॉक्टरांचा गट बनवू असे सागरने सुचवले. सागरने पेरलेले बी आपले डॉक्टर मित्र नक्कीच वाफवतील.

            आज सागर आपल्यात नाही. पण आपल्या सर्वांच्यातच एक सागर आहे. सागरच्याच वरील कवितेप्रमाणे आपल्यातला सागर अंकुरण्यासाठी त्याला काळजीपूर्वक व प्रयत्नपूर्वक पाणी घालूया.

या अंकात...

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

गेल्या दोन महिन्यांत निर्माण संबंधी घडामोडींचा हा वृत्तांत-

झुंज दुष्काळाशी - बीड व यवतमाळ जिल्ह्यांत दोन छोटेखानी कृती
          
  यवतमाळ-झुंज दुष्काळाशीमोहीमेअंतर्गत मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा संतोष गवळेच्या (निर्माण २) ‘मन्याळीया गावाला पाणलोटाची काम करण्याचे नियोजन केले होते. २५ मे ते २९ मे या दिवसांसाठीगाव ओळखआणि गॅबियन बंधारा बांधण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून मन्याळीला शिबिराचे आयोजन झाले. यासाठी डॉ. विकास नाडकर्णी यांनी संतोषला आणि शिबिरात सहभागी होणाऱ्या निरंजन (निर्माण ) ला मार्गदर्शन केले. मन्याळीला बांधण्यात येणाऱ्या गॅबियन बंधाऱ्याचे डिझाईन डॉ. विकास नाडकर्णी, पाणलोट विषयात काम करणारा अजय होले (निर्माण ), मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या आनंद टेके (निर्माण ) आणि निरंजन तोरडमल यांनी मिळून बनवले. बंधाऱ्यासाठी एका ओहोळावर जागा निश्चित करण्यात आली. आणि सलग पाच दिवस शिबिरात सहभागी झालेले सहा निर्माणी आणि मन्याळीतील तरुणांनी मिळून श्रमदानातून गॅबियन बंधाऱ्याचे बांधकाम केले.
           
            बीड - बीड जिल्हा, जिथे भर जुन महिन्यात जवळपास १५-१६ दिवसातून एकदाच पाणी येते; गावांतील सुमारे ७०% लोक ऊस तोडणीसाठी महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेर - महिन्यांसाठी स्थलांतर करतात; साधारण गेली वर्षे रब्बी हंगामातील गहू, हरभरा पाण्याअभावी पिकलेच नाहीत; दुष्काळाचा जणू केंद्रबिंदूच. याच जिल्ह्यात, धारुर तालुक्यात यवतमाळ येथील 'दिलासा' ही संस्था पाणी प्रश्नावर काम करत आहे. याअंतर्गत त्यांनी डोह प्रकल्प, नदी आणि ओढे यांचे खोलीकरण, गाळ उपसा आणि शेततळे बांधून देणे याप्रकाराचे काम चालू केले आहे.
'झुंज दुष्काळाशी' अंतर्गत या संस्थेसोबत गावच्या बेसलाइन सर्वेचे काम करण्याचे नियोजन झाले होते. युवांनी धारुर तालुक्यातील ११ गावातील १२१८ कुटुंबाचा सर्वे केला. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न, त्यांच्या पिकांची माहिती, स्थलांतरातून त्यांची होणारी कमाई आणि किती प्रमाणात स्थलांतर होते इ. ची माहिती मिळाली. पाण्याच्या उपलब्धतेमुळे गावकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते का? पशुधनावर काय परिणाम होतो? रब्बीत पीक येते का? गावातच मजूरी मिळाली तर स्थलांतर कमी होत आहे का? अशा प्रश्नांचा अभ्यास हा सर्वेचा हेतू होता. -९ जून दरम्यान झालेल्या या सर्वेत ५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.
स्त्रोत – कुणाल परदेशी (निर्माण ६), 

बिन बुका या शिका’
रवींद्र चुनारकर (निर्माण ६) याची ‘कर के देखो’ फेलोशिप अंतर्गत फेलो म्हणून निवड झाली आहे. ही फेलोशिप मिळवणारा रवींद्र हा चौथा फेलो आहे.
रवींद्र मुळचा गडचिरोली जिल्ह्यातला. लहानपणापासूनच त्याला त्याच्या गावातील लोकांसाठी, आदिवासींसाठी काहीतरी करावं अस मनापासून वाटायचं. निर्माण च्या .३ शिबिरादरम्यान ‘गडचिरोली जिल्ह्यात ग्रामीण विकास आणि मुलांचे कृतीशील शिक्षण या संबंधात काहीतरी काम करायचे हा त्याचा विचार पक्का झाला.
त्यानुसार मे महिन्यात त्याचे कॉलेज चे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने ठाणे जिल्ह्यात आदिवासींसाठी काम करणाऱ्या ‘वयम्’ या संस्थेला भेट दिली. त्यांचे काम समजावून घेतले, १५ दिवस वयम् मध्ये प्रत्यक्ष काम करून पहिले आणि संस्थेच्या ‘बिन बुका या शिका’ या नवीनच सुरु झालेल्या उपक्रमासोबत एक वर्ष काम करण्याचे निश्चित केले.
वयम्’ अम्धील या कामाच्या अनुभवाची रवींद्रला भविष्यातील गडचिरोली जिल्ह्यात, त्याच्या गावात करायच्या कामात नक्की मदत होईल. ते काम काय असावे, आणि ते कसे करावे हे समजून घेण्यासोबतच त्याला स्वतःची स्वप्ने आणि क्षमता काय आहेत हे ही समजण्यास या अनुभवांची मदत होईल अशी खात्री वाटते.

रवींद्रला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!