'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 27 June 2016

कल्याण टांकसाळेच्या कामाचा दुहेरी गौरव !

कल्याण टांकसाळेची SWISSAID च्या महाराष्ट्रातील एका उपक्रमाच्या सल्लागार समितीवर निवड झाली आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील भटक्या आणि विमुक्त जातीजमातीच्या लोकांसंदर्भातील प्रश्नांवर काम करण्यासाठीनिर्माणआणिसामर्थ्यया सस्थांची निवड करण्यात आली आहे. “सामर्थ्यही संस्था उमरगा येथे लमाण मुलांच्या Capacity building वर काम करत आहे तरनिर्माणतर्फे इंदापूर येथे १४ भटक्या आणि विमुक्त जातीजमातीच्या प्रश्नावर काम केले जाते. या संस्थांच्या कामांना योग्य दिशा देणे, त्यांना प्रश्न समजवून घेण्यास मदत करणे, आर्थिक तरतुदींसंदर्भात त्यांना मार्गदर्शन करणे आणि कामाची व्याप्ती वाढवण्यास सहाय्य करणे हे कल्याण आणि त्याच्या इतर सहकार्यांचे काम असेल.

एकीकडे विविध संस्थांसाठी सल्लागार म्हणून काम करत असताना कल्याण गेले ५,६ वर्ष System Thinking ही संकल्पना महाविद्यालयीन मुलांना पर्यावरणशास्त्राच्या संदर्भात अभ्यासक्रमाच्या माध्यमातून समजावून सांगण्यासाठी प्रयत्नशील आहे. System Thinking ही संकल्पना एखाद्या प्रणालीतील (System) विविध घटकांमधील परस्परसंबंध यावर भाष्य करते२०११ मध्ये यावरील एका धड्याचा ११ वीच्यापर्यावरण आणि शाश्वत विकासया पाठ्यपुस्तकात समावेश केला गेला. ‘Innovations in Environmental Education’ याअंतर्गत कल्याणला नुकतेच राज्य सरकारतर्फेसृष्टीमित्रपुरस्काराने गौरवण्यात आले
कल्याणला या दोन्ही आघाड्यांवरील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!

स्त्रोतकल्याण टांकसाळे (निर्माण २),

No comments:

Post a Comment