सोलापूर
च्या शासकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुजाता व शिवाजी या
दोघांनीही आपला बाँड पूर्ण करण्याचा निर्णय घेतला, आणि आदिवासी / ग्रामीण
भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांच्या
या निर्णयाबद्दल त्यांच्याच शब्दात...

“तुम्ही DP ची गोळी (BP ची गोळी) सुरू केल्यापासून बरं वाटतंय, हे तुमच्यासाठी आणलंय” असं म्हणत पेशंटने फणसाचे
गरे मला दिले. मी भारावून गेले. महिला पेशंट म्हणतात “मॅडम, बरं झालं तुम्ही आलात, आता मोकळेपणाने बोलता येतं” हे सगळ ऐकून मला खूप बर वाटतं, उत्साह येतो. येत्या दिवसात खूप शिकायला
मिळणार आहे. सरकारी योजनांचं काम जवळून
पाहण्याची त्यांच्यासोबत काम करण्याची चांगली संधी मला मिळाली आहे.
सुजाता पाटील, (निर्माण ६)
PHC, खानापूर, ता. हवेली, जिल्हा पुणे

सुरवातीचा एक आठवडा
खूप अवघड गेला, जेवणाची नीट सोय नव्हती आणि
इकडे लोकांशी जुळवून घ्यायला वेळ लागला. पण नंतर आपला निर्णय चुकला नाही आणि आपण योग्य जागी जिथे गरज आहे तिथे काम करतोय
हे जाणवायला लागलं. आता मी इथलाच झालो आहे. गडचिरोली जिल्हा खूप डेंजर आहे असं ऐकलं होतं, त्यामुळे सुरवातीला घरून थोडा विरोध झाला; पण माझे वडील मला भेटायला
आले, आणि त्यांना पण धानोरा खूप
आवडला. माझ्याकडे सांगण्यासारखे
खूप अनुभव आहेत, ऐकायला तुम्ही माझ्या धानोऱ्यात
नक्की या.
शिवाजी खोसे,
(Rural Hospital, धानोरा, जिल्हा गडचिरोली)
No comments:
Post a Comment