'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 31 August 2015

Shall I be poor forever?

National Crime Record Bureau has recently released the report about farmers' suicides. Pratik Umbarkar (NIRMAN 6), has explained to us the crux of the report. The original report can be found at: http://ncrb.gov.in/ADSI2014/chapter-2A%20farmer%20suicides.pdf

In India, 48.9% people directly or indirectly depend on Agriculture. Farmer’s Suicide is leading social problem in India. National Crime Record Bureau presented the stats on farmer’s suicides committed in 2014.

            Total 5650 farmer’s suicides have been committed in the year of 2014. In this figure Maharashtra alone contributes 45.5% of the number.i.e. 2570 suicides. Maharashtra (45.5%), Telangana (15.9%), Madhya Pradesh (14.6%), Chattisgarh (7.8%) and Karnataka (5.7%) these five states makes the sum of 89.5% i.e. 5056 suicides. If you observe map then you will find that these states lie in central and southern-west zone of India. There might be the reason of farmer’s suicide in the common zone. It may be due to poor environmental conditions or any other common factor. If these five states are tackled then about 89.5% of farmer’s suicides can be overcome.
 Land Holding Wise:-
Type of Farmer
Landholding
Percent of suicides
Marginal Farmer
1 hectare
27.9%
Small Farmer
1-2 hectares
44.5%
Medium Farmer
2-10 hectares
25.2%
Large Farmer
10 hectares
2.3%
            Percent of suicides of marginal and small farmers are 72.4 % i.e. 4095. In Maharashtra 53.1% of suicides are committed by small farmers i.e. 1135 out of 2516. According to Wikipedia 2002 information about 85% people below poverty line are marginal farmers, small farmers and landless labours. If strategies are applied for this section then 85% poverty can be uprooted.
Age wise:-
Age
Percent of suicides
Below 18 years
1%
18-30 years
23%
30-60 years
65.7%
Above 60 years
10.2%
            Person between 30-60 years of age is responsible person of family and hence suicide percent is high between this age group.
 Causes of suicides:-
Causes of Farmer’s Suicide
Percent of suicide
Poverty
2.63%
Property Disputes
0.92%
Marriage related problems
2.14%
Family problems
20.08%
Farming related issues
17.15%
Illness
13.18%
Drug and alcohol addicted
4.42%
Bankruptcy and Indebtedness
20.58%
Fall in social reputation
0.12%
Other causes
14.65%
Causes not known
4.08%
            It is difficult to solve family problems (20.08%) of the farmers but is it impossible to solve bankruptcy or indebtedness (20.58%), Farming related issues (17.15%) and Illness (13.18%). These three causes make the sum of 50.91% of suicides. If alcohol is banned then about 4.42% of farmer’ssuicides can be controlled. Other than farmer’s suicide many suicides are committed under the cause of Alcohol addiction.
            I agree that every poor person in India should get food twice a day. But for this purpose, how many years food producer “THE FARMER” should remain poor?
Pratik Umbarkar, pratik.umbarkar8@gmail.com


कुमार निर्माण

निर्माण ५ चा प्रफुल्ल शशिकांत कुमार निर्माण’ (पूर्वाश्रमीचा महाराष्ट्र सोशल ऑलिम्पियाड) या उपक्रमाची धुरा सांभाळतो आहे.शालेय वयोगटातील मुलांमध्ये सामाजिक बुद्धिमत्तेचा विकास व वैश्विक मानवी मुल्यांची रुजवणूक करणे असे उद्दिष्ट असलेल्या 'कुमार निर्माण' या शैक्षणिक उपक्रमाने नुकतेच त्याच्या तिसऱ्या वर्षात मोठ्या दिमाखात पदार्पण केले.
            या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थी आपापसात गट स्थापन करतात व स्थानिक पातळीवर आपल्या परिसरातील विविध प्रश ओळखायला शिकतात, त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. या मुलांसोबत एक वयस्क व्यक्ती निमंत्रक म्हणून जोडलेली असते.
            कुमार निर्माणची दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पुणे येथे पार पडली, ही कार्यशाळा मुख्यतः गट निमंत्रकांसाठी होती. महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांतून ५२ गटांतर्फे आलेले ५० निमंत्रक, निर्माण युवा व स्वयंसेवकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
            या कार्यशाळेचा मुख्य उद्देश कुमार निर्माणची संकल्पनाव कार्यपद्धती समजून घेणे,गट निमंत्रकाची मुलांसोबत काम करतानाची भूमिका समजून घेणे,हा होता.
            या २ दिवसात विविध सत्रे घेतली गेली. या सत्रांमध्ये शिक्षण व मूल्यशिक्षण म्हणजे नेमके काय; शिक्षणाचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध, सामाजिक व भावनिक बुद्धीमत्ता म्हणजे काय, मुल कसं शिकतं, माणसात उपजतच सहकार्याची भावना कशी असते, वैश्विक मानवी मुल्ये कुठली आणि त्यांचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध यासारख्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या activities, उदाहरणे, लघुपट व खेळांच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेचा उपयोग आपण आपापल्या गटासोबत काम करताना कसा होईल यावर विचारमंथन झाले.
            निर्माण १ च्या सायली तमाने, सनत गानू, धनंजय माळी, निर्माण ५ चा केदार आडकर यांनी काही सत्रे घेतली. नंदाकाकानी (नंदा खरे) देखील या कार्यशाळेत उपस्थित राहून सर्वांना प्रोत्साहन दिले. तर निर्माण ६ चे सम्मीत वर्तक,अमोल दळवी, निरंजन तोरडमल, इशा घुगरी, गीता लेले, गणेश माळी, शैलेश जाधवयांनी हे प्रशिक्षण शिबीर पार पाडण्यात खूप मोलाची मदत केली.
या प्रशिक्षणातून देण्यात आलेले काही महत्वाचे विचार असे होते – 
*       विद्यार्थी आपल्या ज्ञानाची निर्मिती स्वतः करत असतो
*       आयुष्य हेच शिक्षण आहे
*       कृतींमधून मुलांच्या वृत्तीमध्ये होणारा सकारात्मक बदल महत्वाचा आहे
*       कुमार निर्माण अंतर्गत मुलांच्या विविध कृती या फक्त माध्यम आहेत, साध्य नव्हे
            या कार्यशाळेत शेवटच्या दिवशी, आधीपासून कुमार निर्माणशी जोडल्या गेलेल्या मुलांचा कौतुकसोहळा मा. डॉ. अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
            या दोन वर्षांत अस लक्षात येत आहे की निर्माण युवा व कुमार निर्माण मधील शालेय मुले यांच्यातील अनोखे नाते हळूहळू आकार घेत आहे. कुमार निर्माण मध्ये निर्माण युवांचा वाढता सहभाग याचेच द्योतक आहे.
            शैलेश जाधव व प्रणाली सिसोदिया लवकरच प्रफुल्ल सोबत कुमार निर्माण साठी पूर्णवेळ काम सुरु करतील.
त्यांना आपल्या सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा!
            कुमार निर्माण चा गेल्या वर्षभराचा आढावा घेण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या - https://www.youtube.com/watch?v=bcPp2wcmaK0

कुमार निर्माण - एका निर्माणीच्या नजरेतून
कुमार निर्माणअगदी नावावरूनच या उपक्रमाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागते!
            समाजाशी नाते जोडणे,आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी,समस्यांविषयी विचार करणे हेच मुळी आपण विसरून गेलोय. जसे जसे आपण मोठे होत जातो तेव्हा जीवनचक्रात आपण असे अडकतो कि शेजारच्या घरात कोण राहते हे पण आपल्याला माहित नसते. सर्वच लहान मुलांमध्ये समाजाप्रती संवेदनशीलता असावी मात्र त्याचे रुपांतर नंतर संवेदनाहीन तरुणाईत होते.
लहान मुलांमधील हीच संवेदनशीलता जपण्याचे व योग्य पद्धतीने वृधिंगत करण्याचे कठीण काम कुमार निर्माणद्वारे चालू आहे.हे एक जागरूक पिढी घडवायचं काम आहे असेही म्हणता येईल. अल्पावधीतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेल्या कुमार निर्माणच्या विविध गटाच्या मुलांचे अनुभव ऐकण्याची संधी मला मिळाली.

            पहिल्यांदा कुमार निर्माण चा समन्वयक प्रफुल्ल शशिकांत याने आम्हाला या कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली.व जत तालुक्यातील एका टिमला भेट देण्याचे आम्ही ठरवले. मी, अरिंजय चौगुले व माझा लहान भाऊ त्या गटातील मुलांना काही गोष्टी,खेळ शिकवावेया उद्देश्याने गेलो होतो. पण त्या मुलांकडून आम्हीच खूप शिकलो.त्यांच्या sharing मधूनच आमचेच learning झाले.
            त्यानंतर कुमार निर्माणची पुणे येथील स्थानिक सादारीकरण कार्यशाळा अनुभवण्याची संधी मिळाली. पुण्याजवळील ५-६ गट तसेच अलिबाग येथीलएक गट मिळून साधारण ३५-४० मुले आपापल्या गटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आली होती. ५वी ते ७वी या वयोगटातीलमुलेत्यांच्या उपक्रमाची माहिती मोठ्या उत्साहाने व आत्मविश्वासाने सांगत होती,दुसऱ्या गटांना त्यांनी केलेल्या कामाविषयी प्रश्न विचारात होती.वाहतुकीचे नियम पाळा व अपघात टाळा’,अश्या विषयांवरची पथनाट्ये सादर करत होती. फक्त चांगली कामे करण्यासाठीची चढाओढ पहिल्यांदाच पाहायला मिळाली.
            काही मुलांनी सोसायटी मध्ये स्वच्छ भारत अभियान ची सुरुवात केलेली तर काहींनी घराजवळच्या बागेची साफसफाई केली होती,काहींनी डोंगरावर झाडे लावून ती जगवली होती तर काहींनी शाळेतील समस्या सोडवण्यासाठी मुख्याध्यापकांकडे विनंती केली होती. काहींनी गावातल्या समस्या साठी सरपंचाकडे निवेदन दिले होते. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काही गट कापडी पिशव्यांचा प्रचार करत होते तर काही गट फटक्यामुळे होणारे दुष्परिणाम लोकांना पटवून देत होते. एका गटाने तर प्रकाश वाटापुस्तकाचे सामुहिक वाचन केले होते. एका मुलींच्या गटाने ' बांधकामावर काम करणाऱ्या आजींना लागले असताना dettolआणून त्यांच्यावर प्रथमोपचार केले.
            वरवर सोप्या वाटणाऱ्या या गोष्टी प्रत्यक्षात करायला खूप हिम्मत लागते. आपला comfort zone मोडून बाहेर पडावे लागते. "लोक काय म्हणतीलयाचा विचार न करता आपले काम करत राहणे हे त्या मुलांकडून शिकण्यासारखे होते. हेच त्या' मुलांचे खूप मोठे यश आहे अस मला वाटत.त्यांच्या कामाबद्दलची आणि विचारांबद्दलची त्यांची असणारी स्पष्टता कौतुकास पात्र होती. मोठ्यांसारख्या मी असे करेन,तसे करेनअश्या गप्पान मारता ती खरीखुरी कामाला लागली होती. आपल्याला जमेल त्याप्रमाणे आजूबाजूच्या समस्यांवर तोड काढत होती. या कामगिरी पाठीमागे सर्वात मोठा वाट कुणाचा असेल तर तो त्यांच्या निमंत्रकांचा - ताई /दादांचा’. आपली स्वतःची मते,स्वतःचे विचार मुलांवर न लादता सुद्धा मुलांना चांगले वाईट यातील फरक ओळखायला शिकवणे हि मोठी कामगिरी ते समर्थपणे पार पाडत आहेत.
            हे सर्व कार्यक्रम मुलेशाळा व अभ्यास सांभाळून करत होती. विविध स्पर्धातून मिळणारे पैसे, खाऊचे पैसेकळत नकळत परत समाजसेवेसाठी वापरत होती. भविष्यातील कार्यक्रमांचे नियोजन करत होती. मुलांचे पालक,शाळेतील शिक्षक अगदी वर्गातले मित्र सुद्धा या कामात मदत करत होते हे पाहून नवल वाटले.कर के देखोहे निर्माण चे ब्रीदवाक्यच हि मुले जणू जगत आहेत.
प्रत्येक मुलाकडून काहीतरी शिकण्यासारखे होते. या कार्यक्रमातून लहान मुलांमधील अफाट क्षमतेची जाणीव आम्हाला झाली. या टेक-सॅव्हीदुनियेतकुमार निर्माण चे हे काम माणसाला माणसाशी जोडेल हे नक्की.
स्रोत: गीता लेले, lelegeeta14@gmail.com

कुमार निर्माण एका निर्माणी निमंत्रकाच्या नजरेतून
            जळगाव येथे कचरा वेचणाऱ्या मुलांसोबत काम करणारा अद्वैत दंडवते (निर्माण ४) हा कुमार निर्माण अंतर्गत निमंत्रक म्हणून कार्यरत आहे. या अनोख्या टिमच्या निमंत्रकाच्या भूमिकेतून त्याचे हे मनोगत.
            कुमार निर्माणच्या आमच्या गटातील मुले मुली हि एक तर कचरा वेचक आहेत किंवा असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची पाल्ये आहेत. कुमार निर्माणमध्ये आमची टीम सहभागी करताना,या मुलांच्या दैनंदिन आयुष्यातच इतक्या अडचणी, अडथळे आणि संघर्ष आहेत कि यातून बाहेर पडून ते आसपासच्या सामाजिक प्रश्नांबद्दल काही करतील हि अपेक्षा आम्ही ठेवली नव्हती. पण त्यांच्यात शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, संवेदनशीलता यावी, वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा तसेच आपल्या परिसरातील प्रश्नांकडे यांनी डोळसपणे बघावे असे मात्र आम्हाला नक्की वाटत होते.हे करताना मुलांप्रती प्रेम, त्यांच्या मतांचा आदर असे काही मुलभूत नियम आम्ही स्वत:शीठरवून घेतले आहेत.
            कुमार निर्माणशी संपर्क आल्यानंतर मुलांप्रती आपली वागणूक कशी असावी या बद्दल अधिक स्पष्टता येत गेली. मुलांनी गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबवले. वृद्धाश्रमाला भेट दिल्यानंतर मोठ्यांशी निट वागायचे ठरवले, यानंतर रस्त्यात कचरा करायचा नाही, स्वत:चे घर आणि परिसर स्वच्छ ठेवायचा हे मुलांनी ठरवले आणि ते तसे वागले सुद्धा!
            कुमार निर्माणच्या विभागीय शिबिरात आमच्या टीमने इतर टीम्स समोर सादरीकरणकेले आणि त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे याची जाणीव तेव्हा आम्हाला झाली. ही गोष्ट आमच्यासाठी खूप उत्साहवर्धक होती.
            माझ्या मते कुमार निर्माणचे सगळ्यात मोठे यश म्हणजे मुल प्रश्न विचारायला शिकली आहेत. हे असे का? आणि असे का नाही? असा प्रश्न ती विचारतात याचाच अर्थ त्यांच्या विचारांना चालना मिळायला लागली आहे. आपण सांगितलेले सगळेच खरे अस न मानता त्याबद्दल आधी खात्री करून नंतर त्यावर विश्वास ठेवायला लागली आहेत. खरोखर, कुमार निर्माणमुळे मुलांना तसेच आम्हाला सुद्धा एका आनंददायी शिक्षणप्रक्रियेचा भाग होण्याची संधी मिळाली आहे हे नक्की.

स्त्रोत: अद्वैत दंडवते, adwaitdandwate@gmail.com

शक्तीचा गौरव !

बचत गट चळवळ व्यापक आणि विस्तारलेली आहे. राज्यात ८लाख बचत गटांच्या माध्यमातून साधारणतः १ कोटी महिला या चळवळीशी जोडलेल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून चळवळीला उतरती कळा लागली आहे. गट फुटणे, कर्ज बुडणे, महिलांची आपपसात भांडणं होणे आणि बचतीचा योग्य आणि उत्पादक वापर न होणे अशा अनेक समस्या आहेत. बचत गटांचे व्यवहार पारदर्शक झाले तर या समस्या सुटू शकतात. त्यामुळे बचत गटांचे व्यवहार पारदर्शक करण्यासाठी, त्यांच्या कारभरवर देखरेख करण्यासाठी आणि गरजेनुसार गटांना मार्गदर्शन करण्यासाठी कल्याण टांकसाळे (निर्माण २) व टीम शक्ती फौंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. त्यांनी विकसित केलेल्या शक्तीबचतगट व्यवस्थापन प्रणालीचा सर्वोत्तम ५० डिजिटल कल्पनांमध्ये समावेश झाला आहे.

            केंद्र सरकारचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, Intel India आणि Indian Institute of Management (IIM), अहमदाबाद या चार संस्थानी मिळून डिजिटल इंडिया चॅलेंजह्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन केले होते. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य, शिक्षण, वित्तव्यवस्थापन, प्रशासन या क्षेत्रात सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवू शकतील अशा १९१३कल्पनांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. त्यापैकी ५० कल्पनांची निवड भारतातील सामाजिक प्रश्न सोडवू शकणाऱ्या कल्पनाम्हणून केली गेली. २०ते २२जुलै दरम्यान आय.आय एम् अहमदाबाद येथे या ५०कल्पना संगणक, फाइनान्स, बिझनेस आणि सरकारी क्षेत्रातील १५ तज्ञानसमोर मांडण्यात आल्या. या कल्पनांचा विस्तार करण्यासाठी पुढील टप्प्यांवर २० लाख रूपयापर्यंतचे अर्थसहाय्य मिळणार आहे.
कल्याण व शक्ती टीमचे हार्दिक अभिनंदन!
शक्तीच्या कामाबद्दल अधिक माहितीसाठी:  http://www.shaktifoundation.co.in
स्त्रोत: कल्याण टांकसाळे, kalyantanksale@gmail.com

खरंच दुष्काळ म्हणजे फक्त पाणी टंचाईच का ?

ताडोबाच्या जंगलात आपण वाघ बघायला जातो आणि त्यानिमित्ताने इतरही प्राणी दिसतात. त्याचप्रमाणे दुष्काळावर काम करण्याची प्रेरणा घेऊन दीड  महिना बीड जिल्ह्यातील नित्रुड येथे  गेलेल्या विकासवाघमोडेला (निर्माण ६) गावातील इतर समस्यांनीही अस्वस्थ केलं. विकासने त्यांना कसा प्रतिसाद दिला?
            दुष्काळ म्हटला की कडक उन्हाचा तडाका... भेगा पडलेले शेत... चातक पक्षाप्रमाणे ढगाकडे पावसाची वाट पाहत बसलेलाएक म्हातारा... अस चित्र रंगवलंजातं. झुंज दुष्काळाशीअभियानांतर्गत दोन महिने पूर्ण वेळ काम, आणि तेही ज्याला आपण महाराष्ट्रातील राजस्थान म्हणतो असा भाग..... मराठवाडा, आणि त्याच वाळवंटातील ज्याच्यावर ऊस तोडणीवाल्यांचा जिल्हाअसाशिक्का आहे, त्या बीड जिल्ह्यातील नित्रुड (ता. माजलगाव) या गावी काम केलं.काम करण्याआधी मला दुष्काळ विरुद्ध पाणी असंच वाटायचं. परंतु प्रत्यक्ष काम करताना माझी दुष्काळाविषयी संकल्पनाच बदलली.
            खरचं दुष्काळ म्हणजे फक्त पाणी टंचाईच का?” माझ्यामते खरंतर दुष्काळ म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभाव. मग तो रोजगाराचा असेल, शिक्षणाचा असेल, सरकारी योजनांचा असेल नाहीतर स्वत:च्याच गावामध्ये ऊस तोडणीनंतर परत आल्यावर न मिळणाऱ्या विकासाचा.१० एप्रिल २०१५, प्रथमच या भागात आलो आणि तेही काहीतरी आव्हानात्मक करायचं आहे असं ठरवून. गाव फिरताना सर्वत्र दिसली ती उदासीनता, बस स्टँडवर निवांत बसलेले लोक (वयोवृद्ध फक्त, कारण तरुण वर्ग ऊस तोडणीसाठी स्थलांतरित झाला होता), शेतात दिसलं ते वाळलेलं कापसाच पीक. हे सर्व पाहताना मनात एकाच प्रश्नाचा कल्लोळ माजला.आपण खरंच स्वातंत्र्य झालोय का?” या लोकशाहीप्रधान देशात ज्या विकासाच्या योजनांसाठी एवढा अमाप पैसा खर्च केला जातो त्या योजना खरंच तळातील लोकांपर्यंत पोहचल्या असतील का?
            मग तेव्हाच ठरवलं सध्या ६० दिवस आपल्याकडे आहेत या ६० दिवसात किमान ६ समस्या तरी आपल्यापरीने समजून घेऊन त्यावर काहीतरी उपाययोजना करायच्या.एक समस्या सोडवायला घेतली आणि दुसरी समस्या दिसत गेली. रोजगार हमी योजना गावात सुरु करायची या एकाच समस्येवर भर दिला होता. आणि त्याच वेळी इतर समस्या दिसल्या.
            गावात फिरताना एक जाणवलं की दलित आणि मुस्लीम वस्तीमध्ये विकासाचा खूप अभाव दिसला.मग ठरवलं फक्त या दोन वस्तीमधील लोकांमध्ये जागृती करायची व येथीलच समस्या जाणून घ्यायच्या.मुस्लीम वस्तीमधील लोकांमध्ये जागृती करताना लोक जास्त संवाद करत नव्हते. गावी मस्जिदमध्ये नमाजसाठी जात असल्यामुळे येथे पण मस्जिदमध्ये गेलो. त्यामुळे नंतर जाणवलं की लोक दिसेल तिथे बोलायला लागले आणि खुल्यामनाने संवाद करायला लागले.  
            रोजगार हमी योजनेची बऱ्यापैकी जागृती केली, लोक स्वतः हून भेटायला लागले. गावातीलच एका जोडप्याने (बाळासाहेब व वर्षाताई आवाड)खूप मदत केली. रोहयोबाबत सरपंचांशी व ग्रामसेवकांशी बोलताना त्यांनी नकारात्मकता दाखवली, पण मग मी लोकांना रोजगाराची किती गरज आहे याबाबत सांगितले. पण म्हणतात ना सरकारी काम आणि सहा महिने थांबतसा अनुभव आलाच. ग्रामसेवक ते तहसीलदार सर्वांना भेटायला लागले.येऊ घातलेल्या पावसाळयामुळेकाम काही चालू झाले नाही फक्त कामाचे अंदाजपत्रक तयार झाले.
            रोहयो जागृतीसाठीच गावात फिरताना एका बाईने तिचे वीजबिल सांगितले रुपये १३००० ! मीतिचे वीजबिल पहिले तर त्यावर मीटरचा फोटोच नव्हता. मग वस्तीमधील बऱ्यापैकीलोकांची बिले पाहिली. तर गेल्या दोन वर्षात फक्त डिसेंबर महिन्यातीलच बिलावर फोटो होता. मग ऑनलाईन आणि कार्यालयात जाऊन तक्रार दिली.त्यानंतर कार्यालयाने ज्या ठेकेदाराला फोटो काढण्याचा ठेका दिला होता, त्याच्या जागी नवा ठेकेदार नेमल्याची माहिती दिली.
            PHC उपकेंद्र तर लसीकरणाव्यतिरिक्त चालूच नसायचे मग ऑनलाईन व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.या समस्येचं काय झालं हे प्रत्यक्ष पहायला मी गावात राहू शकलो नाही, पण हे उपकेंद्र अधूनमधून उघडू लागल्याचे लोकांच्या फोनवरून कळले.
            ऊसतोडणीसाठी स्थलांतर करावे लागते, त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा कसा होतो, शेतीचे नुकसान कसे होते व इतर ही बऱ्याच बाबी सांगितल्या. एका माणसाने विचारले, ‘जर गावातच रोजगार मिळालातर कशाला जाऊ ऊसतोडायला?’ ऊसतोडणीवरून गावाकडे परतताना अपघातामुळे एक बाई पूर्णपणे झोपून होती. मग जाणवले जर या बाईचा अपघाती विमा असता तर तिला पैसे मिळाले असते. त्याच वेळी पंतप्रधानांनी दोन विमा योजनांची घोषणा केली होती. त्याबाबत मग जागृती केली. चक्क लोकांनी दुसऱ्याच दिवशी बॅंकेमध्ये जाऊन पैसे भरले.
            मोबाइल सिमकार्ड हरवल्यामुळे F.I.R. साठी माजलगाव पोलीस ठाणेमध्ये गेलो. परंतु रुपये २०० ची मागणी केली गेली. मग १०० या टोल फ्री नंबरवरती फोन केला. परंतु फोन न लागल्यामुळे सरळ जिल्हा पोलीस प्रमुखांना (पोलीसअधीक्षक) फोन केला.मग काय लगेच F.I.R. ची कार्बन कॉफी मिळाली.
            कोर्ट फी स्टँप साठी सहाय्यक दुय्यम उपनिबंधक कार्यालयात गेलो होतो. स्टँप वेंडर म्हणाले,‘रुपये १० चा एक स्टँप घेतला तर तो रुपये १५ ला मिळेल आणि ५ घेतले तर रुपये ६० होतील.मग सारथी या मुद्रांक विभागाच्या टोल फ्री नंबरला फोन केला व एक R.T.I. अर्ज दिला. परत काही दिवसांनी गेलो आणि स्टँप मागितले तर मग जेवढ्या रुपयांना होते तेवढ्यास दिले. समस्या सोडवता सोडवता मला यासर्वबाबीवरून एकच समजले की, समस्या म्हणजे दुसरे तिसरे काही नसून सृजनशीलतेचा अभावच आहे.
२४ जुलैच्या लोकमत दैनिकाच्या ऑक्सिजन पुरवणीत आलेली ही बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..
स्रोत: विकास वाघमोडे, waghmodevikas@gmail.com


दुष्काळाशी बालझुंज

मराठवाड्यातील आपल्या गावात दुष्काळाचा सामना करण्यासाठी अतुल गव्हाणे (निर्माण ६), त्याची मित्रमंडळी व शाळेतली मुले यांनी एक छोटं पाउल उचललं. त्यातून शिकायला तर मिळालंच, शिवाय आनंदही मिळाला. अतुलचा अनुभव त्याच्याच शब्दांत...
            जवळपास १२०० लोकवस्तीचं आमचं गाव. गावात पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ३ विहिरी आणि १ ट्यूबवेल आहेत पण त्यानांही पाणी जेमतेमच. तर खासगी विहिरींची संख्या २०० च्या वर आहे. तरी पण उन्हाळा लागला की टँकर सुरु. गावाला जणू काही टँकरची सवयच लागलेली. ह्या वर्षी मात्र संपूर्ण मराठ्वादाच दुष्काळात होरपळत असल्याने आमच्या गावाच्या वाट्याला टँकर मिळण्याची शक्यता कमी होती. उन्हाळ्याच्या सुरवातीला गावच्या एका हापस्याला पाणी होतं. जवळपास संपूर्ण गावाची तहानच तो हापसा भागवत होता. गावातील महिला हापस्याच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आणून धुनी-भांडी करत. त्यामुळे पाणी जमिनीत न मुरता त्याच बाष्पीभवनचं जास्त होत असे. असच जर होत राहिलं तर हापश्याचे पाणी देखील काही दिवसात संपून जाईल असं आमच्या लक्षात आलं. आणि मग आम्ही दुष्काळाला प्रत्त्युत्तर म्हणून हे वाया जाणारं पाणी आम्ही जमिनीत मुरावायचं ठरवलं.हे जलपुनर्भरणाच काम श्रमदानातून करायच ठरलं. हपाश्याजवळ ७ फूट x ७ फूट x १० फूट खड्डा खोदला. कपडे धुण्यासाठी व्यवस्थित दगड मांडून जागा तयार केली. दुसऱ्या दिवशी कपडे धुण्यासाठी येणाऱ्या बायांना याच महत्त्व समजावून सांगितलं. त्यांनाही ते पटलं. आता वाया जाणारे पाणी तिथेच मुरायला लागले. याचा फायदा असा झाला की संपूर्ण उन्हाळा भर आम्हाला हे पाणी पुरलं.
            
आपण शाळेत जे शिक्षण घेतो त्याचा प्रत्यक्ष वापर मात्र खूप कमी वेळा करतो. आम्ही शाळेतील मुलांना सोबत घेऊन केलेल्या कामाचे मोजमाप केले, आणि ह्या कामासाठी आपल्याला किती पैसे मिळाले असते हा हिशोब केला. आपण केलेल्या कामासाठी २०,००० रु. लागले असते हे कळल्यावर आपण हे काम केल्याचा अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून झळकत होता. हा हिशोब इथेच संपत नाही. आपण निसर्गाला जे काही देतो निसर्ग त्याच्या अनंतपटीने आपल्याला परत देत असतो. पाणी बचत, पाण्याचा पुनर्वापर, श्रमदानाचं महत्त्व, सामाजिक बांधिलकी, शाळेतील संज्ञांचा दैनंदिन जीवनातील अर्थ अशा अनेक गोष्टीचं बीजारोपण बाल दोस्तांच्या मनात झाले आहे. आमच्या गावातील पाण्याचा प्रश्न अजून पूर्णपणे सुटला नाही पण तो सोडवण्याच्या दृष्टीने एक पाउल पुढे टाकलं गेलं एवढं मात्र नक्की.
स्त्रोत: अतुल गव्हाणे, atulsg4131@gmail.com