'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 10 January 2013

सीमोल्लंघन, डिसेंबर २०१२


नमस्कार मंडळीमुहूर्त १२-१२-१२ च्या दिवशी १२ वाजता. कॉटन मार्केट, नागपूर पासून विधानसभेपर्यंत निघालेला  पाच हजारांहून अधिक ग्रामीण स्त्री-पुरुषांचा मोर्चा. अॅड. श्रीमती पारोमिता गोस्वामींच्या नेतृत्वाखाली ‘श्रमिक एल्गार’ या संघटनेच्या माध्यमातून संघटीत झालेले चंद्रपूर जिल्ह्यातले हे स्त्री-पुरूष. यांची मागणी चंद्रपूर जिल्ह्याची संपूर्ण दारूबंदी. २ वर्षांपूर्वी २०१० च्या हिवाळी अधिवेशनात काढलेल्या अशाच मोर्चाचा अनुभव पाठीशी. आश्वासन-समिती-अहवाल (फेब्रुवारी २०१२), पण दारूबंदीवर निर्णय नाही. या वेळी मात्र मुख्यमंत्र्यांशिवाय कोणाशीही वाटाघाटी करायच्या नाहीत आणि निर्णयाची तारीख मिळेपर्यंत नागपुरातून हटायचे नाही.

गाणी आणि घोषणांच्या गजरात पुढे जाणारा मोर्चा अपेक्षेप्रमाणे विधानसभेजवळ अडवला जातो. तिथेच ठाण मांडून बसलेल्या जनसमुदायासमोर भाषणे सुरू होतात. नेत्यांसोबत सामान्य, आदिवासी स्त्रियाही पुढे येऊन आपल्या अन्यायाबद्दल बोलू लागतात. त्यांच्या प्रत्येक वाक्याला जोरदार आरोळ्यांनी दाद मिळते. भाषणांच्यामध्ये लोकांनीच रचलेली दारूवरची गाणी, गाण्यांसोबत बायांनी उत्स्फूर्तपणे केलेला नाच. उपाशी पोटाचे कोणालाच भान नाही. भारावलेल्या वातावरणात अचानक ‘मुख्यमंत्री available नाहीत’ असा निरोप येतो. भाषणांची आक्रमकता वाढत जाते. घोषणांची तीव्रता वाढत जाते. निरोप मुख्यमंत्र्यांकडे जातो. थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांकडून शिष्टमंडळाला बोलावणे येते.

पारोमिता ताई, डॉ. राणी बंग (अम्मा) व सहकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला जाऊन दोनेक तास होत आले आहेत. अजूनही भेटच झालेली नाही. एव्हाना याच दिवशी निघालेले बाकीचे मोर्चे पांगलेले आहेत. लोकांच्यात अस्वस्थपणा वाढत आहे. मुख्यमंत्री भेटत नसतील तर आपणच त्यांना भेटू असा आक्रमक सूर लागतोय. इतक्यात पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची मीटिंग सुरू झाल्याची बातमी येते.

गंभीर चेहऱ्याने पारोमिता ताई परत आल्या आहेत. खटकन् बटन दाबावे तसे गाणी अचानक थांबून जातात व ताईंच्या हातात माईक दिला जातो. कोणताही राजकीय आधार नसताना केवळ बायांच्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांची भेट झाली म्हणून ताई बायांचे अभिनंदन करतात. ताई मीटिंगचा वृत्तांत सांगू लागतात- अबकारी खात्याचे मंत्री गणेश नाईक यांनी दारूबंदीच्या संदर्भात १० महिने कोणताही निर्णय घेतलेला नाही. आता जो काही निर्णय होईल तो मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे असा ताईंचा आग्रह मानून मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी घेतली आहे. जानेवारीच्या पहिल्याच कॅबिनेट मीटिंग मध्ये हा मुद्दा मांडण्याचं आणि ९ जानेवारीला निर्णय घेण्याचं त्यांनी आश्वासनही दिलं आहे. मात्र लेखी आश्वासन द्यायला ते तयार झालेले नाहीत. आश्वासनांचा थोडा बरा व बराच वाईट अनुभव असणाऱ्या ताईंनी १२ जानेवारी पर्यंत निर्णय झाला नाही तर बाया स्वतः दारूबंदी करतील असा इशारा दिलेला आहे.
*****

मोर्चात निर्माणींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. चंद्रपूरजवळच्या गडचिरोलीतून गौरी चौधरी, सुजय काकरमठ, अमृत बंग, अश्विन भोंडवे, विक्रम सहाने, वेंकटेश अय्यर, निखिल जोशी; नागपुरातून सजल कुलकर्णी, राहुल मोडक, रंजन पांढरे तसेच इतक्यात बनलेला नागपूरच्या युवांचा गट; मेळघाटमधून प्रियदर्श तुरे; अकोल्याहून विठ्ठल साळवे, यवतमाळहून धीरज देशमुख व सहकारी; उमरखेडहून जयश्री कलंत्री या विदर्भातल्या निर्माणी मित्रांसोबतच महाराष्ट्राच्या पश्चिम टोकाहून सांगलीचा संदीप ढोले यांनी १२-१२-१२ रोजी नागपूर गाठले. दिवसभर घडलेल्या घडामोडींच्या निमित्ताने संघर्षात्मक लढ्याचे अनेक पैलू जवळून पाहण्याची संधी निर्माणींना मिळाली. घडामोडी त्याच, मात्र पाहणाऱ्या व्यक्ती अनेक, त्यामुळे गटाचे एकूण शिक्षण एका व्यक्तीच्या शिक्षणापेक्षा साहजिकच अनेक पटींनी जास्त. प्रत्येकाला काय शिकायला मिळाले असेल मोर्चातून? वाचूया त्यांच्याच शब्दांत...

.  मोर्चाचे व्यवस्थापनगेल्या २ वर्षांपासून हा लढा सुरू आहेपण त्याचा जनाधार श्रमिक येल्गारने चांगलाच धरून ठेवला आहेमला वाटते त्याची काही कारणे अशी आहेत. लोकांच्या नेत्या पारोमिता ताईंसोबत आंदोलनातील कोणतेही महिला-पुरूष भेटू-बोलू शकत होत्यामोर्चाचे व्यवस्थापन मुख्यतः गावातले लोकच करत होतेछोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी (नाश्तापाणीघोषणागाणीभाषणेमोर्चातील लोकांना धरून ठेवत होत्या.
.  ग्रामीण लोकांबद्दलफक्त मुरुमुरे खाऊन ते दिवसभर दटून होतेरात्री उशीर होणेतिथेच झोपावे लागले तरी त्यांच्या काहीही तक्रारी नव्हत्यात्यांनी लिहिलेली गाणी परिस्थितीला धरून होतीमोर्चासमोर नाचणाऱ्या आजीबाई तरूणांनाही लाजवत होत्या.
.  राजकारणराजकारणीपोलीस सर्व प्रयत्न करत असतात मोर्चा दडपून टाकण्याचा-कधी खोट्या बातम्याखोटे निरोपकधी दमदाटीत्यांच्यावर विश्वास ठेवूच शकत नाही. ‘दारूबंदीचा निर्णय जानेवारीत होईल’ अशी मुद्रणप्रत जाहीर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी अजूनही पाळलेले नाहीतेव्हा जेवढं कायदेशीररित्या जाता येईल तेवढं चांगलं.
धीरज देशमुख
मोर्चा पाहून बऱ्याच बाबींबद्दल साक्षात्कार झाला. पैसे किंवा जेवण याच्या आमिषाशिवाय लोकांनी दारूबंदीच्या विरुद्ध संघर्षात्मक लढा द्यायचे ठरवले. वेगवेगळ्या गावातून, वयोगटातून जनसमुदाय नागपुरात जमला होता. लोक दारूबंदीसाठी भूक तहान विसरून मोर्चात सहभागी झाले. दुसऱ्यावेळेस मोर्चा काढून सुद्धा सरकारी यंत्रणेला योग्य प्रतिसाद देता आला नाही. सरकारी यंत्रणेला फक्त दारूविक्रीतून मिळणारे महसुली उत्पन्न महत्वाचे आहे हे स्पष्ट दिसत होते.
विठ्ठल साळवे
अनेक मोर्चांमध्ये सहभागी झालो होतो. परंतु खरंच काहीतरी विधायक व्हावं म्हणून स्वतःचा काहीही स्वार्थ नसताना केवळ सामाजिक भान ठेवून सामील झालो असा हा पहिलाच मोर्चा होतामनात किंचित किंतुपरंतु होते पण एकदा नारे लावायला  सुरुवात झाली आणि मनातले मळभ दूर झालेतिथे प्रचंड उत्साह होताठाम विश्वास  होता आणि त्यांनी ठरवलं होतं की यापुळे गप्प बसायच नाहीखरं तर परोमिता ताईअम्मा आणि अनेक मार्गदर्शक लाभलेल्या या मोर्चात खरे नायक ही सर्व जनताच  होती यांच्या शिवाय एक पाऊलही पुढे टाकता आलं नसतं
प्रियदर्श तुरे
कोणत्याही सामाजिक समस्येविरुद्ध लढा देण्यासाठी लोकांची तशी मानसिक तयारी करावी लागते. त्यासाठी आपली विरोधी भूमिका टिकून राहिली पाहिजे. त्यासाठी भाषणे, नाचगाणी, घोषणा अत्यावश्यक आहेत. या मोर्चासाठी नागपूरच्या अनेक महिलांची साथ मिळाली. त्यांनी आदिवासी महिलांची आरती करून, त्यांना शाल देऊन त्यांचे स्वागत केले. त्या दिवसापुरते का होईना आदिवासी महिलांपुढे सरकारला नमावे लागले. मुख्यमंत्र्यांनी आदिवासी महिलांना भेटण्यासाठी बोलावले ही लढ्याची जीत आहे.
जयश्री कलंत्री
एक गैरसमज दूर झाला. तथाकथित ‘समाजसुधारक’ हे फक्त जास्त शिकलेले, पांढरपेशे आणि शहरी लोकच असू शकतात हे पार फोल ठरलं. त्या बायांची तळमळ, त्यांची मेहनत, संघर्ष व त्यांचा उद्देश खरंच स्तुत्य व educating होता असं मला वाटलं.
उमेश जाधव
मला वाटते मोर्चा ही आजार सुरू झाल्यानंतरची खूप पुढची पायरी आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येऊन सरकारविरुद्ध घोषणाबाजी करतात, तेव्हा त्यांच्या रोजच्या जीवनावर किती मोठा परिणाम झालेला असावा! दारू पिणारे, दारू विकणारे, दोघांचे कुटुंबिय हे सर्वजण या आजाराचे शिकार आहेत. दारूचा आजार का होत असावा? बेरोजगारी/अर्धरोजगारी (४ महिने शेती झाल्यावर कमाईचे साधनच नाही) त्यामुळे होणारे आर्थिक व मानसिक ताणतणाव दारूकडे वळण्यास प्रवृत्त करत असावा का? या आजाराच्या कारणांवर काम करणे आणि मोर्चा/संघटन करणे या उपचाराच्या २ बाजू आहेत. माझ्यासाठी पहिली अधिक योग्य आहे असं वाटतं.
सजल कुलकर्णी
आमचा मोर्चा प्रवासातच सुरु झाला. नागपुरला जाताना मध्ये चंद्रपुर जिल्ह्यातील नागभीड हे तालुक्याचे गाव लागले. नागभीडला नाश्ता करण्यासाठी थांबलो. खाली उतरलो तर समोरच देशी दारुचे दुकान! काही मित्र आत घुसलो. आत मधील प्रचंड गर्दी पाहून जत्रेत कुस्त्या बघायाला घुसावे लागतं तसेच घुसावे लागले. प्रथमच अशा दुकानात जात होतो. मन आत जायाला तयार नव्हते. पण शेवटी आत गेलो. गर्दीमध्ये बहुतांश लोक २० ते ४० वयोगटातील होते. सर्वजण ग्लास मध्ये दारु घेऊन आतच असलेल्या नळाने त्या ग्लासात पाणी घेत होते आणि पटापट पित होते. पुन्हा रांगेत लागत होते. बहुतांश लोक हे मजुरी किंवा कष्टाची काम करणारे दिसत होते. दारु पिणार्‍यांची मोठ्या प्रमाणात संख्या पाहून खूप अस्वस्थ झालो. या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारु पिताना कधीच पाहिल नव्हतं. या सर्व कष्टकरी लोकांना का बरं दारु प्याविसी वाटत असेल? याचे कारण फक्त गरीबी आहे का? दारु गरीबीतून बाहेर यायाला मदत करते की गरीबी विसरायाला मदत करते? अशा अनेक प्रश्नांनी मनात थैमान घातले.
अश्विन भोंडवे
.  चंद्रपूर दारूबंदी आंदोलनाच्या आदल्या दिवशी नायनांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या दारू या विषयाशी संबधित जे अर्थकारणराजकारण समजावून सांगितले आणि नायनांचे दारू या विषयाचे लेखही वाचनात आलेत्यावरून मला असं वाटलं की कोणत्याही प्रश्नाचा अभ्यास करूनच मग आपण त्याविषयी आपले मत मांडले पाहिजे किंवा त्या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे.
.  विषयाच्या अभ्यासासोबतच आंदोलनमोर्चा यांसारख्या संघटनात्मक कृतींचे नियोजनतयारी आणि समज खूप नीट असली पाहिजे हे त्या दिवशी समजलंतिथल्या प्रत्येक कार्यकर्त्याची याबाबत लागणारी तयारी दिसून येत होती.
.  दारू या समस्येचे जिल्हापातळीवरील अनेक आर्थिकराजकीय पैलू शिकल्या-सावरल्या लोकांना अमुक तमुक कोटी रुपये खर्च या भाषेत समजत होते. पण तिथे आलेल्या प्रत्येक स्त्रीला हीच समस्या वैयक्तिक पातळीवर होतीप्रत्येकीचा नवरामुलगानातू दारू पीत होतेया सर्व स्त्रिया कदाचित एकमेकींना आधीपासून ओळखतही नसतील पण या आंदोलनाच्या मार्फत कळात-नकळत त्या एकमेकींच्या दुःखात सहभागी झाल्या होत्या. ‘ज्याचं जळतं त्यालाच कळतं’ हे त्या दिवशी जाणवलं.
गौरी चौधरी
मोर्चा विसर्जित झाल्यानंतर आजही दारूबंदीचा ठोस निर्णय झालाच नाही असा नाराजीचा सूर घेऊन ३-४ बाया पारोमिता ताईंकडे गेल्याकाही मिनिटांपूर्वीच आक्रमक भाषण दिलेल्या पारोमिता ताई त्यांना जवळ घेऊन प्रेमाने म्हणाल्या नाराज होऊन कसं चालेल माझ्या बायांनो६० वर्षांपासून दारू सुरू आहेबंद व्हायला ६ वर्षे तरी लागतील की नाहीएक वर्ष लष्करी अळी पडलीदुसऱ्या वर्षी दुष्काळ पडला म्हणून तिसऱ्या वर्षी आपण धान पेरतोच नाअजून आपल्याला वनहक्कस्त्रियांचे शिक्षण अशी लंबी लढाई द्यायचीयइतक्यात धीर गेला तर कसं होईल?” आंदोलकांना नाराज होता येतेपण नेत्याला ते स्वातंत्र्य नाहीमनातल्या भावनांच्या झोक्यांना फारसे महत्त्व न देता त्याला काम करत राहावेच लागते.
निखिल जोशी
दारुच्या व्यसनामुळे होणाऱ्या विविध दुषपरिणामांवर रचलेली गाणी गाताना व व्यसनी नवराबापमुलामुळे शेकडो यातना भोगलेल्या आपल्यातल्याच एका बाईचे मनोगत ऐकताना अनेक बायांच्या डोळ्यांवर आलेले अश्रू त्यांची दारूबंदीच्या मागणीबद्द्लची बांधीलकी घट्ट करताना दिसायचेआम्ही आणि आमच्यासारखी इतर विविध पार्श्वभूमीची माणसं तिथे गेल्यावर आमची वैयक्तिक ओळख विसरलोमोर्चाने आम्हाला सामावून घेतलंआजूबाजूला अनेक वेगळ्या कारणांसाठी मोर्चे निघाले होतेपण चंद्रपूर दारुबंदी मोर्चा संख्येने तर मोठा होताचशिवाय सर्वात दीर्घकाळ संख्या व उत्साह टिकून असलेला मोर्चा होतायाचे कारण कदाचित या समस्येची तीव्रता होती.
सुजय काकरमठ
लांबच लांब पसरलेली मोर्चेकऱ्यांची रांग आणि त्यात असलेले गावागावातून आलेलेमातकट कपड्य़ांतलेवऱ्हाडी बोलणारे स्त्री-पुरुष यांच्यामुळे तो मोर्चा सर्वसामान्यांची अस्सल अभिव्यक्ती वाटत होतात्याचा भाग बनता येणं हे भाग्य होतंएका किमान संख्येनंतर (म्हणजे काय?” हे नेमकं ठरवायला हवे!) मात्र मोर्चात किती लोक सहभागी आहेत यापेक्षा/यासोबतच ती पूर्ण प्रक्रिया किती ज्ञानदायी बनते आणि अहिंसक राहते हे महत्त्वाचे आहे असे वाटलेहे बोलणे/लिहिणे सोपे आहेकरणे कठीण आहेम्हणून गर्दीला/जमावाला खूश करण्यापेक्षा आणि दाहक वास्तवामुळे जागृत झालेल्या भावनांना अजून चेतवण्यापेक्षा गटाचे शिक्षण कसे होईल यादृष्टीने निर्माणचे युवा म्हणून आपण काय योगदान देऊ शकतो यावर काम करायला पाहिजे असे वाटते.
अमृत बंग
What could be added to make it better, was a question which rose up again and again.  I remembered what I read in Thomas Weber’s ‘on the salt march’. Gandhiji had trained the people who were with him on his famous ‘salt march’… similarly such a training of each member of the march would have enormously added to the impact of it.  Each member of the march keeping a fast for the whole period of march could have also added to dedication.  First of all, this fasting not for any kind of self punishment, but as an indication of the focus and importance each member gives to the cause. Secondly, each member who fasted throughout would have felt immense satisfaction of having sacrificed something of their own first for the cause, when they are asking rest of the society to change. Thirdly, the whole group of marchers would have bonded better with each other with the spirit of ‘oneness’.
Venkatesh Iyer
*****
व्याहाडच्या चंद्रकलाबाई (नाव बदलले आहे). रंग सावळा, चुणचुणीत बांधा, साडी मळलेली, साधारणपणे पस्तीस-चाळीशीची बाई. त्यांना ना कोणी कोंबड्या-बकऱ्याचे आमिष दाखवले होते, ना त्यांच्यासमोर पाचशेची नोट फेकली होती. पदरचे पैसे घालून, आपली रोजी बुडवून का आल्या होत्या त्या मोर्चात? चंद्रकलाबाईंचा बाप दारूडा. दारू पिऊन पिऊन मरून गेला. लग्न झाल्यावर समजले की नवराही दारूडा. १२-१५ वर्षे नवऱ्याने दारू प्यावी व बाईंनी मार खावा हा नित्याचा दिनक्रम. नवऱ्याच्या मृत्यूसोबतच या त्रासातून सुटका झाली. मात्र ज्याच्यासाठी ही १२-१५ वर्षे काढली, त्या मुलालाही अवघ्या १०व्या वर्गात दारूची सवय लागली. गावात तक्रार करावी तर सगळेच पिणारे. दारूविरुद्ध उघड बोलण्याचीही सोय नाही. ‘श्रमिक एल्गार’ची हाक ऐकली आणि आपल्या मुलापायी नागपूरला आल्या.

एका बाईला, फार फार तर एका गावातल्या बायांना दारूबंदी हवी, म्हणून आख्ख्या जिल्ह्याची दारूबंदी करावी का? चंद्रपूरचे व्यापक जनमत काय म्हणते? जिल्ह्यातील ८४७ पैकी ५८८ ( ६९ टक्के ) ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पारित करून चंद्रपुरात दारूबंदी मागितली आहेएक लाख महिलांनी स्वाक्षऱ्यांच्या निवेदनाद्वारे दारूबंदीची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील ग्रामसभा किंवा महिला बहुमताने मागणी करतील तिथे दारूबंदी करण्याचे राज्याचे धोरण १९९५ साली जाहीर झालेले आहेपुढे हे धोरण शासनाने शहरातील वॉर्डांनाही लागू केले आहे.
*****
चंद्रपूर एक अपवादात्मक जिल्हा आहे का महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांना दारूची झळ पोहोचली आहे? निर्माण ४ चा विठ्ठल साळवे याच्या पुढाकाराने शासकीय संकेतस्थळावरच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत होणाऱ्या दारूच्या खपाबद्दल आकडेवारी मिळाली आहे.
आपल्या जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत एकूण व दरडोई  दारूचा खप किती हे पाहण्यासाठी भेट द्या:

*****

दुष्काळाचा ज्वलंत प्रश्न


वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळेनजीकच्या काळात  सर्वत्र पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेषतः मराठवाड्याला ह्याची सर्वाधिक झळ पोहोचली आहे. जालना शहराला ४९ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातोय! एक संवेदनशील युवा म्हणून आपण ह्यात काय मदत करू शकतो असा विचार आपण सगळ्यांनीच करणे गरजेचे आहे. ह्या विषयाबद्दल एम.के.सी.एल. ने एन.एस.एस. व इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पुणेनगर व नाशिक  जिल्ह्यात काही निवडक ठिकाणी एन.एस.एस. कॅम्पसच्या माध्यमातून पाणी प्रश्नावर शाश्वत काम हाती घेण्याचे ठरविले आहे. पुणेनगरनाशिक व आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील निर्माणींसाठी ही योगदान देण्याची सुवर्णसंधी आहे. कार्यक्रमाचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल.
            एन.एस.एस. कॅम्पमध्ये स्थानिक लोकस्वयंसेवी संस्था  व एन.एस.एस.चे तरुण यांच्या माध्यमातून पाणलोट विकासावर पॉवर पॉइण्ट प्रेझेण्टेशनकंटूर मार्करचे प्रशिक्षण व प्रत्यक्ष पाणलोट क्षेत्र विकासासाठी श्रमदान हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व पुढील फॉलोअपसाठी प्रचंड प्रमाणात मनुष्यबळाची गरज पडणार आहे. आपण काही दिवस पूर्णवेळ किंवा अर्धावेळ जसे जमेल तसे ह्या कृती कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो. कॅम्पच्या तारखा खालील प्रमाणे – 
Pune Division
1.
RJSPM College of Pharmacy, Dudulgaon, At Davati, T.Khed. Pune

14 to 20 Jan 2013

Ahmednagar Division
1.
Tale-Dighe ASC college,Nannaj, T.Sangmaner

9 to 15 Jan 2013

2.
CDJ College of Commerce, Wadala Mahadeo,T. Shrirampur, Shrirampur.

9 to 15 Jan 2013

3.
MJS College, Ganeshgad, Kokangaon, T. Shrigonda

15 to 21 Jan 2013

4.
PVP college of Eng.,Viladghat, Jakhangaon, A'Nagar.

16 to 22 Jan 2013

5.
Pemraj Sara College, Pimpalgaon Wagha , A'Nagar
20 to 26 Jan 2013

Nashik Division
1.
MVP's(A&C) college, Makhamalabad, Mungsare, T & D. Nasik
24 to 30 Jan 13

प्रत्यक्ष एका ज्वलंत समस्येवर काम करण्याची संधी आपल्या सर्वांसाठी खूप काही शिकवून जाणारी ठरू शकेल. अशा आपत्तीच्यावेळी आपल्या समाजाचे एक वेगळे दर्शन आपल्याला घडू शकते. त्यामुळे आपण सर्व ह्यामध्ये मोठ्या संखेने सहभागी होऊन योगदान देऊयात हे कळकळीचे आवाहन. अधिक माहितीसाठी सायली तामणे sayali.tamane@gmail.com त्वरित संपर्क करा.  

निर्माण पाच करिता महाराष्ट्रा तील तरूणाई सर्च मधे दाखल         २९ डिसेंबर २०१२ ला निर्माण पाच बॅचचे पहिले शिबिर सर्च शोधग्राम येथे जल्‍लोषात सुरू झाले आहे. ५७ अवैद्यकीय युवांचा सहभाग असणारे हे शिबिर दि. ६ जानेवारी २०१३ पर्यंत चालणार आहे.  प्रथमच निर्माण मध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या सर्वच्या सर्व ३५ जिल्ह्यांतून आलेले अर्ज तसेच शिबिरार्थ्यांमध्ये मुलांचे व मुलींचे असणारे समप्रमाण ही निर्माणच्या पाचव्या बॅचची वैशिष्ट्ये म्हणता येतील.
दिल्लीच्या सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू अशा पार्श्वभूमीवर शिबीराची सुरूवात झाली. ‘दीपप्रज्वलन करताना आज आपल्या आतही एक ज्योत पेटायला हवी’ तसेच ‘मी जन्माला आल्यावर जे जग होते त्यापेक्षा अधिक सुंदर जग मी मारताना असेल यासाठी युवांनी प्रयत्नशील राहायला हवे’ असे आवाहन डॉ. अभय बंग (नायना) यांनी केले. ‘स्व पासून समाजाकडे व समाजापासून सृष्टीकडे’ हे सूत्र केंद्रस्थानी असणाऱ्या या शिबिरात उंची, रूंदी, खोली, वृत्ती व कालातीतपणाचे  प्रतीक म्हणून वटवृक्षाचे आरोपण करण्यात आले.
निर्माण ५ च्या वैद्यकीय युवांचे पहिले शिबीर २ ते १० फेब्रुवारी २०१३ दरम्यान संपन्न होत आहे. 

ग्रामीण विद्युतीकरणासाठी मयूर सरोदेचे मिशन ‘REnergize Planet’

निर्माण ४ च्या मयूर सरोदेने नागपूरच्या VNIT कॉलेज मधून मी याच वर्षी B.Tech पूर्ण केलं. त्यानंतर ६ महिने तो विज्ञान भारती या NGO मध्ये स्वयंसेवक म्हणून रुजू झाला. या संस्थेमध्ये त्यानं अपारंपारिक उर्जा स्त्रोतांच्या जागरूकतेसाठी सुरु करण्यात आलेल्या उपसंस्थेमध्ये राष्ट्रीय संयोजक म्हणून काम केलं. त्यात त्यानं ‘उर्जा इंडिया’ नावाचं राष्ट्रीय त्रैमासिक सुरु केलं. या त्रैमासिकाचे उद्घाटन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी कोलकाता येथे केले होते. याचे २ अंक त्याने काढले. ‘उर्जा वाहिनी’ नावाच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी याच विषयाची जागरूकता वाढवण्याचा कृती कार्यक्रम सुरु केला. यासोबतच गेल्या ६ महिन्याच्या कालखंडात त्याने सौर उर्जा या विषयाचा खोलात जावून अभ्यास करायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने चेन्नई मध्ये REaction 2012 नावाच्या एका राष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला होता. तसंच बंगलोर मध्ये सौरउर्जे संबंधी कार्यशाळेत सहभाग घेतला होता. डिसेंबर महिन्यात त्याने या संस्थेचा राजीनामा दिला. सध्या त्याने नाशिक मध्ये ‘REnergize Planet’ नावाची स्वतःची एक Social Enterprise सुरु केली आहे. त्यामध्ये त्याने सौर उर्जेची consultancy services सुरु केली आहे. या कामासाठी त्याला निर्माणचे Resource Person सुनील चव्हाण हे मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. त्याच अंतर्गत सध्या तो शोधग्राम मध्ये सोलर पॉवर प्लांट टाकण्याच्या एका प्रोजेक्टवर काम करतो आहे. वाढते वीजबिल आणि वाढत्या डिझेलच्या किंमती यांमुळे शोधग्राम मध्ये होणाऱ्या विजेच्या खर्चावर यामुळे बऱ्याच प्रमाणात मात करता येणार आहे. या कंपनीच्या मार्फत त्याला “ग्रामीण विद्युतीकरण” चे एक Business Model बनवायचे आहे.

चारुता गोखलेचा लोकसत्तेसोबत नवीन प्रवास सुरु


निर्माण १ ची चारुता गोखले, गेली ६-७ वर्ष पत्रकारिता एक छंद म्हणून जोपासत आहे. २००६ ते २००८ ही दोन वर्षे ती  मुंबईमध्ये लोकसत्ता या वृत्तपत्रात युथ बीट म्हणजेच तरूणाईला वाहिलेल्या सदरासाठी काम करत होती. त्यानंतर तिने पुण्यातून पत्रकारितेची पदवी घेतली. लोकसत्तेच्या या युथ बीटचे स्वरूप आता बदलले असून लोकसत्तेच्या लोकप्रभाया साप्ताहिकामधून हे सदर नव्याने सुरु होत आहे. दर महिन्याला या सदरात लिहिण्याची तिला पुन्हा संधी मिळाली आहे. या टीममध्ये तिच्याबरोबर पाच सहकारी काम करतील. तरुणांमधील सध्याचे Trends, काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या युवकांची धडपड, सद्य सामाजिक, राजकीय घटनांवरील त्यांची भूमिका याविषयी गंभीरस्वरूपाचे पण तरुणांना रुचेल असे लेखन हे या सदराचे वैशिष्ट्य असेल. यात इतर विषयांबरोबरच Youth and innovations या मथळ्याखाली ती दर महिन्याला महाराष्ट्रातील, देशातील किंवा जगभरातील विविध तरुण जे एखाद्या क्षेत्रात जगावेगळ्या किंवा कल्पक शोधांवर काम करत आहेत त्यांचे काम वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. जानेवारी २०१३ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेत Science & Technology Innovation Policy जाहीर होणार असून या पार्श्वभूमीवर हे सदर सुरु केले जाणार आहे.

            गेल्या तीन चार वर्षात निर्माणच्या निमित्ताने तिचा अनेक धडपड्या तरूणांशी परिचय झाला आहे. या उपक्रमासाठी तिला या युवकांची नक्कीच मदत होईल.

रंजन पांढरेचा तरुण भारत सोबत नवीन प्रवास सुरु


निर्माण ४ चा रंजन पांढरेला तरूण भारत या दैनिक वृत्तपत्राने नुकतीच त्यांच्या युवा पुरवणी फुल ऑन’ मध्ये लिहिण्याची संधी दिली आहे. ही  पुरवणी आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी प्रकाशित होते. या मध्ये त्याला एक स्तंभ (युवा बीट) लिहायचा आहे. आजचे युवक त्यांच्या समस्या, त्यांच्या आजूबाजूचे प्रश्न, एक युवा म्हणून त्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत, प्रत्यक्षात काम सुरु केलेले युवा यांच्याविषयी या स्तंभामध्ये मांडणी असेल. तसेच या स्तंभामध्ये तात्कालिक ताज्या घडामोडींविषयी लिखाण होईल. इतर युवांना प्रेरणा मिळावी हे हा स्तंभ लिहिण्यामागचे प्रयोजन आहे. येत्या १० जानेवारीला विदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या ‘फुल ऑन’ पुरवणीत या स्तंभाअंतर्गत गडचिरोलीत काम करणारे निर्माणचे तरुण डॉक्टर्स डॉ. विक्रम सहाने, डॉ. शिवप्रसाद थोरवे व डॉ. रामानंद जाधव यांच्यावरील लेख प्रसिद्ध होणार आहे.