वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे, नजीकच्या काळात सर्वत्र पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
विशेषतः मराठवाड्याला ह्याची सर्वाधिक झळ पोहोचली आहे. जालना शहराला ४९ दिवसांतून
एकदा पाणीपुरवठा केला जातोय! एक संवेदनशील युवा म्हणून आपण ह्यात काय मदत करू शकतो असा
विचार आपण सगळ्यांनीच करणे गरजेचे आहे. ह्या विषयाबद्दल एम.के.सी.एल. ने एन.एस.एस.
व इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यात काही निवडक ठिकाणी
एन.एस.एस. कॅम्पसच्या माध्यमातून पाणी प्रश्नावर शाश्वत काम हाती घेण्याचे ठरविले आहे.
पुणे, नगर, नाशिक व आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील निर्माणींसाठी ही योगदान देण्याची सुवर्णसंधी आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल.
एन.एस.एस. कॅम्पमध्ये स्थानिक लोक, स्वयंसेवी संस्था व एन.एस.एस.चे तरुण यांच्या माध्यमातून पाणलोट विकासावर पॉवर पॉइण्ट प्रेझेण्टेशन, कंटूर मार्करचे प्रशिक्षण व
प्रत्यक्ष पाणलोट क्षेत्र विकासासाठी श्रमदान हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व पुढील
फॉलोअपसाठी प्रचंड प्रमाणात मनुष्यबळाची गरज पडणार आहे. आपण काही दिवस पूर्णवेळ
किंवा अर्धावेळ जसे जमेल तसे ह्या कृती कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो. कॅम्पच्या तारखा खालील प्रमाणे –
Pune Division
|
||
1.
|
RJSPM College of Pharmacy, Dudulgaon, At
Davati, T.Khed. Pune
|
14 to 20 Jan 2013
|
Ahmednagar Division
|
||
1.
|
Tale-Dighe ASC college,Nannaj, T.Sangmaner
|
9 to 15 Jan 2013
|
2.
|
CDJ College of Commerce, Wadala Mahadeo,T.
Shrirampur, Shrirampur.
|
9 to 15 Jan 2013
|
3.
|
MJS College, Ganeshgad, Kokangaon, T. Shrigonda
|
15 to 21 Jan 2013
|
4.
|
PVP college of Eng.,Viladghat, Jakhangaon,
A'Nagar.
|
16 to 22 Jan 2013
|
5.
|
Pemraj Sara College, Pimpalgaon Wagha , A'Nagar
|
20 to 26 Jan 2013
|
Nashik Division
|
||
1.
|
MVP's(A&C) college,
Makhamalabad, Mungsare, T & D. Nasik
|
24 to 30 Jan 13
|
प्रत्यक्ष एका ज्वलंत समस्येवर काम करण्याची संधी
आपल्या सर्वांसाठी खूप काही शिकवून जाणारी ठरू शकेल. अशा आपत्तीच्यावेळी आपल्या
समाजाचे एक वेगळे दर्शन आपल्याला घडू शकते. त्यामुळे आपण सर्व ह्यामध्ये मोठ्या
संखेने सहभागी होऊन योगदान देऊयात हे
कळकळीचे आवाहन. अधिक माहितीसाठी सायली तामणे – sayali.tamane@gmail.com त्वरित संपर्क करा.
No comments:
Post a Comment