२९ डिसेंबर २०१२ ला निर्माण पाच
बॅचचे पहिले शिबिर सर्च शोधग्राम येथे जल्लोषात सुरू झाले आहे. ५७ अवैद्यकीय
युवांचा सहभाग असणारे हे शिबिर दि. ६ जानेवारी २०१३ पर्यंत चालणार आहे. प्रथमच निर्माण मध्ये सहभागी होण्यासाठी
महाराष्ट्राच्या सर्वच्या सर्व ३५ जिल्ह्यांतून आलेले अर्ज तसेच
शिबिरार्थ्यांमध्ये मुलांचे व मुलींचे असणारे समप्रमाण ही निर्माणच्या पाचव्या बॅचची
वैशिष्ट्ये म्हणता येतील.
दिल्लीच्या सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या तरुणीचा
दुर्दैवी मृत्यू अशा पार्श्वभूमीवर शिबीराची सुरूवात झाली. ‘दीपप्रज्वलन करताना आज
आपल्या आतही एक ज्योत पेटायला हवी’ तसेच ‘मी जन्माला आल्यावर जे जग होते
त्यापेक्षा अधिक सुंदर जग मी मारताना असेल यासाठी युवांनी प्रयत्नशील राहायला हवे’
असे आवाहन डॉ. अभय बंग (नायना) यांनी केले. ‘स्व पासून समाजाकडे व समाजापासून
सृष्टीकडे’ हे सूत्र केंद्रस्थानी असणाऱ्या या शिबिरात उंची, रूंदी, खोली, वृत्ती
व कालातीतपणाचे प्रतीक म्हणून वटवृक्षाचे
आरोपण करण्यात आले.
निर्माण ५ च्या वैद्यकीय युवांचे पहिले शिबीर २ ते १०
फेब्रुवारी २०१३ दरम्यान संपन्न होत आहे.
No comments:
Post a Comment