'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 10 January 2013

चारुता गोखलेचा लोकसत्तेसोबत नवीन प्रवास सुरु


निर्माण १ ची चारुता गोखले, गेली ६-७ वर्ष पत्रकारिता एक छंद म्हणून जोपासत आहे. २००६ ते २००८ ही दोन वर्षे ती  मुंबईमध्ये लोकसत्ता या वृत्तपत्रात युथ बीट म्हणजेच तरूणाईला वाहिलेल्या सदरासाठी काम करत होती. त्यानंतर तिने पुण्यातून पत्रकारितेची पदवी घेतली. लोकसत्तेच्या या युथ बीटचे स्वरूप आता बदलले असून लोकसत्तेच्या लोकप्रभाया साप्ताहिकामधून हे सदर नव्याने सुरु होत आहे. दर महिन्याला या सदरात लिहिण्याची तिला पुन्हा संधी मिळाली आहे. या टीममध्ये तिच्याबरोबर पाच सहकारी काम करतील. तरुणांमधील सध्याचे Trends, काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या युवकांची धडपड, सद्य सामाजिक, राजकीय घटनांवरील त्यांची भूमिका याविषयी गंभीरस्वरूपाचे पण तरुणांना रुचेल असे लेखन हे या सदराचे वैशिष्ट्य असेल. यात इतर विषयांबरोबरच Youth and innovations या मथळ्याखाली ती दर महिन्याला महाराष्ट्रातील, देशातील किंवा जगभरातील विविध तरुण जे एखाद्या क्षेत्रात जगावेगळ्या किंवा कल्पक शोधांवर काम करत आहेत त्यांचे काम वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. जानेवारी २०१३ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेत Science & Technology Innovation Policy जाहीर होणार असून या पार्श्वभूमीवर हे सदर सुरु केले जाणार आहे.

            गेल्या तीन चार वर्षात निर्माणच्या निमित्ताने तिचा अनेक धडपड्या तरूणांशी परिचय झाला आहे. या उपक्रमासाठी तिला या युवकांची नक्कीच मदत होईल.

No comments:

Post a Comment