I need some water to sprout
In this dreary
deadly summer,
I am alive because my hopes are
the hot heat waves are burning my leaves and flowers
but I am alive because I hope in future, there will be showers
I am alive because my hopes are
the hot heat waves are burning my leaves and flowers
but I am alive because I hope in future, there will be showers
A day will come when
I will be the witness of baby sparrow's first chirp
by getting my sweet fruits, the little squirrel will burp
I will decorate myself with the long and beautiful tender vines
and will look gorgeous after having bird nest of serene design
by getting my sweet fruits, the little squirrel will burp
I will decorate myself with the long and beautiful tender vines
and will look gorgeous after having bird nest of serene design
The twigs of mine
will make the shelter to the poor
travelers will take afternoon nap in my shadow for hours
despite all the adversities against my survival I believe in my dream
because my dreams are my life and my life is my dream
travelers will take afternoon nap in my shadow for hours
despite all the adversities against my survival I believe in my dream
because my dreams are my life and my life is my dream
- Sagar Kabra
८ मे २०१६ च्या दिवशी बिलासपूर (छत्तीसगढ) जवळ सागर-नेहा-पंकज या आपल्या मित्र मैत्रिणींचा
दुर्दैवी अपघात झाला.
या अपघाताने सागरला आपल्यातून नेले. नेहा व पंकज जखमी झाले. या कठीण प्रसंगानंतर दोघेही शारीरिक व
मानसिकदृष्ट्या सावरण्याचा धैर्याने प्रयत्न करत आहेत.
मूळ मानवतचा (जि. परभणी)
सागर यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS
झाला. कॉलेजमध्ये शिकत असताना अभ्यासासोबत आपण समाजासाठी काय करू शकतो या शोधात त्याने मेळघाटच्या आदिवासी पाड्यांतील बालमृत्यू कमी करण्यासाठी धडक मोहीम गाठली. पुढे सलग सहा वर्षे त्याने धडक मोहिमांचे काम नेटाने केले.
याचदरम्यान निर्माणच्या तिस-या बॅचमध्ये सागर आला. सागर-धीरज-पवन हे कॉलेजमधील घनिष्ठ मित्र निर्माणच्या शिबिरांतही उठून दिसत. ग्रामीण भागात आरोग्यसेवा
पोचवण्याबद्दल त्यांची कळकळ, धडाडी
यामुळे शिबिरात सकारात्मक वातावरण अगदी कायम राहात असे.
डॉक्टर झाल्यावर
सागरने छत्तीसगडमधल्या
गाणियारी
येथील 'जन स्वास्थ्य सहयोग' या आदिवासी,
दुर्गम भागातल्या दवाखान्यात आरोग्यसेवा देणं सुरू केलं.
यादरम्यान
अधिक चांगली आरोग्यसेवा देण्याची
क्षमता मिळवण्यासाठी त्यानं उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
आपलं
संपूर्ण आयुष्य ग्रामीण रूग्णसेवेसाठी द्यायचे सागरने ठरवले होते.
ग्रामीण
भागात जायला आधीच कमी डॉक्टर तयार होतात. ग्रामीण
भागात लोक आपल्या भागात कोणत्या स्पेशलायझेशनचे डॉक्टर आहेत हे पाहून आजारी पडत
नाहीत. जास्तीत जास्त
लोकांना सेवा द्यायची तर शरीराच्या एखाद्या अवयवावर स्पेशलायझेशन करून नाही चालणार.
त्यामुळे
सागरने 'जन स्वास्थ्य सहयोग' येथेच स्पेशलायझेशन इन जनरलायझेशन म्हणजे फॅमिली मेडिसीन या वलयांकित
नसलेल्या शाखेत प्रवेश घेतला.
रूग्णांबद्दल अतिशय संवेदनशील असणारा
सागर रूग्ण तपासणी करताना त्यांचे बोलणे समवेदनेने ऐकून घेई. हसतमुख, रूग्णाचे ऐकणारा आणि सक्षम डॉक्टर –
अतिशय दुर्मिळ आणि रूग्णांना दिलासा देणारे combination! आरोग्यसेवेसंबंधी लोकांवर होणारा
अन्याय त्याला अस्वस्थ करीत असे. सर्वांना
आरोग्यसेवा मिळावी असे त्याचे स्वप्न होते. आपले अनुभव, अस्वस्थता, स्वप्ने त्याने अतिशय सुंदर शब्दांत
मांडले आहेत. ते नक्की वाचा -
निर्माणच्या अनेक तरूण डॉक्टरांनी
ग्रामीण भागात एक वर्ष आरोग्यसेवा देण्याचा निर्णय मागच्या महिन्यात घेतला. सीमोल्लंघनमध्ये ही बातमी वाचून
सागरने १ मे ला त्यातल्या काही जणांना फोन केला. सागरला आधी कधीही न भेटलेल्या अमित
ढगेला सागरचे कौतुकाचे शब्द ऐकून भरून आले. सागरने अमितच्या निर्णयाचे कौतुक केले, त्याच्यासोबत ग्रामीण भागात
आरोग्यसेवा देताना आलेले अनुभव शेअर केले. Medico Friends Circle च्या धर्तीवर आपणही सामाजिकदृष्ट्या
सक्रीय डॉक्टरांचा गट बनवू असे सागरने सुचवले. सागरने पेरलेले बी आपले डॉक्टर मित्र
नक्कीच वाफवतील.
आज सागर आपल्यात नाही. पण आपल्या सर्वांच्यातच एक सागर आहे. सागरच्याच वरील कवितेप्रमाणे
आपल्यातला सागर अंकुरण्यासाठी त्याला काळजीपूर्वक व प्रयत्नपूर्वक पाणी घालूया.
No comments:
Post a Comment