'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 27 June 2016

हसत खेळत विज्ञान कार्यशाळा 2k16

शुभम गोटमारे आणि कल्याणी कोल्हे (दोघेही निर्माण ६) शाळेत असताना नंदाकाका (नंदा खरे) आणि विद्या खरे लहान मुलांसाठी आयोजित करत असलेल्या हसत खेळत विज्ञान कार्यशाळेत सहभागी होत होते. हीच संकल्पना पुढे नेत आपणही आत्ताच्या लहान मुलांसाठी अशाच प्रकारचा कार्यक्रम करावा अशी कल्पना त्यांना सुचली. मग बाकीचेही मित्र सोबत आले. (नंदा काका आणि विद्या काकू यांच्या प्रेरणेतून हे काम करत असल्याने त्यांनी गटाचे नाव ‘विद्यानंद’ ठेवले आहे.) त्यांनी नागपूर जवळील कळमेश्वर येथे दिनांक १४ जून ते १७ जून या काळात सातवी, आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘हसत खेळत विज्ञान कार्यशाळा 2k16’ या चार दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन केले होते. ह्या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते. मुलांचा व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक मूल्ये रुजवणे हा या शिबिराचा उद्देश होता.
शिबिरामध्ये शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन, dreams-goals-passion, व्यसनमुक्ती, लैंगिक शिक्षण, पर्यावरणाचे महत्व, शेतीचे महत्व, सामाजिक मुल्ये, fundamentals of life, parliamentary debate अशा विविध विषयांचा समावेश होता.
            या सगळ्यात आम्हाला निर्माणच्या मित्रमैत्रिणींची खूप मदत झाली आणि विद्यार्थ्यांचे पालक व शहरातील नागरिकांनी देखिल या उपक्रमाला पाठींबा दिला.
शुभम गोटमारे (निर्माण ६), 

No comments:

Post a Comment