पाश्चात्य भांडवलशाही ध्यान, योगासने इ. पौर्वात्य आध्यात्मिक संकल्पनांचा
आधार घेताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे, मग तो google च्या कर्मचाऱ्यांसाठी असणारा ‘search inside yourself’ हा कोर्स असो
किंवा EBay, Twitter, Facebook या कंपन्यांचे इतर उपक्रम असो.
याचा त्यांना काही फायदा होतो का? सतत ताणतणाव आणि प्रलोभनांचा सामना करता करता
थोडा वेळ शांतपणे विश्रांती घेतली तर फायदा होईल असे मानणे अवाजवी नक्कीच ठरणार
नाही. मात्र ज्या आजारांचा सामना करायचा, त्याच आजाराचा हे उपाय भाग होत आहेत.
‘स्पर्धेत टिकण्यासाठी, rat race मध्ये पुढे जाण्यासाठी ध्यान करणे’
असे या उपायांचे स्वरूप दिसत आहे. पौर्वात्य आध्यात्मिकतेचा पाश्चिमात्य
भांडवलशाहीवर प्रभाव पडण्याऐवजी उलटे होताना दिसत आहे. Economist मधील हा लेख:
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth
No comments:
Post a Comment