'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 4 December 2012

अशीही एक दिवाळी


रामानंद जाधवची जाराबंडी वैद्यकीय पथकात आगळीवेगळी दिवाळी
गडचिरोली जिल्ह्यातील जाराबंडी प्राथमिक आरोग्य पथकात वैद्यकीय अधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळणारा रामानंद जाधव दिवाळीला घरी जात असताना त्याला जाराबंडीच्या ग्रामसेवकाचा फोन आला. जाराबंडीजवळ झालेल्या पोलीस व नक्षलवाद्यांच्यात झालेल्या चकमकीत ३ पोलीस जखमी झाल्याचे वृत्त रामानंदला समजले. आपत्कालीन परिस्थितीत कधीही वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज लागू शकते हे समजून घेऊन जाराबंडीपासून १५० किमी. आलेला रामानंद त्वरित मागे फिरला व आपल्या वैद्यकीय पथकात रुजू झाला. वरवरची जखम असणाऱ्या २ पोलीसांवर आवश्यक ते उपचार केले. त्याच्या आईवडिलांनीही घाबरून न जाता उलट रामानंदला धीर दिला व दिवाळीत स्वतःच जाराबंडीला आले. आपले कर्तव्य बजावल्याचे, गरज असताना आईवडिलांचा आधार मिळाल्याचे व दिवाळीत वैद्यकीय पथकात राहिल्यामुळे मलेरियाच्या एका गंभीर रुग्णाला बरे करू शकल्याचे रामानंदला नक्कीच समाधान वाटत असेल.

No comments:

Post a Comment