'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 4 December 2012

चारुता गोखलेचे Indian council of medical research द्वारा आयोजित कॉन्फरन्समध्ये ‘मलेरिया’वरील संशोधनाचे सादरीकरण


निर्माण १ च्या चारुताने मदुराई येथे Indian council of medical research द्वारा आयोजित कॉन्फरन्समध्ये ‘मलेरिया’ या विषयावर सादरीकरण केले. Medical arthopodology (आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍य़ा कीटकांचे शास्त्र) असा या कॉन्फरन्सचा विषय होता.
चारुता गेली दीड वर्षे सर्च संस्थेबरोबर मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत काम करत आहे. राधिका सुंदराराजन या हार्वर्ड विद्यापीठाच्या डॉक्टरसोबत सर्चने नुकतेच एक संशोधन पूर्ण केले. या संशोधनाअंतर्गत आदिवासी लोकांच्या मलेरियासंबंधीच्या समजुती, मलेरिया प्रतिबंधात्मक उपाय तसेच सरकारी अधिकार्‍यांच्या दृष्टीने राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रमातील त्रुटी, त्यातील संभाव्य सुधारणा याचा खोलवर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून पुढे आलेले निष्क़र्ष चारुताने या दोन दिवसीय कॉंन्फरन्सदरम्यान तज्ञांपुढे मांडले. उपस्थितांमध्ये देशभरातील कीटकशास्त्रज्ञ, सामाजिक आरोग्य क्षेत्रातील शास्त्रज्ञ तसेच सरकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि पीएचडी विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
कॉंन्फरन्समध्ये प्रामुख्याने रोग ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे कीटक जे जंतुंचे वाहक असतात अशा  मलेरिया, फायलेरिया, डेंगी याविषयी लोकांनी सादरीकरण केले. यातील काही अभ्यास हे प्रयोगशाळेपुरते मर्यादित होते तर काही अभ्यासामधून बाहेर आलेली निरीक्षणं ही राष्ट्रीय कार्यक्रमांमधील सुधारणांच्या द्ष्टीने महत्त्वाची होती.
चारुताला कॉंन्फरन्सदरम्यान या अभ्यासासंबंधी अनेक सुझाव मिळाले. या अभ्यासाचे पुढे होणारे परिणाम, अभ्यास अधिक प्रभावी होण्यासाठी आवश्यक असणार्‍या सुधारणा, शोधनिबंध लिहिताना घ्यायची काळजी या मुद्यासंबंधी अनेक तज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. सर्चच्या मलेरिया नियंत्रण कार्यक्रमालाही या अभ्यासाचा फायदा होईल अशी आशा आहे

No comments:

Post a Comment