१८व्या शतकात सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे काही
वर्षांत विणकरांची पिढी बेरोजगार झाली होती. हीच परिस्थिती २०व्या शतकात सुरू
झालेल्या डिजिटल क्रांतीमुळे मध्यम कौशल्य असणाऱ्या वर्गावर (उदा. टायापिस्ट,
तिकीट एजंट इ.) आली आहे. अनेक अर्थतज्ञ असे मानतात की क्रांतीसाठी कारणीभूत innovation मुळे काही नोकऱ्या जात असल्या तरी समाजाचे एकूण राहणीमान वाढते, उच्च
राहणीमानामुळे वस्तू आणि सेवांची मागणी वाढते आणि त्यामुळे नव्या नोकऱ्या तयार
होतात. (उदा. सेक्रेटरींची संख्या कमी झाली तरी कॉम्प्युटर प्रोग्रामर्सची संख्या
वाढते.) मग काळजी करण्यासारखे काय आहे?
डिजिटल क्रांतीमुळे आलेल्या
समृद्धीचा अधिकाधिक वाटा भांडवलदारांनाच मिळत असल्याचे लक्षात येत आहे.
अमेरिकेच्या सर्वांत श्रीमंत १% लोकांना १९७० साली सकल उत्पन्नाचे ९% मिळत असत. हा
टक्का आता २२% पर्यंत पोहोचला आहे. गेल्या १४ वर्षांत अमेरिकेतील बेरोजगारी ३५%
वरून ४१%पर्यंत पोहोचली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार आज उपलब्ध
असलेल्यापैकी ४७% नोकऱ्या पुढील २ दशकांत मशीन्स करू शकतील.
आजच्या तंत्रज्ञानाचा उद्याच्या
रोजगारावर मोठा परिणाम होणार आहे आणि यासाठी कोणताही देश तयार नाही. डिजिटल
क्रांती आणि रोजगार यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकणारे इकॉनॉमिस्ट मधील हे
संपादकीय आणि एक लेख:
No comments:
Post a Comment