कोणतेही सामाजिक काम करताना लोक
केंद्रस्थानी असतात. लोकांच्या सहभागाशिवाय काम पुढे जाउच शकत नाही. कामाच्या
विविध टप्प्यांवर लोकांशी संवाद साधावा लागतो. सागर आबनेला रचनावादी शिक्षणाच्या
त्याच्या प्रयोगांत पालकांना सहभागी करून घेण्यासाठी त्यांच्याशी बोलावे लागते,
आकाश बडवेला दंतेवाड्यातील शेतकऱ्यांना SRI पद्धतीची उपयुक्तता पटवून
देण्यासाठी त्यांच्याशी बोलावे लागते, अमृत बंगला निर्माणबद्दल कॉलेजच्या
तरुण-तरुणींशी बोलावे लागते. रुग्ण-निदान व उपचार, शेतीच्या विविध प्रक्रिया,
शाळा-कॉलेजेसमध्ये शिकवणे ही जशी महत्त्वाची कौशल्ये आहेत, तसेच व तितकेच
महत्त्वाचे संवाद कौशल्य आहे. या कौशल्याला धार देण्यासाठी कळीचे मुद्दे सांगणारा The Hindu या दैनिकात आलेला हा एक उपयुक्त लेख:
http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-opportunities/how-to-persuade-audiences-to-action/article5939075.ece'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth
No comments:
Post a Comment