चेतना सोयाम (निर्माण ६) ९ एप्रिल २०१५ पासून
सर्चच्या दवाखान्यालीत दंतवैद्यक सेवेत रुजू झाली. या निर्णयापर्यंत ती कशी येऊन
पोहचली? तिच्या सर्च मधील कामाचे स्वरूप काय याबद्दल तिच्याच शब्दात:
“Dentistry ही विशिष्ट स्तरातल्या म्हणजे
पैशाने बऱ्यापैकी असलेल्या लोकांसाठीची आरोग्य सुविधा आहे असं चित्र सध्या
समाजामध्ये प्रचलित आहे. याची जाणीव मला माझी Private Practice करताना आणि कालांतराने वायुदलात
नोकरी करताना होत होती. या जाणीवेतून dentistry ही आरोग्य सुविधा चार भिंतींबाहेर घेऊन जाण्याची खूप
गरज आहे आणि ती तळागाळातल्या सगळ्याच लोकांपर्यंत पोहचली पाहिजे या विचाराला चालना
मिळाली.
सर्चच्या
‘मां दंतेश्वरी रुग्णालया’त गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या दंतचिकित्सा
विभागाची जवाबदारी माझ्याकडे आहे. डेंटल क्लिनिक दररोज नियमितपणे सुरूर करणे हे
प्रथम ध्येय आहे. त्याचसोबत सर्चच्या फिरत्या दावाखान्यासोबत जोडलेल्या ४८ आदिवासी
गावांना दंतचिकित्सेची सेवा देणे, तिथे Dental Health Survey करणे हे काम देखील सध्या सुरु आहे.
पुढे व्यसनमुक्ती टीम सोबत येथील आदिवासी आश्रम शाळा तसेच गैरआदिवासी शाळांमध्ये
तंबाखू मुक्ती आणि मुख आरोग्य या विषयांवरील कार्यक्रमात काम करण्याचे नियोजन
आहे.”
चेतनाला तिच्या नवीन कामासाठी शुभेच्छा !
No comments:
Post a Comment