'ला व्हिया कॅंपेसिना'च्या ब्राझील कार्यशाळेत झालेले
गणेश बिराजदारचे शिक्षण...
आपले
वेतन किंवा इतर सुविधांनी समाधानी नसल्यास डॉक्टर, शिक्षक,
रिक्षाचालक
किंवा अजून कोणीही काय करतात? संप,
आंदोलन,
असहकार!
आपली
सेवा न देण्याचा किंवा असहकाराचा अधिकार ही सामान्य माणसांसाठी आपल्या न्याय्य मागण्या
मान्य करून घेण्यासाठी एक अत्यंत महत्वाचे साधन आहे. १९७०
च्या दशकात अमेरिकेतील काही शेतकरी संघटनांनी अशाच पद्धतीने आपल्या पिकांना योग्य भाव
मिळावा यासाठी हे असहकाराचे शस्त्र उगारले, आणि
बाजारात मक्तेदारी असलेल्या कारगील या कंपनीला आपला शेतमाल न विकता,
तो
स्वतःच थेट जागतिक बाजारपेठेत विकण्याचा प्रयत्न केला. झालं
काय? कारगीलने बदल्यात अर्जेंटिनातून
लक्षावधी किलो गहू आयात करून गव्हाचे भाव पाडले आणि या शेतकरी संघटनांना हतबल केले.
आज हेच
चित्र जगभरात निर्माण झाले आहे, मूठभर
बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आर्थिक आणि राजकीय ताकदीच्या जोरावर सर्व थरातील सामान्य माणसाला
शक्तीविहीन केले आहे आणि सीमाविहीन बाजारव्यवस्थेच्या रचनेने स्थानिक पातळीवर अशा अन्यायाविरूद्ध
लढणे अशक्य केले आहे. त्यामुळे
जगभरातील शेतकरी आणि इतर सर्व लहान उद्योजक, कामगार
आपली उपजिविका गमावत आहेत. या परिस्थितीविरूद्ध
प्रांत किंवा देशाच्या पातळीवर लढा देणे शक्य नाही याची जाणीव झालेल्या जगभरातील विविध
संघटनांनी एकत्र येवून १९९३ साली 'ला व्हिया कॅंपेसिना'
या
आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केली. हे
आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार्य अधिक दृढ व्हावे आणि विविध संघटनांची आजच्या समाज-राजकीय
प्रश्नांविषयी 'परस्पर समज'
(mutual understanding) तयार व्हावी यासाठी मार्च २०१५ पासून ला व्हिया
कॅंपेसिना, ब्राझील मधील भूमीहीन
कामगार चळवळ (Movimento do trabalhadoris sem terra, MST) आणि
बर्था फाऊंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नातून 'राजकीय
संघटकांसाठी राजकीय प्रशिक्षण' हा सुमारे
६ ते ७ आठवड्याचा प्रशिक्षण वर्ग सुरू झाला. हा
प्रशिक्षण वर्ग 'एस्कोला नॅशिनॉल फ्लोरेस्तान
फर्नांडीस', ग्वारारेमा,
ब्राझील
येथे दिनांक २६ ऑक्टोबर ते १२ डिसेंबर २०१५ दरम्यान पार पडला.
या
वर्गात कोरडवाहू गट, विदर्भ
सेंद्रीय शेती अभ्यास गट आणि धरामित्र वर्धा यांच्या वतीने गणेश बिराजदारने सहभाग घेतला.
या
प्रशिक्षण वर्गात यावर्षी २१ देशातील सुमारे ४० संघटनांच्या ६०-६५
प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
याविषयी
आपले झालेले शिक्षण खालील दुव्यावर गणेशने मांडले आहे -
No comments:
Post a Comment