गेल्या काही दिवसांत सजल कुलकर्णी (निर्माण २) व आकाश शिंदे (निर्माण ६) यांचे शोधनिबंध
नामांकित जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले. त्याचाच हा वृत्तांत-
सजल कुलकर्णी गेल्या पाचेक वर्षांपासून विदर्भातील गायीगुरांचा संशोधनात्मक अभ्यास करत आहे. याच विषयाला
धरून सजलचा तिसरा शोधनिबंध (Research
Paper) जून २०१६ मध्ये ‘Research Journal of Animal Husbandry and Dairy Science’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. ‘नैसर्गिकतः
उपलब्ध असणाऱ्या चाऱ्याचा जाती आणि महाराष्ट्रातील कठाणी गायीगुरांच्या प्रजनन
क्षेत्रातील आहाराचे विश्लेषण’ हा त्याच्या अभ्यासाचा विषय होता.
महाराष्ट्रातील कठाणी गायीच्या प्रजनन स्थळात
सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या चाऱ्याच्या जाती जमा करून त्याचे पौष्टिक विश्लेषण
केल्यावर त्यामध्ये प्रथिने (४.७३ ते १३.३९%), फायबर (२३.५७ ते ३४.४४%) आणि तेल (०.२१ ते १०.२१%) असल्याचे आढळून आले. सर्व
नमुन्यांमध्ये सिलीकाचे प्रमाण ५ % पेक्षा कमी आढळले. यामधून सर्वसामान्यतः उपलब्ध
असलेल्या चाऱ्यामध्ये भरपूर विविधता असल्याचे निष्पन्न होते. शेतकऱ्यांना
चाऱ्याच्या पौष्टिक विश्लेषणानुसार आणि उपलब्धतेनुसार त्याचा योग्य प्रमाणात वापर
करता येईल. कमी संसाधनांमध्ये गायीगुरांची संख्या वाढवण्याकरिता
जंगलाचे असणारे महत्त्वही हा अभ्यास अधोरेखित करतो.
सजल कुलकर्णी (निर्माण २),
आकाश शिंदे गेले
एक वर्ष सुरत येथील ‘सेवा’ या स्वयंसेवी संस्थेसोबत m- health या
विषयावर काम करत आहे. मास्टर्सदरम्यान आकाश आणि त्याची सहकारी अंकिता शर्मा यांनी
याच विषयाच्या संदर्भात आपले dissertation
केले होते. माता आणि शिशुआरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य
केंद्रात Mother to Child
Tracking System (MCTS) या प्रणालीअंतर्गत
प्रत्येक गरोदर महिलेची नोदणी करून तिचे लसीकरण, प्रसूती, बाळाचे
लसीकरण या सर्व महत्वाच्या गोष्टींची तिला mobile sms द्वारा
आठवण करून दिली जाते. Dissertation दरम्यान गावपातळीवर MCTS ची
अंमलबजावणी कशाप्रकारे होते याचा त्यांनी अभ्यास केला होता. या
अभ्यासावरील शोधनिबंध International Journal of
Community Medicine and Public Health या जर्नलच्या August च्या
अंकात प्रकाशित झाला आहे. पुणे जिल्ह्यातील निवडक १० प्राथमिक केद्रांमधील २०५ गरोदर
बायका आणि २३६ माता या अभ्यासात सहभागी झाल्या असून MCTSच्या
अंमलबजावणीसंदर्भातील अनेक निरीक्षणे आकाश आणि अंकिताने नोंदवली आहेत. एकूण
महिलांपैकी फक्त १७% लोकांनी MCTSचे नाव ऐकले होते तर निव्वळ १४% लोकांनी
अशाप्रकारचा sms मिळाल्याचे नमूद केले. आरोग्य
क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मोबाईल तत्रज्ञाचा वापर होताना दिसून येत आहे. या
पार्श्वभूमीवर कागदोपत्री असलेल्या योजना प्रत्यक्षात आणताना काय अडथळे येऊ शकतात
आणि त्याचा लाभ नेमका किती जणांना मिळतो याची चुणूक या संशोधनात बघायला मिळते. आकाशच्या
या पहिल्या वहिल्या शोधनिबंधबद्दल त्याचे मन:पूर्वक अभिनंदन. हे
संशोधन http://www.scopemed.org/fulltextpdf.php?mno=233413 या लिंकवर उपलब्ध
आहे.
आकाश शिंदे (निर्माण ६),
No comments:
Post a Comment