नोव्हेंबर-डिसेंबर २०१५ च्या सीमोल्लंघनच्या
अंकात आपण जबाबदार आणि सक्रीय नागरिकत्वासाठी
प्रयत्न करणा-या
WE,
THE PEOPLE या उपक्रमाविषयी व नेटवर्कविषयी वाचले होते. या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये कृतीतून नागरिकशास्त्र शिकवण्याची अभिनव पद्धत विकसित होत आहे. WE, THE
PEOPLE ने १५ ऑगस्ट रोजी या पद्धतीचे चित्रण करणारी सुंदर व्हिडीओ फिल्म प्रसिद्ध केली आहे. या फिल्मची संकल्पना सायली तामणेची, दिग्दर्शन सनत गानूचे (दोघेही
निर्माण १), तर ध्वनिमुद्रण अमोघ पांडेचे (निर्माण ६) होते. माझलगाव (जि-बीड) येथील महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत केलेल्या उपक्रमाचे या फिल्ममध्ये चित्रण आहे.
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment