'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 27 October 2016

गडचिरोली जिल्ह्याला मिळाली मानसोपचारतज्ज्ञ

निर्माण ४ ची आरती गोरवाडकर सप्टेंबर २०१६ पासून सर्च मधील मां दंतेश्वरी रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून रुजू झाली आहे. तिच्या रूपाने सर्चला व परिणामी गडचिरोली जिल्ह्याला पूर्णवेळ मानसोपचारतज्ज्ञ मिळाली आहे. गेली २ वर्षे तिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) भावनगर, गुजरात येथून psychiatry या विषयात PG residensy पूर्ण केली.
आपल्या कामाबद्दल सांगताना आरती म्हणाली, “१० लक्ष लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मानसिक आजाराचे प्रमाण खूप आहे. मी सध्या सर्चच्या दवाखान्यात depression, anxiety, व्यसनाशी आणि इतर कारणांमुळे होणारे मानसिक आजारांचे उपचार करीत आहे. यासोबतच गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखू मुक्ती कार्यक्रमाअंतर्गत (मुक्तीपथ) सर्चला व्यसनमुक्ती केंद्र सुरु करीत आहोत. हे काम खूप उत्साहवर्धक आणि तेवढेच आव्हानात्मक देखील आहे. लहान मुलांचे मानसिक आरोग्य आणि त्यांच्या गरजा हा माझा आवडीचा विषय आहे. येणाऱ्या काळात त्यावर अधिक काम करण्याचा माझा मानस आहे.

आरती गोरवाडकर (निर्माण ४)

No comments:

Post a Comment