'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 27 October 2016

When in drought, save the livestock

            पशुधनहा शेतकऱ्यांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळ प्रवण भागांत शेतीच्या प्रत्यक्ष कामांत तसेच शेतीच्या उत्पन्नासोबत जोडधंदा म्हणून हे पशुधन मोठे महत्वाचे आहे. परंतू दुष्काळात जिथे माणसांनाच पुरेसे पाणी मिळत नाही तिथे मुक्या जनावरांची परिस्थिती अधिकच बिकट! गेल्या दोन वर्षातील दुष्काळात हेच चित्र पाहायला मिळाले.
ही परिस्थिती कशी बदलता येईल? दुष्काळात जनावरांना पुरेसा चारा आणि पाणी कसे उपलब्ध करून देता येईल? त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीची जपणूक कशी करता येईल? अशा प्रश्नांचा आढावा घेणारा सजलचा लेख ‘India Water Portal’ च्या वेबसाइट वर सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध झाला.
इच्छुक वाचकांसाठी ‘When in drought, save the livestock’ या त्याच्या लेखाची लिंक

सजल कुलकर्णी (निर्माण २),

No comments:

Post a Comment