Internship झाल्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांना धास्तावणारी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे – बॉंड! सरकारी अनुदानित (माफक)
दरात शिक्षण पूर्ण झाल्याची परतफेड म्हणून
१ वर्ष ग्रामीण/ आदिवासी भागात आरोग्य सेवा देणे विद्यार्थी डॉक्टरकडून अपेक्षित (बंधनकारक)
असते. कॅगच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील १०% हूनही कमी डॉक्टर्स सेवा देतात
किंवा दंड भरतात. पण निर्माण मधले बरेचशे डॉक्टर्स बॉंड पूर्ण करण्यासाठी ठरवून दुर्गम
ग्रामीण किंवा आदिवासी भागात पोस्टिंग घेतात. या एक वर्षात सरकारी आरोग्यसेवा
देणाऱ्या सगळ्यात तळाच्या यंत्रणेत निर्माणी डॉक्टरांनी काय पाहिलं, तसेच त्यांच्यात
काय बदल आणि शिक्षण झाले, ऐकुया त्यांच्याच शब्दांत...
निर्माण ५ ची डॉ.
सुजाता पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर इथून एमबीबीएस झाल्यावर, आपला
सरकारी बॉंड पूर्ण करण्यासाठी पुणे जिल्ह्यात खानापूर येथील प्राथमिक आरोग्य
केंद्रात वर्षभरापुर्वी वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली होती. या सदरात तिचा
अनुभव ऐकुया...
मी डॉ. सुजाता पाटील. प्राथमिक
आरोग्य केंद्र, खानापूर (जि. पुणे) येथे वैद्यकीय अधिकारी
म्हणून काम पाहत आहे. वरवर पाहता सगळं उत्तमच आहे; म्हणजे बाकी मित्रमंडळी आणि कुटुंबीयांना मी खूप ‘भारी’ काही तरी करत आहे असं काहीसं
वाटतंय, सरकारी नोकरी त्यात पगार उत्तम! पण थोडं आत शिरलं की ‘अधिकारी’ असूनही ‘अधिकारी’ नसणे, ही गोष्ट मला अनुभवायला मिळाली. किंवा मी
प्रभारी वैद्यकीय अधिकारी
नसल्याने मला ह्या गोष्टीची तितकीशी झळ बसली नसावी.
माझ्या एम.ओ.शिपच्या काळात मला चांगले वाईट असे दोन्ही अनुभव आले. बाह्य रुग्ण कक्ष, आंतर रुग्ण कक्ष, प्रसूती कक्षामध्ये निर्णय घेण्याचं आणि कृती करण्याचं १००%
स्वातंत्र्य ही प्राथमिक
आरोग्य केंद्रात मला मिळालेली
सर्वात महत्त्वाची गोष्ट! मग रुग्ण दवाखान्यात येताना बघण्यापासून ते त्याच्या आजाराचे निदान, उपचार, फॉलोअप
पर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया मलाच करायची असते (सब काम मुझे ही करने पड़ते
हैं, सफाई
भी, शॉपिंग भी!) ह्या प्रक्रियेत वरून
स्वतःला जाणवणारा हलका चिडचिडेपणा आहे पण माझ्या ओळखीचं माझं बळ देखील मला दिसतंय. पुस्तकात वाचलेल्या अनेक केसेस् जेव्हा खऱ्याखुऱ्या समोर येऊन उभ्या ठाकतात तेव्हा ‘आ’ वासून बघत बसते त्यांच्याकडे. काय तर
म्हणे, ‘टाकायासु आर्टेरायटीस’! (ह्यात अॅरोटा, कॅरोटिड सारख्या महत्वाच्या धमन्यांमधुन रक्ताला शरीराच्या
इतर भागांत पोचण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रुग्णाचे नाडीचे ठोके व रक्तदाब
मोजता येत नाही)
सुरुवातीचे
दोन तीन महिने प्राथमिक आरोग्य
केंद्राचा सेटअप आणि
तालुक्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्राना भेटी
देण्यातच
गेले. ह्या निमित्ताने बऱ्याच
सरकारी कर्मचाऱ्यांशी माझ्या ओळखी
झाल्या. मला
माझ्या व इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तुलनात्मक फरक पहायला
मिळाले. सुरुवातीच्या काळात वाटायचे, ओपीडी काय - रोज तेच तेच रुग्ण, त्याच त्याच तक्रारी आणि मी देखील वेगळा
असं काय करते, ‘पॅराडायक्लोरॅनटॅक’ देण्याशिवाय? ह्यावर जरा विचार केला, हे कसं शक्य आहे? मीच सांगते ना, आमचं प्रोफेशन म्हणजे
प्रत्येक शरीर वेगळं, खूप complicated असतं. मग? नेहमी ‘पॅराडायक्लोरॅनटॅक’ जरी देत असलीस तरी प्रत्येक
रुग्ण कसा वेगळा आहे,
हे मला
तरी माहिती असायलाच हवे.
(आणि असं नसेल तर वैद्यकीय अधिकारी
आणि येथील कर्मचारी ‘एकाच
माळेचे मणी’ नाही का?)
नंतर मी जरा हा विषय गंभीरपणे घेतला, नवीन
दृष्टीकोनातून रुग्णांना बघायला सुरुवात केली. रुग्णांच्या आणि माझ्या गप्पा
वाढल्या (वाढवल्या!). गरोदर माता, उच्च रक्तदाब, मधुमेह असलेले असे दररोज
गोळ्या खात असलेल्या रुग्णांकडे मी विशेष
लक्ष देत गेले;
त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला.
वर्षानुवर्षे गोळ्या खाऊन
परेशान झालेले हे रुग्ण
माझ्याजवळ त्यांचे मन मोकळे करतात, तेव्हा त्यांच्या आजाराबद्दलचे
त्यांचे गैरसमज दूर करायला मला जास्त कष्ट पडत नाहीत. आणि त्यांचा ट्रीटमेंटला compliance देखील
वाढतो.
दिवसाला असे ८-१० रुग्ण
फॉलोअपला येत असतात. त्यांच्या इतर
समस्यांवर चर्चा करून त्यांची मानसिकता समजून घेण्याचा मी प्रयत्न करते. ह्या जुन्या
आजारांसाठी फक्त औषधे सर्व काही नसून इतर बाबींचा त्यांच्या आजारावर व मनावर काय
परिणाम होतो, हे
लक्षात येते होते. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मी शक्य होईल तितका वेळ देते.
ह्यातून मनोविकार शास्त्रात मला माझ्या
करिअरच्या दृष्टीने पर्याय दिसतो.
एकटीने
काम सांभाळण्याचा तगडा अनुभव ह्या एका
वर्षात मला मिळाला.
स्वतःचे कौशल्य आणि ज्ञान तपासून पाहण्याचा मी एक वेगळा प्रयोग करून पाहिला, असं म्हणता येईल. आयुष्यात नंतर कधी ह्या ‘सरकारी’ वैद्यकीय अधिकारी पदावर राहून काम करण्याची संधी मिळेल न
मिळेल, पण
ह्या एका वर्षात
ऐकून माहिती असलेले सरकारी अधिकारी प्रत्यक्ष पहायला मिळाले. सरकारी यंत्रणा अगदी नायनांनी सांगितल्याप्रमाणेच
आहे. काम
करण्याची प्रेरणा नाही आणि यंत्रणा प्रचंड
भ्रष्ट
आहे. माझे प्राथमिक आरोग्य केंद्रसुद्धा ह्याला अपवाद नाही. वाचून, ऐकून शाळेत निबंध लिहून
माहिती असलेला भ्रष्टाचार इथे खुलेआम निर्लज्जपणे वावरताना पाहिला, तेव्हा
क्षणभर अंगावर काटाच
उभा राहिला. तेव्हापासून तर पैशाची किंमत माझ्या नजरेत आणखीनच कमी झाली. हे गोंधळ थांबविण्यासाठी मला
शक्य होतील तितके प्रयत्न केले, चालू
आहेत. (पैसे घेऊन इंटर्नची
पोस्टिंग मॅनेज करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रकरण वरपर्यंत पुराव्यानिशी तक्रार केल्यामुळे
सर्वांसमोर आलंय.)
मी या वर्षभरात काय
शिकले:
सगळ्यात पहिले, मी जबाबदारीने
वागायला शिकले. मला न पटणार्या गोष्टी, जसे खोटे प्रमाणपत्र देणे, नियम तोडून एखादी अनैतिक कृती करणे,
जेव्हा कुणीतरी गावगुंड नेता येऊन दमदाटी करून मला करायला भाग पाडतो तेव्हा माझी भूमिका काय असेल, ह्याचा मी आधीही विचार करायचे. प्राथमिक आरोग्य केंद्रात मला अशा प्रसंगांना बऱ्याचदा सामोरं जावं लागलं, तेव्हा मात्र मी ‘नाही म्हणजे नाही!’ ह्या भूमिकेवर ठाम राहिले
आणि गावगुंडांना
नेहमीच हाकलून लावले. तेव्हा मला लक्षात
आले की मी
अशा परिस्थितीला न घाबरता तोंड
देण्यास सक्षम आहे.
मेडिकल emergencies च्या
वेळी मी घाबरून, बावरून
न जाता शांतपणे विचार करून निर्णय घेऊ शकते, ही एक गोष्ट स्वतः बद्दल
नव्याने कळाली. माझे कौशल्य, ज्ञान आणि
तंत्रज्ञानाचा वापर करून मी चटकन उत्तरे शोधायला लागले. ह्यामुळे एक डॉक्टर म्हणून माझा आत्मविश्वास
वाढतोय.
आनंद दादाने सांगितलेली एक गोष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करत असताना नेहमी लक्षात
ठेवली आणि कटाक्षाने पाळली, ती म्हणजे, गॉसिप्समध्ये
पडू नका. माझ्यामुळे माझ्यात
व इतर कर्मचाऱ्यांमध्ये कधीच भांडणे किंवा
वेळ
वाया जाईल असे गॉसिप सेशन्स घडले
नाहीत. माझ्या कामांच्या दिवशी कर्मचारी वेळेवर येऊन हसतखेळत कामे करतात.
मी नाईट शिफ्ट्सच्या बाबतीत नियमित असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास
डॉक्टर उपलब्ध झाले. त्याचा परिणाम
म्हणून, डॉक्टर नाहीत असं सांगून प्रसूतीसाठी आलेल्या
सर्वच महिलांना पुढच्या दवाखान्यात रेफर
करण्याचे प्रमाण कमी झाले. सरकारी यंत्रणा कशी काम करते हे
तिथे स्वतः काम करून पाहिल्या शिवाय कळत नाही. देशाच्या वैद्यकीय यंत्रणेचा महत्त्वाचा भाग बनून काम करण्याची संधी आणि जबाबदारी येथे आहे. भविष्यात काम करताना माझी
स्वतःची यंत्रणा ह्या यंत्रणेपेक्षा अधिक चांगली कशी बनवता येईल यात इथल्या अनुभवांचा नक्की फायदा होईल. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व
कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम करतांना नेतृत्वगुण, स्वतःची मूल्यव्यवस्था, सरकारी नियम, शिस्त ह्यांची सांगड घालणे – हे एक आव्हान आहे आणि मज्जाही!
Internship झाल्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांना धास्तावणारी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे – बॉंड! सरकारी अनुदानित (माफक)
दरात शिक्षण पूर्ण झाल्याची परतफेड म्हणून
१ वर्ष ग्रामीण/ आदिवासी भागात आरोग्य सेवा देणे विद्यार्थी डॉक्टरकडून अपेक्षित (बंधनकारक)
असते. कॅगच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील १०% हूनही कमी डॉक्टर्स सेवा देतात
किंवा दंड भरतात. निर्माण मधले बरेचशे डॉक्टर्स ठरवून बॉंड पूर्ण करण्यासाठी दुर्गम
ग्रामीण किंवा आदिवासी भागात पोस्टिंग
घेतात. या एक वर्षात सरकारी आरोग्यसेवा देणाऱ्या सगळ्यात तळाच्या यंत्रणेत निर्माणी
डॉक्टरांनी काय पाहिलं, तसेच त्यांच्यात काय बदल आणि शिक्षण झाले, ऐकुया त्यांच्याच
शब्दांत...
निर्माण ५ ची डॉ.
सुजाता पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर इथून एमबीबीएस झाल्यावर, आपला
सरकारी बॉंड पूर्ण करण्यासाठी पुणे जिल्ह्यात खानापूर येथील प्राथमिक आरोग्य
केंद्रात वर्षभरापुर्वी वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली होती. या सदरात ऐकुया
तिचा अनुभव...
मी डॉ. सुजाता पाटील. प्राथमिक
आरोग्य केंद्र, खानापूर (जि. पुणे) येथे वैद्यकीय अधिकारी
म्हणून काम पाहत आहे. वरवर पाहता सगळं उत्तमच आहे; म्हणजे बाकी मित्रमंडळी आणि कुटुंबीयांना मी खूप ‘भारी’ काही तरी करत आहे असं काहीसं
वाटतंय, सरकारी नोकरी त्यात पगार उत्तम! पण थोडं आत शिरलं की ‘अधिकारी’ असूनही ‘अधिकारी’ नसणे, ही गोष्ट मला अनुभवायला मिळाली. किंवा मी
प्रभारी वैद्यकीय अधिकारी
नसल्याने मला ह्या गोष्टीची तितकीशी झळ बसली नसावी.
माझ्या एम.ओ.शिपच्या काळात मला चांगले वाईट असे दोन्ही अनुभव आले. बाह्य रुग्ण कक्ष, आंतर रुग्ण कक्ष, प्रसूती कक्षामध्ये निर्णय घेण्याचं आणि कृती करण्याचं १००%
स्वातंत्र्य ही प्राथमिक
आरोग्य केंद्रात मला मिळालेली
सर्वात महत्त्वाची गोष्ट! मग रुग्ण दवाखान्यात येताना बघण्यापासून ते त्याच्या आजाराचे निदान, उपचार, फॉलोअप
पर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया मलाच करायची असते (सब काम मुझे ही करने पड़ते
हैं, सफाई
भी, शॉपिंग भी!) ह्या प्रक्रियेत वरून
स्वतःला जाणवणारा हलका चिडचिडेपणा आहे पण माझ्या ओळखीचं माझं बळ देखील मला दिसतंय. पुस्तकात वाचलेल्या अनेक केसेस् जेव्हा खऱ्याखुऱ्या समोर येऊन उभ्या ठाकतात तेव्हा ‘आ’ वासून बघत बसते त्यांच्याकडे. काय तर
म्हणे, ‘टाकायासु आर्टेरायटीस’!
सुरुवातीचे
दोन तीन महिने प्राथमिक आरोग्य
केंद्राचा सेटअप आणि
तालुक्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्राना भेटी
देण्यातच
गेले. ह्या निमित्ताने बऱ्याच
सरकारी कर्मचाऱ्यांशी माझ्या ओळखी
झाल्या. मला
माझ्या व इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तुलनात्मक फरक पहायला
मिळाले. सुरुवातीच्या काळात वाटायचे, ओपीडी काय - रोज तेच तेच रुग्ण, त्याच त्याच तक्रारी आणि मी देखील वेगळा
असं काय करते, ‘पॅराडायक्लोरॅनटॅक’ देण्याशिवाय? ह्यावर जरा विचार केला, हे कसं शक्य आहे? मीच सांगते ना, आमचं प्रोफेशन म्हणजे
प्रत्येक शरीर वेगळं, खूप complicated असतं. मग? नेहमी ‘पॅराडायक्लोरॅनटॅक’ जरी देत असलीस तरी प्रत्येक
रुग्ण कसा वेगळा आहे,
हे मला
तरी माहिती असायलाच हवे.
(आणि असं नसेल तर वैद्यकीय अधिकारी
आणि येथील कर्मचारी ‘एकाच
माळेचे मणी’ नाही का?)
नंतर मी जरा हा विषय गंभीरपणे घेतला, नवीन
दृष्टीकोनातून रुग्णांना बघायला सुरुवात केली. रुग्णांच्या आणि माझ्या गप्पा
वाढल्या (वाढवल्या!). गरोदर माता, उच्च रक्तदाब, मधुमेह असलेले असे दररोज
गोळ्या खात असलेल्या रुग्णांकडे मी विशेष
लक्ष देत गेले;
त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला.
वर्षानुवर्षे गोळ्या खाऊन
परेशान झालेले हे रुग्ण
माझ्याजवळ त्यांचे मन मोकळे करतात, तेव्हा त्यांच्या आजाराबद्दलचे
त्यांचे गैरसमज दूर करायला मला जास्त कष्ट पडत नाहीत. आणि त्यांचा ट्रीटमेंटला compliance देखील
वाढतो.
दिवसाला असे ८-१० रुग्ण
फॉलोअपला येत असतात. त्यांच्या इतर
समस्यांवर चर्चा करून त्यांची मानसिकता समजून घेण्याचा मी प्रयत्न करते. ह्या जुन्या
आजारांसाठी फक्त औषधे सर्व काही नसून इतर बाबींचा त्यांच्या आजारावर व मनावर काय
परिणाम होतो, हे
लक्षात येते होते. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मी शक्य होईल तितका वेळ देते.
ह्यातून मनोविकार शास्त्रात मला माझ्या
करिअरच्या दृष्टीने पर्याय दिसतो.
एकटीने
काम सांभाळण्याचा तगडा अनुभव ह्या एका
वर्षात मला मिळाला.
स्वतःचे कौशल्य आणि ज्ञान तपासून पाहण्याचा मी एक वेगळा प्रयोग करून पाहिला, असं म्हणता येईल. आयुष्यात नंतर कधी ह्या ‘सरकारी’ वैद्यकीय अधिकारी पदावर राहून काम करण्याची संधी मिळेल न
मिळेल, पण
ह्या एका वर्षात
ऐकून माहिती असलेले सरकारी अधिकारी प्रत्यक्ष पहायला मिळाले. सरकारी यंत्रणा अगदी नायनांनी सांगितल्याप्रमाणेच
आहे. काम
करण्याची प्रेरणा नाही आणि यंत्रणा प्रचंड
भ्रष्ट
आहे. माझे प्राथमिक आरोग्य केंद्रसुद्धा ह्याला अपवाद नाही. वाचून, ऐकून शाळेत निबंध लिहून
माहिती असलेला भ्रष्टाचार इथे खुलेआम निर्लज्जपणे वावरताना पाहिला, तेव्हा
क्षणभर अंगावर काटाच
उभा राहिला. तेव्हापासून तर पैशाची किंमत माझ्या नजरेत आणखीनच कमी झाली. हे गोंधळ थांबविण्यासाठी मला
शक्य होतील तितके प्रयत्न केले, चालू
आहेत. (पैसे घेऊन इंटर्नची
पोस्टिंग मॅनेज करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रकरण वरपर्यंत पुराव्यानिशी तक्रार केल्यामुळे
सर्वांसमोर आलंय.)
मी या वर्षभरात काय
शिकले:
सगळ्यात पहिले, मी जबाबदारीने
वागायला शिकले. मला न पटणार्या गोष्टी, जसे खोटे प्रमाणपत्र देणे, नियम तोडून एखादी अनैतिक कृती करणे,
जेव्हा कुणीतरी गावगुंड नेता येऊन दमदाटी करून मला करायला भाग पाडतो तेव्हा माझी भूमिका काय असेल, ह्याचा मी आधीही विचार करायचे. प्राथमिक आरोग्य केंद्रात मला अशा प्रसंगांना बऱ्याचदा सामोरं जावं लागलं, तेव्हा मात्र मी ‘नाही म्हणजे नाही!’ ह्या भूमिकेवर ठाम राहिले
आणि गावगुंडांना
नेहमीच हाकलून लावले. तेव्हा मला लक्षात
आले की मी
अशा परिस्थितीला न घाबरता तोंड
देण्यास सक्षम आहे.
मेडिकल emergencies च्या
वेळी मी घाबरून, बावरून
न जाता शांतपणे विचार करून निर्णय घेऊ शकते, ही एक गोष्ट स्वतः बद्दल
नव्याने कळाली. माझे कौशल्य, ज्ञान आणि
तंत्रज्ञानाचा वापर करून मी चटकन उत्तरे शोधायला लागले. ह्यामुळे एक डॉक्टर म्हणून माझा आत्मविश्वास
वाढतोय.
आनंद दादाने सांगितलेली एक गोष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करत असताना नेहमी लक्षात
ठेवली आणि कटाक्षाने पाळली, ती म्हणजे, गॉसिप्समध्ये
पडू नका. माझ्यामुळे माझ्यात
व इतर कर्मचाऱ्यांमध्ये कधीच भांडणे किंवा
वेळ
वाया जाईल असे गॉसिप सेशन्स घडले
नाहीत. माझ्या कामांच्या दिवशी कर्मचारी वेळेवर येऊन हसतखेळत कामे करतात.
मी नाईट शिफ्ट्सच्या बाबतीत नियमित असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास
डॉक्टर उपलब्ध झाले. त्याचा परिणाम
म्हणून, डॉक्टर नाहीत असं सांगून प्रसूतीसाठी आलेल्या
सर्वच महिलांना पुढच्या दवाखान्यात रेफर
करण्याचे प्रमाण कमी झाले. सरकारी यंत्रणा कशी काम करते हे
तिथे स्वतः काम करून पाहिल्या शिवाय कळत नाही. देशाच्या वैद्यकीय यंत्रणेचा महत्त्वाचा भाग बनून काम करण्याची संधी आणि जबाबदारी येथे आहे. भविष्यात काम करताना माझी
स्वतःची यंत्रणा ह्या यंत्रणेपेक्षा अधिक चांगली कशी बनवता येईल यात इथल्या अनुभवांचा नक्की फायदा होईल. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व
कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम करतांना नेतृत्वगुण, स्वतःची मूल्यव्यवस्था, सरकारी नियम, शिस्त ह्यांची सांगड घालणे – हे एक आव्हान आहे आणि मज्जाही!
सुजाता
पाटील, निर्माण ६
No comments:
Post a Comment