'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 4 March 2017

पुस्तक परिचय

उद्या – नंदा खरे

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या जीवनावश्यक मुल्यांचा पूर्णपणे विसर पडलेल्या भविष्यातील समाजाचे, ज्याला जीवनातील प्रत्येक गोष्टी मध्ये मुल्यवृधी ची सवय झालेली आहे, अशा या परिस्थितीत मनुष्याच्या खाजगी जिवनावरील अतिक्रमण, मोठमोठ्या कंपनीचे आक्रमक धोरणे आणि त्याचे मानवी जीवनावरील होणारे दुष्परिणाम याचे विस्तृत विवरण नंदा खरे यांनी “उद्या” या कादंबरीत केलेलं आहे.
मुल्यवृधीच्या मागे पळत असलेल्या “उद्या” कांदबरीतील विविध पात्रांच्या जीवनावरून त्यांची कशाप्रकारे कोंडी झालेली आहे हे दिसून येते. अगदी जीवनाश्यक वस्तूंच्या बाजारीकरणामुळे सामान्य लोकांवरील मुल्यावृधीचा ताण व त्यामधून तयार झालेली समाजातील प्रचंड मोठी दरी, यामुळे जीवन हे अगदी असह्य आणि निरस झालेलं आहे. लोकांच्या जीवनातील प्रेम, करुणा या भावनेचे स्थान आता मुल्यवृधीने घेतलेले आहे. परिणामी समाजात गुन्हेगारी चे प्रमाण वाढत चालले आहे. निसर्गात कमजोर मानल्या जाणाऱ्या स्त्री वर याचा खूप वाईट परिणाम झालेला आहे. स्त्रियांचे बाहेर एकटे पडणे अशक्य झालेलं आहे.
भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन नंदा खरे यांनी “उद्या” मध्ये विविध गोष्टींची सांगड घालून, आपल्या स्वातंत्र्यावर कशाप्रकारे अतिक्रमण होऊ शकते हे खूप स्पष्टपणे मांडलेलं आहे. भरोसा आणि विकास या दोन उद्योगसमूहांनी जवळपास प्रत्येक गोष्टीवर स्वतःच प्रभुत्व निर्माण केलेलं आहे. सरकार हे फक्त या उद्योगसमूहाचे खेळणे बनून राहिलेलं आहे अस दिसते. प्रत्येक मनुष्याचे चे अस्तित्व एका “कार्डवर” आल्याने ज्यावर २४ तास नजर असते, त्यामुळे वेगळ काही करणे खूप अश्यक्य झालेलं आहे. भरोसा आणि विकास हे फक्त इतक्या वरच न थांबता कुणी काही वेगळ केल्यास त्यांना जीवे मारणं, लोकांचे शोध बळजबरीने आपल्या नवे लाऊन घेणं, मुली कमी असल्यामुळे त्यांची श्रीमंत लोकांसाठी शिकार करणे, जुन्या लोकवस्तीचे नाव बदलून नवीन नाव ठेवणे इत्यादी बऱ्याच गोष्टीमध्ये आहे. भरोसा आणि विकास या समूहांनी अगदी मंत्र्यांपासून तर साध्या कारकुनापर्यंत सगळ्यांना आपल्या खिशात घेतलेलं आहे आणि हवे ते त्यांचाकडून करून घेत आहे.
मोन्सागील नावाच्या मोठ्या शेती संशोधन कंपनी विरोधात स्थानिक गावकऱ्यांचा लढा, त्यांची स्वतःची शेती आणि जमीन वाचून ठेवण्याची जिद्द यावरून खेडं आणि त्यांची अस्तित्त्वाबद्दलची तळमळ दिसून येते. असं कळते कि मुल्यवृधी हि खूप जास्त भौतिक गोष्ट आहे, जिला मिळवून कुणी कधीच आनंदी राहू शकत नाही. शेतकऱ्यांचा लढ्यात साथ देणारे नक्षलवादी आणि सरकार यामध्ये होणाऱ्या चकमकीतून मोन्सागील चे पोलीस खात्यावारील आणि सरकारवरील वरील प्रभुत्व कळते. भूराजकारण, खनिज-राजकारण आणि या मागील त्याचे आर्थिक आणि सामाजिक प्रभाव हे खूप विस्तृत पणे विविध देशांचे उदाहरण देऊन सांगितले आहे. म्हणतात ना कि “अतिश्रीमंत आणि बलवान वाटेल ते करतात आणि गरीब दुर्बल यांना त्यांच्या वाटेत जे येईल ते सोसाव लागते.”
कारपोरेट युगाचे वर्चस्व, प्रत्येक वस्तूचे बाजारीकरण, व्यक्तिस्वातंत्र्यावर आलेलं बंधन, समाजातील प्रचंड असंतोष, असमानता हे सगळ वाचताना आपण “उद्या” बद्दल वाचत नसून “आज” बद्दलच वाचत आहोत कि काय ? अशी भीती वाटत होती. आपण (मी) खरोखर कुठल्या दिशेने जात आहे हे याचा प्रत्यय घेण्यासाठी प्रत्येकाने “उद्या” ही कादंबरी वाचावी असे मला वाटते. कारण आज आता वाचालही पण उद्या...... चे काय  ???

आकाश नवघरे, निर्माण ६


No comments:

Post a Comment