वैद्यकीय शिक्षण पूर्ण
केल्यानंतर MOship पूर्ण करून ग्रामीण / आदिवासी भागात एक वर्ष
आरोग्यसेवा देणाऱ्या निर्माणी डॉक्टरांच्या यादीत निर्माणच्या अजून एका मित्राने
भर घातली. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेल्या
डॉ. अरुण घुले याने ‘प्राथमिक आरोग्य केंद्र, विडा’ (ता केज, जि बीड) येथे १
एप्रिल २०१७ पासून वैद्यकीय अधिकारी म्हणून कामास सुरवात केली.

आपल्या शासकीय यंत्रणेतील
भ्रष्ट कामाचा अनुभव त्याला अगदी सुरवातीलाच आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असूनही
कामाची जागा निवडताना अरुणला जागोजागी संघर्ष करावा लागला. ‘पैसे
दिल्याशिवाय काम होत नाही’ हेच वाक्य सगळीकडे कानावर पडत असताना
खमक्या अरुणने ‘काहीतरी दिलंच पाहिजे’ अस
आहे तर या अन्यायाला लढाच द्यायला सुरवात केली आणि अधिकाऱ्यांचे भ्रष्ट वर्तन
जनतेसमोर उघडकीस आणण्याची ताकीदच अधिकाऱ्यांना दिली! त्यावर मात्र अपोआप सूत्रे
हलली आणि अरुणला नोकरी मिळाली.
विडा गावातील लोकांच्या
आरोग्याच्या समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्याच्या, आणि त्यांचे
आरोग्य अधिक निरोगी करण्याच्या निर्धाराने कामाला सुरवात करणाऱ्या अरुणला आपण
सर्वजण मनःपूर्वक शुभेच्छा देऊया...
अरुण घुले, निर्माण ५
No comments:
Post a Comment