'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 August 2016

निर्माणीच्या नजरेतून

वाढ कुणाची ?


एप्रिल २०१६                                                           ऑगस्ट २०१६
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या होस्टेलच्या विद्यार्थ्यांनी होस्टेल मधली झाडं वाचवण्यासाठी केलेल्या भन्नाट जुगाडाचे फळ...

संशोधक निर्माणी

गेल्या काही दिवसांत सजल कुलकर्णी (निर्माण २) व आकाश शिंदे (निर्माण ६) यांचे शोधनिबंध नामांकित जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले. त्याचाच हा वृत्तांत-

            सजल कुलकर्णी गेल्या पाचेक वर्षांपासून विदर्भातील गायीगुरांचा संशोधनात्मक अभ्यास करत आहे. याच विषयाला धरून सजलचा तिसरा शोधनिबंध (Research Paper) जून २०१६ मध्ये ‘Research Journal of Animal Husbandry and Dairy Science’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. ‘नैसर्गिकतः उपलब्ध असणाऱ्या चाऱ्याचा जाती आणि महाराष्ट्रातील कठाणी गायीगुरांच्या प्रजनन क्षेत्रातील आहाराचे विश्लेषण’ हा त्याच्या अभ्यासाचा विषय होता.
            महाराष्ट्रातील कठाणी गायीच्या प्रजनन स्थळात सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या चाऱ्याच्या जाती जमा करून त्याचे पौष्टिक विश्लेषण केल्यावर त्यामध्ये प्रथिने (.७३ ते १३.३९%), फायबर (२३.५७ ते ३४.४४%) आणि तेल (.२१ ते १०.२१%) असल्याचे आढळून आले. सर्व नमुन्यांमध्ये सिलीकाचे प्रमाण ५ % पेक्षा कमी आढळले. यामधून सर्वसामान्यतः उपलब्ध असलेल्या चाऱ्यामध्ये भरपूर विविधता असल्याचे निष्पन्न होते. शेतकऱ्यांना चाऱ्याच्या पौष्टिक विश्लेषणानुसार आणि उपलब्धतेनुसार त्याचा योग्य प्रमाणात वापर करता येईल. कमी संसाधनांमध्ये गायीगुरांची संख्या वाढवण्याकरिता जंगलाचे असणारे महत्त्वही हा अभ्यास अधोरेखित करतो.



सजल कुलकर्णी (निर्माण २),


            आकाश शिंदे गेले एक वर्ष सुरत येथील ‘सेवा’ या स्वयंसेवी संस्थेसोबत m- health या विषयावर काम करत आहे. मास्टर्सदरम्यान आकाश आणि त्याची सहकारी अंकिता शर्मा यांनी याच विषयाच्या संदर्भात आपले dissertation केले होते. माता आणि शिशुआरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात Mother to Child Tracking System (MCTS) या प्रणालीअंतर्गत प्रत्येक गरोदर महिलेची नोदणी करून तिचे लसीकरण, प्रसूती, बाळाचे लसीकरण या सर्व महत्वाच्या गोष्टींची तिला mobile sms द्वारा आठवण करून दिली जाते. Dissertation दरम्यान गावपातळीवर MCTS ची अंमलबजावणी कशाप्रकारे होते याचा त्यांनी अभ्यास केला होता. या अभ्यासावरील शोधनिबंध International Journal of Community Medicine and Public Health या जर्नलच्या August च्या अंकात प्रकाशित झाला आहे. पुणे जिल्ह्यातील निवडक १० प्राथमिक केद्रांमधील २०५ गरोदर बायका आणि २३६ माता या अभ्यासात सहभागी झाल्या असून MCTSच्या अंमलबजावणीसंदर्भातील अनेक निरीक्षणे आकाश आणि अंकिताने नोंदवली आहेत. एकूण महिलांपैकी फक्त १७% लोकांनी MCTSचे नाव ऐकले होते तर निव्वळ १४% लोकांनी अशाप्रकारचा sms मिळाल्याचे नमूद केले. आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मोबाईल तत्रज्ञाचा वापर होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कागदोपत्री असलेल्या योजना प्रत्यक्षात आणताना काय अडथळे येऊ शकतात आणि त्याचा लाभ नेमका किती जणांना मिळतो याची चुणूक या संशोधनात बघायला मिळते. आकाशच्या या पहिल्या वहिल्या शोधनिबंधबद्दल त्याचे मन:पूर्वक अभिनंदन. हे संशोधन http://www.scopemed.org/fulltextpdf.php?mno=233413 या लिंकवर उपलब्ध आहे.



  

आकाश शिंदे (निर्माण ६),

आणि शाळेतले विद्यार्थी रस्त्यांवर दिवे आणतात...

           नोव्हेंबर-डिसेंबर २०१५ च्या सीमोल्लंघनच्या अंकात आपण जबाबदार आणि सक्रीय नागरिकत्वासाठी प्रयत्न करणा-या WE, THE PEOPLE या उपक्रमाविषयी नेटवर्कविषयी वाचले होते. या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये कृतीतून नागरिकशास्त्र शिकवण्याची अभिनव पद्धत विकसित होत आहे. WE, THE PEOPLE ने १५ ऑगस्ट रोजी या पद्धतीचे चित्रण करणारी सुंदर व्हिडीओ फिल्म प्रसिद्ध केली आहे. या फिल्मची संकल्पना सायली तामणेची, दिग्दर्शन सनत गानूचे (दोघेही निर्माण ), तर ध्वनिमुद्रण अमोघ पांडेचे (निर्माण ) होते. माझलगाव (जि-बीड) येथील महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत केलेल्या उपक्रमाचे या फिल्ममध्ये चित्रण आहे.

ही फिल्म पाहण्यासाठी क्लिक करा - https://www.facebook.com/WeThePeople/videos/1072987189463897/
WE, THE PEOPLE  बद्दल अधिक माहितीसाठी - http://www.wethepeople.ooo/


 We The People

The Chimney Sweeper

               One of the greatest issues in William Blake's time, the late 18th century, was child labour. Kids as young as four were sold by their parents or were recruited from workhouses to work in mines, factories or to clean chimneys, due to their small size. A report to a parliamentary committee on the employment of child sweeps in 1817 noted that, "as the average size of a London chimney was only seven inches square, to encourage the sweeps to climb more quickly, pins were ‘forced into their feet’ by the boy climbing behind; lighted straw was applied for the same purpose. The sweep might be shut up in a chimney-flute for six hours and was expected to carry bags of soot weighing up to 30lbs (approx. 30kgs). Many suffered ‘deformity of the spine, legs and arms’ or contracted testicular cancer." The practice was not abolished until 1875, nearly 50 years after Blake’s death.
            William Blake's poem "The Chimney Sweeper" (1789) (from his volume- Songs of Innocence) is set against this dark background of child labour that was prominent in England in the late 18th and 19th Century.
            A young chimney sweeper recounts a dream had by one of his fellow chimney-sweeper, in which an angel rescues the boys from black coffins and takes them to a sunny meadow. Interestingly, in this poem Blake uses a child's innocent and naive view and demonstrates how it allows the societal abuse of child labour. It also displays Blake's acute sensibility to the realities of poverty and exploitation that accompanied the "dark satanic mills" of the Industrial Revolution.




The Chimney Sweeper

When my mother died I was very young,                                                 
And my father sold me while yet my tongue
Could scarcely cry 'weep! 'weep! 'weep! 'weep!
So your chimneys I sweep, and in soot I sleep.

There's little Tom Dacre, who cried when his head,
That curled like a lamb's back, was shaved: so I said,
"Hush, Tom! never mind it, for when your head's bare,
You know that the soot cannot spoil your white hair."

And so he was quiet; and that very night,
As Tom was a-sleeping, he had such a sight, -
That thousands of sweepers, Dick, Joe, Ned, and Jack,
Were all of them locked up in coffins of black.

And by came an angel who had a bright key,
And he opened the coffins and set them all free;
Then down a green plain leaping, laughing, they run,
And wash in a river, and shine in the sun.

Then naked and white, all their bags left behind,
They rise upon clouds and sport in the wind;
And the angel told Tom, if he'd be a good boy,
He'd have God for his father, and never want joy.

And so Tom awoke; and we rose in the dark,
And got with our bags and our brushes to work.
Though the morning was cold, Tom was happy and warm;
So if all do their duty they need not fear harm.
                                                                     
  - William Blake

Question to the readers- Do you think the poem is relevant even today? How?

Monday, 27 June 2016

I need some water to sprout

I need some water to sprout

In this dreary deadly summer,
I am alive because my hopes are
the hot heat waves are burning my leaves and flowers
but I am alive because I hope in future, there will be showers
A day will come when I will be the witness of baby sparrow's first chirp
by getting my sweet fruits, the little squirrel will burp
I will decorate myself with the long and beautiful tender vines
and will look gorgeous after having bird nest of serene design
The twigs of mine will make the shelter to the poor
travelers will take afternoon nap in my shadow for hours
despite all the adversities against my survival I believe in my dream
because my dreams are my life and my life is my dream
                                                                                - Sagar Kabra
मे २०१६ च्या दिवशी बिलासपूर (छत्तीसगढ) जवळ सागर-नेहा-पंकज या आपल्या मित्र मैत्रिणींचा दुर्दैवी अपघात झाला. या अपघाताने सागरला आपल्यातून नेले. नेहा व पंकज जखमी झाले. या कठीण प्रसंगानंतर दोघेही शारीरिक व मानसिकदृष्ट्या सावरण्याचा धैर्याने प्रयत्न करत आहेत.
            मूळ मानवतचा (जि. परभणी) सागर यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS झाला. कॉलेजमध्ये शिकत असताना अभ्यासासोबत आपण समाजासाठी काय करू शकतो या शोधात त्याने मेळघाटच्या आदिवासी पाड्यांतील बालमृत्यू कमी करण्यासाठी धडक मोहीम गाठली. पुढे सलग सहा वर्षे त्याने धडक मोहिमांचे काम नेटाने केले. याचदरम्यान निर्माणच्या तिस-या बॅचमध्ये सागर आला. सागर-धीरज-पवन हे कॉलेजमधील घनिष्ठ मित्र निर्माणच्या शिबिरांतही उठून दिसत. ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोचवण्याबद्दल त्यांची कळकळ, धडाडी यामुळे शिबिरात सकारात्मक वातावरण अगदी कायम राहात असे.
            डॉक्टर झाल्यावर सागरने छत्तीसगडमधल्या गाणियारी येथील 'जन स्वास्थ्य सहयोग' या आदिवासी, दुर्गम भागातल्या दवाखान्यात आरोग्यसेवा देणं सुरू केलं. यादरम्यान अधिक चांगली आरोग्यसेवा देण्याची क्षमता मिळवण्यासाठी त्यानं उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. आपलं संपूर्ण आयुष्य ग्रामीण रूग्णसेवेसाठी द्यायचे सागरने ठरवले होते. ग्रामीण भागात जायला आधीच कमी डॉक्टर तयार होतात. ग्रामीण भागात लोक आपल्या भागात कोणत्या स्पेशलायझेशनचे डॉक्टर आहेत हे पाहून आजारी पडत नाहीत. जास्तीत जास्त लोकांना सेवा द्यायची तर शरीराच्या एखाद्या अवयवावर स्पेशलायझेशन करून नाही चालणार. त्यामुळे सागरने 'जन स्वास्थ्य सहयोग' येथेच स्पेशलायझेशन इन जनरलायझेशन म्हणजे फॅमिली मेडिसीन या वलयांकित नसलेल्या शाखेत प्रवेश घेतला.
            रूग्णांबद्दल अतिशय संवेदनशील असणारा सागर रूग्ण तपासणी करताना त्यांचे बोलणे समवेदनेने ऐकून घेई. हसतमुख, रूग्णाचे ऐकणारा आणि सक्षम डॉक्टर – अतिशय दुर्मिळ आणि रूग्णांना दिलासा देणारे combination! आरोग्यसेवेसंबंधी लोकांवर होणारा अन्याय त्याला अस्वस्थ करीत असे. सर्वांना आरोग्यसेवा मिळावी असे त्याचे स्वप्न होते. आपले अनुभव, अस्वस्थता, स्वप्ने त्याने अतिशय सुंदर शब्दांत मांडले आहेत. ते नक्की वाचा -
            निर्माणच्या अनेक तरूण डॉक्टरांनी ग्रामीण भागात एक वर्ष आरोग्यसेवा देण्याचा निर्णय मागच्या महिन्यात घेतला. सीमोल्लंघनमध्ये ही बातमी वाचून सागरने १ मे ला त्यातल्या काही जणांना फोन केला. सागरला आधी कधीही न भेटलेल्या अमित ढगेला सागरचे कौतुकाचे शब्द ऐकून भरून आले. सागरने अमितच्या निर्णयाचे कौतुक केले, त्याच्यासोबत ग्रामीण भागात आरोग्यसेवा देताना आलेले अनुभव शेअर केले. Medico Friends Circle च्या धर्तीवर आपणही सामाजिकदृष्ट्या सक्रीय डॉक्टरांचा गट बनवू असे सागरने सुचवले. सागरने पेरलेले बी आपले डॉक्टर मित्र नक्कीच वाफवतील.

            आज सागर आपल्यात नाही. पण आपल्या सर्वांच्यातच एक सागर आहे. सागरच्याच वरील कवितेप्रमाणे आपल्यातला सागर अंकुरण्यासाठी त्याला काळजीपूर्वक व प्रयत्नपूर्वक पाणी घालूया.