गजानन फुटके (निर्माण ५) MBBS चा विद्यार्थी असून सध्या औरंगाबाद येथे वैद्यकीय शिक्षण
घेत आहे. गजाननचा एक मित्र medical representative असून त्याने नुकतीच कंपनी बदलली होती. मात्र जुन्या औषध
कंपनीचे अनेक नमुने त्याच्याकडे होते. हे नमुने लोकांच्या कामी यावे या हेतूने
गजानन व त्याच्या मित्राने सर्च संस्थेशी संपर्क केला असता त्या औषधांची गरज
असल्याचे त्यांना कळले. त्यांनी तातडीने ती १५-१६ प्रकारची औषधे सर्चला देणगी
म्हणून पाठवली.
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment