वर्ध्यातील निर्माणींची नऊ जणांची आमची टीम ४ एप्रिल २०१३
रोजी आनंद निकेतन या ‘नयी
तालीम’
च्या तत्वांवर चालणाऱ्या शाळेच्या संचालिका आणि
मुख्याध्यापिका ‘सुषमा
शर्मा’
यांना भेटली. त्यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पांमधून
जगणं आणि शिक्षण या दोन वेगळ्या गोष्टी नसून परस्परपूरक कशा आहेत याची जाणीव
आम्हाला झाली. उदाहरणार्थ – आपण रोज जेवतो. पोळी-भाजी खातो. ही पोळी तव्यावर टाकली की फुगते कशी? या पोळीच्या फुगण्याच शास्त्रीय कारण पोळी बनवायला शिकतानाच
समजून घ्यायचं..
तर अशी ही पहिली ते पाचवी पर्यंतच्या मुलांची शाळा
निसर्गासोबत राहून तन, मन आणि बुद्धीचा विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्न करते. (या शाळेच्या अधिक
माहितीसाठी - http://www.nayeetaleem.org ). सुषमाताईंबरोबर झालेली ही भेट आम्हाला अंतर्मुख करून गेली.
आपल्या गरजा, सामाजिक
जाणीवा,
निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टीकोन या गोष्टींकडे त्रयस्थपणे न
पाहता रोजच्या जगण्यातून यावर उत्तरे शोधण्याची प्रेरणा देवून गेली.
खरोखरच.. का बर फुगते पोळी? मी बनवली तरी फुगेल का? चला – करके देखो.. अहं.. करके सिखो..
कल्याणी राउत
No comments:
Post a Comment