पर्यावरणाबाबत कळकळ वाटते म्हणून आपण जीवनशैलीत अनेक बदल करतो (उदा. खादी वापरणे, हॉटेलात न जाणे, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणे, लिफ्टऐवजी जिना वापरणे, कागदाच्या मागे-पुढे प्रिंटआउट काढणे, बाजारात जाताना कापडी पिशवी बरोबर नेणे, पोस्टाच्या पाकिटांचा पुनर्वापर करणे इ.). जीवनशैलीतील बदलांना पर्यावरणाच्या चळवळीत आपले असे महत्त्वाचे स्थान आहे. पर्यावरण संवर्धनात जीवनशैलीतील बदलांचे आपले असे वेगळे स्थान आहे. प्रत्येकाला आपापल्या परीने खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळते. शिवाय संकल्प करून एखादी गोष्ट सतत करत राहणे आपले मानसिक बळदेखील वाढवते.
मात्र जीवनशैलीतील बदलांच्या मर्यादादेखील आहेत. आपण केलेल्या उपायांचा आपण शक्यतो परिणाम मोजत नाही. त्यामुळे समस्या आपण किती प्रमाणात सोडवू शकलो, ती पूर्णपणे सोडवण्यासाठी काय करावे लागेल हे त्यातून समजत नाही. शिवाय इतरांना प्रेरणा देऊन त्यांचे वर्तन बदलणे ही खूपच कठीण गोष्ट आहे.
कमीत कमी वर्तनबदलाची अपेक्षा करणारे, एखादे आर्थिक मॉडेल पर्यावरणाची समस्या सोडवू शकते का? पुणे व बेंगळूरूच्या कचरा नियोजनाच्या आर्थिक मॉडेलसंबंधी हा लेख.
तुम्हाला कोणता मार्ग जास्त परिणामकारक वाटतो? जीवनशैलीतील बदल का आर्थिक मॉडेल?

No comments:
Post a Comment